सडं
सडं
दारोदार न्हायी निवता देत फिरी रायना होता.कोठे चुल्हाले तं कोठे सडं निवतं भवडायी रायंता.सोन्याना घर चुल्हाले निवतं उन्हं म्हनीसन तो खेता खेता आमनामा नाचाले लागना.तो बोलना,
"बेकार भारी जेवन रहास तेसनामा.जिलेबी खावानी मजा यी तठे."
तो आमले खिजाडी रायना होता.जिलेबीनं नाव काढताच तोंडले पानी सुटनं होतं,ती डोयापुढे फिराले लागनी.मी लगेच तठून घरकडे धूम ठोकी.एक गल्लीआडेच लगीन होतं तेनामुये आपले निवतं रायीच आसे वाटे.मायनी धुडकामा भाकर बांधी ठेल होती.वावरमा जावाना टायीम हुयी जायेल होता.
"मा,न्हायी उनता का आपला घर?"
"नही."
"यी का?"
"उना तं उना भौ."
"चुल्हाले रायी का?"
"काय सांगो भो.येस का नही येस निवतं."
"नको ना आसी म्हनू.यी आपलेबी सडं तरी.मीच जासू बरं"
"मंग तूच जाजो.खावलाले जसं तुमले भेटतच नही.निवतं उन तरच जाजो बरं."
"मा,तठे पंगतमा जिलेबी से."
माय मन्हाकडे देखाले लागनी.तिले आते माले बोलताच उन्हं नही.तिलेच याद नसीन कधी तिनी आमले जिलेबी खावाडी असीन ते.
मायन्या आते बाया निघांले लागन्या होत्यात.मी न्हायी नी वाट देखी रायनू होतू.मायनी भाकर उचलताच मन्हा जीव खालेवरे झाया.न्हायी काही आजून येल नही होता.माय जावाले लागनी तदलोंग न्हायी गल्लीमा यी पडना.तो घरोघर निवता दी रायंता.
"भाऊ,चुल्हाले निवतं........येसनाकडलं."
"ओ ताई,सडं निवतं बरं ........येसनाकडलं."
समोरला भावड्याकडे निवतं येताच तो नाचाले लागना.दोन तीन घरे झायात की न्हायी ना मोरचा लगेच यादी वाचाले होता.दोन तीन घरस आडे तो लगेच यादी वाचे..
पुढला घर कोनीच नही होतं.तठला बाया मानसं वावरमा जायेल होतात.तेनामुये न्हायीनी लगेच गल्लीमाधलं ढोरसनं शेन उचलीसन दरवाजाले मारं नि शेजारीसले सडं निवताना निरोप देवाले सांगा.
इकडे मी तेनी वाट देखी रायनू होतू. मायपन थांबी जायेल होती.न्हायी यी नी म्हनीन...
"ताई,निवतं.........येसनाकडलं."
तेना ह्या बोल कानमा गुंजायी रायतांत.न्हायी आते शेजारला घर चुल्हाले निवतं सांगीसन आमना घरपा थांबना होता.तेनी परत निवतासनी यादी काढी.तो वाचाले लागना.मी तेना आजूबाजूले फिराले लागनू.तेनी कानवर लायेल पेन काढा नि कागदवर काहीतरी लिखाले लागना.तेनी आमना घरसकडे नजर मारी.हातसकन खून करी.आते विश्वास वाटना.आपला घर भी निवतं से म्हनीसन मी मायकडे देखीसन हासनू.न्हायी यादी लिसन पुढे होयना.तेना पावलं आमना घरपा थांबतात.तो परत चालाले लागना.जीव आते कावराबावरा झाया.तो आमनं घर टाकीसन पुढला घर सडं निवतं दी पुढे चालना गया.इकडे माय म्हनाकडे देखीसन बोलनी,
"डालकामा भाजी भाकर ठेल शे दुपारे खायी लेजो."
ती आते पटापट वावरकडे जावाले लागनी.न्हायी निवता सांगत सांगत पुढला गल्लीमा चालना गया.मी आते टकमक कधी मायकडे तर कधी न्हायीकडे देखी रायंतू.


Comments
Post a Comment