आहट


आहट 

         रातनं जेवन झायं.कुतल्ला भुकाले लागनात तसा मी चक्कीपा गवू. तठे सांगेल परमाने गल्लीना समदा गडी जमाले लागनात. जिभू, नीलू, कैलू, भोलू, भावडू, चंदू समदा जमनात पन नाना येवाना बाकी होता.दर गुरवारनी आम्ही वाट देखूत.आज कायट्या बाबाकडे आहट नाटक देखाले जानं होतं.भुतडासले समदा घाबरेत पन नाटक कोनी सोडे नही.नाना येताच समदा गुपचीप झायात.खिसामधला पापडना तुकडा तोंडमा टाकत नाना बोलना,

"अय,एक एक येवानं बरं रे तठे.गुपचूप देखानी नाटक.घाबरले लागनात ते डोया बंद करी लेवानात.."

          नाना आम्हना बॉस होता. तेनं बेकार धके तवय.तेना मांगे मांगेच फिरुत आम्ही. आहट नाटक बेकार चाले. शायमा,वावरमा तिनाच बोलबाला राये.काम करता करता रोज भरी जाये पन आहटनी एक एक गोट काही सरे नही. धाकल्लासपासून मोठासलोंग येसनी दर गुरवारले रातले आहट देखायनी की दुसरा दिन त्या तिन्याच गप्पा रंगाडेत. सांगनारा दिनले भ्यावाडी देत.

         नानाना मांगे आते रांग लागनी होती.नाना पुढे चाले नी आम्ही समदा तेना मांगे. कायट्या बाबानं घर येताच आम्ही एक एक बोली परमाने तेसना घरमा टीव्हीसमोर जायी बसनुत.तेसले बिचारासले आम्हना कधी कटाया नही उनता. समदं घर भरी जाये.गल्लीमा तेसनाकडेच टीव्ही होता.धना आप्पानी केबल आनी सोनी चॅनल तठेच होतं.

          तेसना जेवनं खावनं आवरायी जायेल होतात.भांडा पटापट धोना सुरू होतात.जाहिरात सरताच आहट लागनार होती.तदलोंग उम्या, आन्ना धापा टाकत मन्हा बाजूले बसनात.

"लागनी रे.गुपचूप बसा आते.नही ते पयाडी देसू." 

हातमाधली उशी पक्की पकडत गोपाल आप्पा बोलना.

    हु ..हा आवाज होयना.उलटा पाय, भूतना चेहरा ,डोया, त्या झाडं, उडनारा पक्षी, धव्या चंद्र काया होस,तेनावर ते आहट नाव उघड झाप कराले लागनं ते वाचताच म्युझिक लागी जाये. सुरूवातलेच मन्या सकत्या गयी गयात. मी डोया लायी लिनात. एक बायी तिना त्या घाऱ्या डोया देखताच आमना निम्मे गडी कोनी खाले देखे, ते कोनी मन्हासारखा डोया लाये.बाकी सुरू होवाना पहिलेच मुताले पयेत.बाकी आथा तथा देखीसन तोंड मिटकी बसेत.नाटक पुढे जाये तसे भयान वाटे.जाहिरात पुरी देखुत आम्ही ,पन आहटना भाग काही देखाये नही.बेकार घाबराले होये. घर एकटाले पयताबी ये नही. आंधरामा जीव घाबरे. मरेल मानसं तठेच डोयासमोर येत. पोटमा पुरी घाबरगुंडी उडे.

         आशीच नाटक डोया लायी, उघडा ठी पुरी करीसन कायट्या बाबाना घरून आम्ही सोबत  निंघुत.दाथडा सोलत कोन कसे करे ते सांगे.एखादं पडकं घर देखी तठे भूत से म्हनीसन समदा एकमेकसले घाबरायेत.तेनामा आंधारामा दारसे झोपेल प्रताप दादाना खाटवर भोलू पडना.दादा घाबरी उठना.आम्ही जोरजोरमा एव्हढा रातले हासी हासी तठून कलटी मारी.दादानी गाया टिकाड्यात तवय.

       बराच घरसमा तवय लायीट नही होतात. आंधरमा कोन कधी झामलायी ते सांगता ये नही. एक एक गडी घर उनं की जायेत जेनातेना घर.माले सोडाले नाना उंता. तो घाबरजो नको म्हनीसन सांगी गया.पन झोप कोठे लागे.कानी बदलायी बदलायी मानूस आरधं हुयी गये.

       डोया गच्चकन दाबू.गोधडी पक्की पंघरू. पन झोप काही लागे नही.आता तथा देखी लिवू. झाडसवर भूत दिसाना भास होये.एखादा घरकडे ध्यान गये ते तठला गडी आंधारमा बठेल से का काय आशे वाटे.आहटनी ती चुरेड छातडावर बठू बठू करे. मधमाच मायले उठाडं तं माय इतला रातले म्हने,

"इतला घाबरस तं, कसाले लंब होवो मंग देखाले."

माय लगेच गाया दी दायी माले जोगे ले.मंग झोप कवय लागे तेच समजे नहीं.मायना सपाटामा दिसनारा भुते बी कोठे पयेत ते समजे नही.

        दुसरा दिन मंग आहट ना किस्सा बेकार रंगाडी सांगायेत.तेनामा मी पन मांगे वसरू नही.

@गिरीजादूत 

9665911657

Comments

Post a Comment

Popular Posts