बघी डाव

 


बघी डाव


"येशी तं ये भौ पटकन.तथा समदा कवसना खी रायनात.पहिलेच शायना टायीम हुयी जायेल शे." जिभू तगादा लायीसन बोली गया.

         मायपा आज एक रुपया मांगेल होता.आते आपनबी मोठा होयी जायेल होतूत.वावरमा निंदाले,कपाशी वेचाले आपले चाच भेटे.घरना परत एक कमवता गडी वाढी जायेल होता.तेनामुये आते आपन मायपा आपली आढी ठी,की आपले लगेच पैसा भेटत जातीन आसं वाटी गयतं.मायपा तगादा लावा होता.

"खावाले कोठे जास रे मरजायजो तू." माय एक रूपया हातमा टेकत बोली गयती.

           माय आसा पैसा देच नही पन कधीमधी दुकानना वान्याना धंदा कराले का म्हना वीस पंचवीस पैसा खावासाठे दी दे.आज आपला डोकामा भयान होतं.गल्लीना गँगना नवा खे सकाय संध्याकाय चाले.त्या तथा बघी डावमा पैसासकन खेत तं आम्ही आथा कोया,गोट्या,चिचोक्या,पेप्सीना झाकनं येसना संगे मस्त भागाडी लिऊत.

        माले पैसा भेटे नहीत म्हनीसन जिभूनी कलटी मारी देल होती.मायनी रुपया हातमा टेकताच मी ढोरसना दवाखानामा पयत गवू.पोरसना खे सुरू होता.तठे चार पाच डाव आल्लक आल्लक पोरसना सुरू होतात.कोनी जिकायनं की पैसा मोजाना धुंदमा तर कोनी सांगेल पैसाले मारासाठे डावले तोंडनी थूक लायीसन नेम लायी रायंतात.आपली बाकीनी गँग पेप्सीना झाकनससंगे खी रायंतात.गावमा माधला बराच पोर आज जमेल होतात.शॉपिंग सेंटरना मधमा बराबर मोठ्ठाल्ला गडी खी रायंतात.तेसना गेम मोठा होयना होता.बाकीना खे थांबी गयात येसना खे देखासाठे.येसना हातमा पैसा माये नहीत.मारणारा गडी चुकना ते,त्याले लगेच आनखीन पैसा डाव म्हनीसन टाकना पडेत.आसा करता करता डाव मोठा हुयी गयता.

        शायना टायीम हुयी जायेल होता.पोरं खे सोडानं नाव ले नयीत.गावमा हाऊ बघी डाव पैसासकन खेवानं परमान वाढी गयतं.जथा जावो तथा कोपराकापरामा हाऊ खे चालेच.पोरसनं खिसामा चिल्लरच वाजे.पोरं आते शायपन बुडावाले लागी गयतात.आपनबी आज मायपासून पैसा आनेल होतात.त्या खिसामाच रायेल होतात.पेप्सीना झाकनसकन भागाडी लेल होतं.पोरं गल्लीमा दरोज पैसासकन खेत पन आपलापा पैसाच नही रायेत,तेनामुये खेता ये नही.कधीकधी भेटेल पैसा आसाच हारी जाये मानूस.जिकानं नाव नही राये.पोरसना आज गलका वाढना होता.जसा जसा गेम पुढे जायी रायंता तसतसा शायमा जानारा पोरसनी गरदी खे देखाले थांबे.वावरमा जानाराबी खे ना आनंद लिसन वावरकडे जायेत.एखादा चांगला गडी गाया दी जाये.

"शायमा जावानी बोंब रे.शिलगाडाना बघी डाव खे.अभ्यास गिभ्यास नही रहात का तुम्हले.रामपायरापासून लायी देतस त्या." तावतावकन जानारा गडीमुये एखादा दुसरा पयी जाये.रंगेल खे होता आज.तवढात शाम सर,परदेशी सर,पाटील सर,येवले सर ह्या चार मास्तरं सारखा उनात भौ.समदा पोरं चिनभिन झायात.मास्तरसनी पैसा तं उचलातच पन सापडेल गडीसकडून कोन कोन होतात तेनी माहिती लिनी.

