चिकनी

 


#आमनं_धाकलपन 

चिकनी 

       गल्लीमा पापडसना सीजन जोरमा चालू होता.उडीदना पापड होईलमुये आमना आते चिकनीना थाप्या पापड कराना होतात.आज मोठमायना थाप्या पापड थापाले गल्लीन्या समद्या बाया येल होत्यात.दनादन खाटा भरायी रायनत्यात.घाटानं बोट चोखत मी ताट देवाले लागनू होतू.चिकनीना घाटा नि खरेड खावानी मजाच न्यारी राये तवय.

 “विमल,काल्दीन तू तूना पापडं करी ले.आज चिकनी दयी लयजो.सुकायी जायी ती वट्टावर चांगली.” पुंजामाय चमचाकन घाटा ताटवर टाकत बोलनी.

“माय,तुम्ही समदाजनी रायन्यात तं करसू मी.माले काय जमी तिले घेरानं.ह्या खाटा आठेच राहू देजो छाया आक्का बरं.” माय पापडसना ताटं मनपा देत बोली गयी.मी पन मायपासून ताट लिसन खाटासकवर पापडं टाकाले जायेल डाक्टरीन ताईपा देत जाऊ.ताई मजाना एक एक रांगमा पापडं धुडका उचलत टाकत जाये.जेना पापड नही टाकायना तेले धुडकाले पानी लावाले सांगे ताई.

        कालदीन आपला पापडं सेत म्हनीसन माय थाप्या चिकनीना पापडसले लागनारं समदं साहित्य वान्याबाबाकडून लयी वुनी.चिकनीना पापडं मजाना नरम आनी लालसर येत.खावाले बिस्कीटसारखा लागेत.कायठ्यासासकडली चिकनीनं गुनगान बरंच होयेल होतं.आमनीबी चिकनी कायठ्यासकडली होती.तेनामुळे तिना भेव नही होता.

          तिसरा पहार होताच मोठमायना पापडसले काढाले बाया जमाले लागन्यात.गल्लीमा बादली,हांडा भरेल होतात.समदा आते पापडसना धोतर खाटासवर उलटा कराले लागनात.पानी मारताच पटकन काढाले लागनात.तुकडं पडताच ते तोंडमा मिटकायी जाये.चवदार पापडं लागेत.कालदीन आपलाबी असाच लागतीन म्हनीसन माय खुश होती.लालसर अन् सगय्या पापडं आते काढायी गयात.धाबावर सुकाडाले मायसोबत मी पन गवू.मोठमायना पापड टाकावताच माय घर वुनी.

            मायनी मनापा चवथेभर चिकनी दयाले काढी दिनी.माले बजाडी बजाडी सांगं,

”पापडंसनं सांगजो बरं.” 

"हावं मा." मी किदरीसन बोलनू.

         डोकावर तगारी लेत,चोमय ठेवत मी चिकनी दयाले गवू.चक्कीवर जाताच चक्कीवालाभाऊले सांगं.तेनी थांबाले लावं.आंधारं पडी गयं तवय तेनी चिकनी दयी दिनी.मी चिकनीनं पीठ माय बोली म्हनीसन गरमगरम डोकावर चढावत घर लयी वुनू.

           मायनी पापडसकरता लागनारी समदी तयारी करी ठेल होती.रातले सायकोरमाय येताच चिकनी साडीकन गायी काढी.मजानी तयार करी.रामपायरामा लागनारं समदं साहित्य मीठ,सोडा,जीरं एक एक तगारीमा काढं.पापडं करासाठे बायासले सांगाले माय गल्लीमा घरोघर जायी वुनी.खाटा,धोतरं,बोगनं,लाकडं,चाटू,ताटं,फडका समदं नेवनेटकं करी टाकं.

            मायनी झापटमा उठताच दगडसना चुल्हा सवारा.लाकडं,काड्या,रेटं घालीसन तो चेटाडा.बोगनामा पानी गरम कराले ठेवं.घरतून मायले समदं साहित्य आम्ही आनू लागनूत.मोठंमाय,सायकोरमाय,सुमनमाय,जयकोरमाय,पुंजामाय,छायाआक्का,आशामाय,डाक्टरीनताई गल्लीन गल्ली पापडं थापाकरता जमनी.विमलना पापडं म्हनीसन समदाजन चिकनीनं पीठ तगारीमा टाकाले लागनात.पानी खयखय उकायाले लागताच समदा मीसन पीठ बोगनामा चाटूकन घेराले लागनात.हासी मजाकमा समदी गल्ली झापाठामच उठी जाये.खाटा पापडसले लागतीस म्हनीसन घरना गडीबी त्या रिकाम्या करी देत.खाटासवर धोतरं वल्लाकरीसन आथरायी गयतात.आथा चिकनीना घाटा तयार होताच बाया ताटं लिसन फडका वल्ला करीसन थाप्या पापड थापाले लागन्यात.घाटानी चव समदासनी लिनी.चिकनीना घाटा चवदार लागे.झापाटामाच पापडं थापाले सुरूवात झायी.पटापट पापडं थापायनात की ताटं मी खाटासकडे ली जावू डाक्टरीनताईकडे.रिकामा ताटं लिसन पयत पयत बायीसले देवू.बाया मन लायीसन पटपट उरकायी रायंत्यात.चवथेनं बोगनं उजायं पडापडाले हुयी गयं.तवढातं,

“विमलताई वं,हायी पीठ कसावर दयं होतं तू.येना रंग देख तू.” छायाआक्का जोरमा आचंबकान बोलनी.

