काटा

 


काटा 

       संध्याकायले वावरन्या बैलगाड्या येवाले सुरूवात झायी होती.आमना लपाछपीना डावबी रंगमा येल होता.समदा थकेल गडी घरना रस्ता धरी रायंतात.आम्हीबी खे थांबाडी घर उनूत.घर बायी येल होती.मायसंगे गफाट्या चालू होत्यात. मी दिसताच,

"व्हय रे भो पलाटमाधून बापूसाठे आरधा किलो मासा लयी ये. जयगावले काय खास हुयी नी काय नही.."

       बापू जयगावले इंजिनियर बनासाठे जायेल होता.सुट्टीसमा उना की मालेच पलाटमा इसडं लेवाले जाणं पडे.तेनामुये मीपन बापूनी वाट देखी लीव.बायीनी काम सांगं नी होनार नही आसे कधी होयेच नही. बायीना हातना डब्बा लेत मी पलाटना रस्ता धरा.पंचायतना लायीट चमकाले लागना होतात.घरासमा दिवा लागले सुरुवात झायी होती.मासावालापा पोहचनू.त्या गडीनी मेणबत्तीना उजायामा माले मासा मोजी दिनात.एक काटी मासा सेत म्हनीसन दोन डोका जास्त टाकीसन मासा तेनी लांबाडात मन्हा डब्बामा.घर बायीपा त्या मासा देताच,

"तू पन आथाच जेवन करी लेजो बापूसोबत..."

        मी बेकार खुस झावू.हा सांगत घरकडे दुडकी धरी.मायले मी घर जेवाव नही म्हनीसन सांगं.मायनी खिचडी टाकेल होती.मी आते बायीनी हाका मारानी वाट देखी रायंतू.मी परत परत बायीना घर जायी येवू.भाजीना वास मस्त ये.बापू बाहेर दोस्तसकडे जायेल होता.बापूनी वाट आते बायीपेक्षा मी जास्त देखी रायनू होतू.जोरमा भूक लागेल होती.पोट मासासनी वाट देखी रांयंत.

        बापू येताच बायीनी बापूले बोल दिनात.मी मनामा खुस होतू.आमले दोनीसले वाढीसन बायी बोलनी,

"मासा समायी खा.तेनी जास्त काटाना मासा मोजी देल शेत.टायीम लागना तं चाली भो.."

वाढा भेटताच मी गपागप खावाले लागनू.परत बायी बापूले वाढत बोलनी,

"दम मारी खाय तू.काटा आटकाडसी.."

बायीना बोलाना घात नी काटा आटकाना घात एकच झाया.मासा खाता खाता बारीक काटा मन्हा गयामा आटकना.माले आते जेवन जाये नही.समदा जीव आते काटामा होता.बापू दनादन मासा हानी रायंता.मी इकडे पानी पी पी आरधा होयनू.आते सांगा शिवाय इलाज नही होता..

"बायी व..काटा आटकना.....!"

बापू जोरमा हासाले लागना.बायी बापूले गुपचूप खाय बोलनी.म्हनापा येत,

"कोल्ली पुयी खाय.जायी तो.तरी बागे बागे खावानं सांगू तुले."

       मी बायीनं आयकत कोल्ली पूयी खादी.काही फरक नही पडना.आते माले वटावर बसाडं.गल्लीना एक एक घरना जमाले लागनात.कोनी के खावाडे तं कोनी भाकर खावाडे.कोनी भरभर पानी पाजे.येनामा समदा हासी हासी मनी मजा लेत.माय येताच माले रडाले वूनं.गयामा काटा रुती रायंता.कसेतरी होये.गल्लीना बराच जन माले डाक्टरकडे ली जा सांगाले लागनात.डाक्टर दादाना बापू तठे उना.समदासनी माले बापूसोबत धाडं.

        रस्ताकन जाताजाता मी नुसतं थुक गी लिवू.पन मासाना काटा काही खाले जाये नही.डाक्टर दादाना बापू माले हात पकडी ली चालना होता.पिंटू डाक्टरनी तपासं पन पाचोरा ली जा सांग.मी रडाले लागनू. बापू माले लगेच बाबा डाक्टरकडे ली गया.नंबर लागताच.डाक्टरले समदं सांग.डाक्टरनी पहिले हासी लीदं.तोंड आ कराले लावं.तोंड आ करताच दादानी चिमटा तोंडमा टाका.काही फरक पडना नही. डाक्टर बापूले बोलना,

"अरे तो काटा गळ्यात आडवा अडकलेला आहे.त्याला आता ऑपरेशन करून काढावे लागेल."

मी तठेच परत रडाले लागनू.बापूनी माले समजाडं.मासा खावाना माले पस्तावा यी रांयंतात.बापूसोबत पिपय गल्लीमा येताच शाम सर भेटना. बापूसोबत बोलाले लागना.नी मन्हाकडे ध्यान जाताच जोरमा पाठमा चापट देत बोलना,

"काय रे बेटा काय चाललं. अभ्यास करतो ना.."

सर बापूसोबत बोलाले लागनात.

मी इकडे हालका होयनू.गयामा आते काहीच वाटी नही रायंतं.सरनी चापट काम करी गयती.सरसना निरोप लेत बापूसोबत घर येवाले लागनू.बापूले आनंनमा सांग,

"बापू दादा, काटा गया पोटमा.."

"अरे वा,कसा काय रे.."

"सरनी चापट काम करी गयी.."

बापू जोरजोरमा हासाले लागना.गल्लीना समदा मन्ही वट्टावर वाट देखी रायना होतात.बापूनी समदी हाकीकत सांगी तेसले हासीहासी. समदा लोट पोट हासनात.माले काही हासू ये नही.मासावालाना दोन डोका माले दिसाले लागना होतात.तेनी फसाडं होतं माले नी माले मासाना काटानी...!


#आमनंधाकलपन

@गिरीजादूत 

9665911657

Comments

Popular Posts