       शायना टायीम होयेलमुये समदा खेनारा पोरं शायमा हजर झायात.मास्तरसमुये मुडेल खे नि होयेल फजितीवर समदा गल्लीना खिदीखिदी हासी रायंतात.आपलाबी पैसा वाची जायेल होतात बिगर खेवाना.पन दरोज बिगर पैसासना बघी डाव खेवानं सुरू राये.आपलाबी फरशीना तीन चार डाव खिसामाच नही तं आपला आड्डामा रायेत.

        शाय भरताच धडकी भरी जायेल होती.आज जथा तथा बघी डावना किस्सा सुरू होता.आज मास्तर घोमालतीन हायी समदी शायमा चावळायी रायंतं.जनगनले समदा उभा रायनात चौधरी सरना एक शिट्टीमा समदी शाय चिडीचूप हुयी जाये.शायनी 'हे जगत के श्रीराम प्रभू' पारथना होताच बघी डावमाधला राजा  नानाले शाम सरनी पुढे बलावं.नाना पुढे जाताच समदासना सकत्या गयी गयात.कोना नंबर हाऊ गडी लायी हायी कोनलेच सांगता येनार नही होतं.नानाले समदा गावना पोरं आज घाबरी होतात.नानानी पाचवीपासून पैसा पैसा खेनारा गडी काढानं सुरू करं.नाना आम्हना रांगमा येताच जीव पानी पानी झाया.तो एक एकले हात धरी काढी रायंता,मन्हामा येताच तो बागेच बोलना,

"घाबरू नको.तुले नही काढाव." असं बोलीसन तो पुढे गया.

       जीवमा जीव वुना मन्हा.दहावीलोंग चांगला पन्नास साठ पोरं निंघना असतीन नानानी काढेल.समदी शायसमोर निंघेल गडीसले काठ्या,बुक्क्या दनादन भेटन्यात.आम्ही वरला मजलाना वरांडामाधून देखी रायंतूत.मी सुटी जायेल होतू.आनंद होता आपले.

      समदा पोरं आते जेना तेना वरगामा बठेल होतात.पहिला तास सुरू होताच 'लाल टांगेवाला' गानं म्हनायी रायंत.तवढामा माले गल्लीमाधला गडी बलावाले वुना.सरनी गानं थांबाडीसन माले जावाले लावं.गल्लीमा मीच वाची जायेल होतू.तेनामुये मनमा खुस होतू पन गल्लीना गडी येताच समजनं की आते हमखास आपले मार भेटी.तेले बाहेर जाताच विचारं,

"कारे काय झायं?" 

"समदा गल्लीना पोरं उभा करेल सेत रे.." तो बोलना.

        वरगामा जाताच समोर देखं तं परदेशी सरनी गल्लीना समदा मन्हा गल्ली दोस्तसले उभं करेल होतं.त्या खाले मान घाली होतात.समजानं ते समजी गवू.सरना टेबलपा जाताच जोरमा कानफट्टामा बसनी.समदा वरग मन्हाकडे नि मी तेसनाकडे देखाले लागनू.चापट हायी इतका जोरमा बठनी होती की आवाजच निंघना नही मन्हा.

"तुला का मारलं असेल हे तुला समजलं असेल.यापुढे दिसायला नको हं." 

परदेशी सर रागकन मन्हाकडे देखंत बोलनात.

          मी मान हालायी.माले जावानं सांग.गल्लीना समदासले आते आनंद होयेल होता.पारथनाना टायीमले मी सुटी जायेल होतू.आते तेसना पंगतमा मी पन होतू.येलेपन मार भेटना मन्हीसन भैया मन्हाकडे देखीसन कडूजरक हासना.मी तसच मारेल मुसडं लिसन मन्हा वरगामा जायी बठनू.

        त्या बघी डावनी आपले बेकार सबक दिनता.परदेशी सरनी चापट आजपन वाईट गोष्ट करापासून लांब करस.बघी डाव जीवनले कलाटनी दी गया.तवयपासून कधीच आपन बघी डाव सोडा,बाकीन्यापन वाईट गोष्टीसना नांदे लागनू नहीत.


#आमनं_धाकलपन

#गिरीजादूत 

9665911657

Comments

Popular Posts