“इतकी मजानी चिकनीना सत्यानाश करा वं विमल तू.” सुमनमाय खाटना पापडसले हात लावत बोलनी.

जो तो आते मायले बोलाले लागना.मायना जीव आते पानी पानी हुयी गया.समदं नेवनेटकं राहीसन पापडं समदा काया दिसी रायंतात.

माय कावरीबावरी होयनी.तिले संताप वुना होता.बाया हासी खिदडीसन मायनी मजा ली रायंत्यात.मायना रोख मन्हाकडे जाताच तठे पडेल काडी मायनी मन्हा पाठोडावर लायी.

“ह्या,कुत्राले तरी सांगं होतं.चक्कीवालाले नीट सांगजो.तेनी बाजरीवर दयी काढी चिकनी.तेनामुयेच ह्या पापडं काया वुनात.” माय सपासप माराले लागनी.

“आवं जावू दे,चवंले पापडं मजाना सेतंस.सुकायनात की बराबर येतीन.हाय खाय चवथेभर चिकनीले.” मोठमाय मायले आवरत बोलनी.

दगड मनवर ठेवत मायनी समद्या बायीसले चहा करीसन वाटे लावं.

       जसं जसं उजायं पडाले लागनं तशा खाटासवरला पापडं काया दिसाले लागनात.पडसाले जानाराबी आते खाटासकडे देखीसन दातं इचकी मजाक करी जायेत.मायले बेकार राग येल होता.मायले घाबरी घाबरी मी दूर दूर राहू.दिवसभर गल्लीमा आमना चिकनीना काया होयेल पापडसनाच विषय होता.

”इना इतका मस्त उनात, विमलना कायाच उनात.चिकनी तं एकच होती.” 

बायासले चक्कीवालानी बाजरीवर दयी देल होतं हायी समजी गयतं.पन चावायाले पाहिजे होतं म्हनीसन दिवसभर चिकनीना थाप्या काया पापडंच होतात.

        ढोर ढाकरसले वायाले मी पापडसपा थांबेल होतू.येनारा जानारा विचारेत,

“कसाना पापडं करातं रे ह्या.नवीन सेत वाटतं.” 

      दात इचकतच त्या जायेत.बेकार लाज वाटे तवय.कोनी उनं की लगेच वाटे हाऊ आते विचारी की काय.भेव बठेल सारखं हुयी गयतं.चार वाजताच गल्लीन्या समद्या बाया परत जमन्यात.खाटासना धोतरं उलटा करत पानी माराले लागन्यात.पापडं कायाच होतात.सुकायेलवर लाल होतीन आसं वाटे पन येल रंग कोठे बदलाव होता.मायले राग येस म्हनीसन बायासनी पन आते मजाक लेनी बंद करी दिंतं.चिकनीना पैसा वाया गयात म्हनीसन तेसले वाईट वाटी रायंत.पापडं आते येलेच खावाडानात म्हनीसन बायीसनी मायले सांगं.काढेल पापडं धाबावर परत झावरीसमा सुकाडाले टाकू लागनू.चोरना गत मदत करू पन ते काही मायले मान्य नही होतं.चिकनीना पापडसना सत्यानाश येनीच करा येनावर ती ठाम होती.

       घर येताच मायना पारा चढेल होता.संध्याकायले परत फुकनीना दनका बठना होता.म्हनी चूक मी चिकनी दयाले गयतू हायीच होती.मायना निरोप चक्कीवालाले देल होता पन तेनी बाजरीवर दयेलमुये चिकनीना लालपना जायीसन तेले कायपटपना वुनता.दुसरा दिन मायनी चिकनीना पापड भुंजा.तो मजाना फुगना.खावाले मस्त बिस्कीटसारखा लागना.माय खुश झायी.मायले भुंजीसन पापड आवडेल होता.वरीसभर ह्या चिकनीना पापडं भुंजाले काढात की थाप्या पापडसना तो दिन लगेच डोयासमोर ये.आतेपन चिकनी,थाप्या पापड डोयासमोर वुना,नाव जरी निघंनं तरी चिकनीना तडाका पाठवर उमटसं.

#आमनं_धाकलपन

@गिरीजादूत
9665911657

Comments

  1. भरत ..भलती याद येस चिकनी ना पापडस्नी आणि मायनी बी....वल्ला पापडस्ना तुकडा कावांनी मजा येगळी व्हती....यंदा मी कयवाडीतुन चिकनी ली ठेव शे पण इथे पान्या पापड कोन करसं....

    ReplyDelete
  2. चिकणी ले आमनाकडे निगाळा म्हणतंस जिभु...निगाळाणा पापडं...भारी लियेल शे भरत.धाकलपन ना एकेक दिवस आठवतस.मज्जानचं व्हतं समदं.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts