भोंगा

 


 भोंगा 

      "बाप्प्या ऊठ रे.मांगला पायठेच उठो भो.अभ्यास चांगला ध्यानमा रहास."

         माय गोधडी उचकाडत गल्ली झाडाले लागनी.मी काही थंडीना उठनू नही.परत गोधडी लिसन झोपी गवू. खयामा जाणारा लोकंसना पायना आवाज येवाले लागना होता.सकाय सकायमा मायनी उठाडी दिनं. तेनामुळे काही झोप लागनी नही. उठताच मायनी शेन आनाले धाडं.आंधारामा घाबरत घाबरत जावाले लागनू.रस्तामा झोपेल कुत्रा भुकाले लागताच मी घरकडे पयी उनू.शेननी तगारी फेकत मी दिवापा पुस्तक वाचाले बसनू.शायनी परीक्षा उनी की अभ्यास कराले मजा ये.

         मायनी चुल्हा चेटाडा होता.मायपा मी यी बसनू.चुल्हाना उजायामा पुस्तक वाचाले भारी वाटी रायंतं.तदलोऺग मठ माधला भोंगा सुरू झाया.

"नमः शिवाय ॐ नमः शिवाय..." गानं लागताच पुस्तक फक्त नावलेच हातमा रायनं मन्ह.झापटमा उठेल काहीच फायदानं राये नही.ध्यानमा ठेवाले गयं तं गानंच आयकाले ये.तसंच उठीसन परत चिमनीपा जानं पडे.दरवाजा बंद करात तरी सानावाटे आवाज यीच जाये.मंग पेपरले बसनं की पहिले कानमा गाना आयकू येत मंग काय वाचं ते ध्यानात आननं पडे.बेकार तरास होये.

       भोंगा समदा गावले झापटामा उठाडे पन सकायमा वाचाले उठनारसना बोकांडी बसे.आमन्हं घर गावबाहेरले लागीच होतं तेनामुळे कोनले सांगो हाईच पंचाईत हुयी जाये.

       एक दिवस भोंगा लावणारा बाबाले सांगाले गवू.बाबानी गावांना पुढारीसले सांगी दिनं.काहीसले पटनं.काहीसले नहीं पटनं.देवना भक्त आते घर यीसन समजाडी,बजाडी जायेत.काही गावबाहेरच वखरी टाकेत.

"अरे देवनाच गाना लागतस ना.तठे का पिच्चरना गाना लागतस का? तसं काही राहतं तं आम्हीच सांगतूत तेसले."

"का रे,पोरनिमाले प्रसाद लेवाले जावानं बरं गोड वाटस तुले मठमा."

"धाकलाच से ना रे तू आजून तितूर.चांगलाच तरास होस ना तुले."

"कोठे मास्तर होनार से तू.भागोत आन्नान्या म्हशीच वायन्या सेत आपले." 

        तवय बेकार राग ये.काही गडी दोन्हीसकडून डफडा ठोकेत.तेसना जास्त तरास राये.बाहेरला सोबत घरना पन बोल खाना पडेत.भोंगा काही सकायलेच लागे नही.तो सकाय संध्याकाय लागे.दीड ते दोन तास चाले.तेनामा काय अभ्यास हुयी भो.परीक्षाना टायीमलेच येना तान वाटे.चिमनीमा वाचा पेक्षा गल्लीना लायीटनं मजानं उजाये पडे तेनामुये हाऊ भोंगा नको वाटे.मन्हासाठे बराच जनसनी सांगी देखं,पन काही उपेग नहीं होयना होता.गल्लीना बाया मानसं पन आते माले बोलाले लागना होतात.

       भोंगानी आपली त्याकायमा बेकार फजिती करी टाकी होती.पन तेनी सवय करी लिनती.दहावी बारावीले तरास झाया होता परत डि.एड.सीईटीले तसंच होतं.प्रयत्न करी देखा होता.सतिस सर,नंदाताई,नाना मामा,अरुन आबा,परसराम टेलर येसनी आपला परी खाले सांगी देखं होतं.भोंगाना आवाज कमी होये त्या दिनपुरता फक्त.भोंगा परत जिकी जाये.घरमा लायीट नहीं होती.राहे ते तेना भरोसा नहीं राये.चिमनी नही ते आपला गल्लीना ग्रामपंचायतना लायीट जिंदाबाद होता.भोंगा बंद करा साठे कधी कधी वाईट विचार येत.मठलोंग जावायी जाये.मंदिरवर चढीसन नुकसान करो आसे वाटे पन नहीं कराये.परत मंदिरमा जायीसन देवना पाय पडी घर यी जावू.वरीसवर वरीस तेच चालू होतं.

        भोंगानं कधी ओझं वाटनंच नही पन तेना टायीमवर विचार होवाले पाहिजे होता.समदा परयाय बासनसमा ठेवना पडतस जवय लोकं चांगलं वायीट इसरी जातस.धाकला सेत म्हनीसन आवाज आयकतस नहीत बराचदा.सांगनं तव्हय पन तेच होतं आजपन तेच से.त्याच त्याच गाना आयकी देवपन बोर हुयी जास.आवाज कमी ठेवाले पाहिजे.लावाना टायीमिंग नी कमी टायीम चालाडो म्हनजे कोनले तरासच होनार नही.समजाले लागनं नी भोंगा ना पसारा बाजूले करी टाका.तेनाकडे ध्यानच दिनी नही.पन भोंगामुळे आपलं परकं कोन हायी कोरायी गयं ते कायमनं.

-- गिरीजादूत 

9665911657

#आमनंधाकलपन

Comments

Popular Posts