झापट
#आमनं_धाकलपन
झापट
कोंबडा कोकावताच डोया उघडाले लागनात.घरमा भांडासना आवाज येवाले लागना होता.माय उठीसन वाडागामा जायी रायंती असं वाटनं.इतला रामपायरामा कसाले उठो म्हनीसन बोलाले जावूत म्हनीसन डोया चुयी उठनू.वाडगामा डुखी देख तं माय डेगडीमा पानी वती रायंती.शिलगेल चुल्ला देखताच धाकलपननी याद उनी.मी परत घरमा गवू.दिवायी अंकसोबत व्यंकटेश माडगूळकरसनं 'माणदेशी माणसं' पुस्तक उचलं नि गवू वाडगामा.
मायना डेगडीले आते मी काड्या लायी रायंतू नि चेटेल चुल्लाना उजायामा पुस्तक वाचाले लागनू.पहिले 'नामा मास्तर'च हातमा लिनं.मास्तर वाचता वाचता म्हनाच मास्तर होवाना परवास डोयासमोर उभा रावाले लागना.
रातलेच रतनाताई भेटनी होती.बेचारीनी चिडीमा अभ्यास करू म्हनीसन अयीन बारावीना टायीमले माले लाईट दिना होता.तेना पहिले चिडी नि चुल्ला ह्याच आपला अभ्यासना ठिकानं होतात.झापटमा मायनी उठाडं की पहिले खाले होयेल चिडीमा राकेल ओतानं नि वाचाले बठानं हायी ठरेलच होतं.रांभूबाबाना पडसाले जावाना टायीम आनी आपला उठाना टायीम कधी येक हुयी गयता हायीच समजनं नही होतं तवय.
झापाटामा डेगडीनं पानी तपाडता तपाडता कधी पुस्तकं वाचायेत हायीच समजे नही.झापट,चिडी,चुल्ला नि पुस्तक हायी नातंच भारी होतं तव्हय.आपुन हातमा पुस्तक लिनं की तिकडे मठमा भक्त पुंडलिकना टेप लागालेच पाहिजे होतात.दररोज तीच तीच कथा आयीकी आयीकी समदी क्यासीट पाठ हुयी जायेल होती.कधी कधी वाटे त्या टेपना भोंगाच काढी टाको नि बंद करी देवो आसे वाटे.पुस्तकमाधलं समदं ध्यान सकाय सकायले त्या भक्त पुंडलिकमा जाये.तेना फायदापन राये कधी कधी.एखादा दिवस डोया लागेल रायनात तं झापटमा उठानी सवयपन त्या भोंगामुयेच लागनी होती.
चुल्लामा काड्या नि रेटं टाकात की धुक्कय बेकार बेजार करे.डोयासमाधून डायरेक पानीच बाहेर ये.चेटेल उब्यासोबत पुस्तकसना पानं वाचानी भारी मजा वाटे तव्हय.आनी आतेपन.त्या चुल्लासाठे लागणाऱ्या काड्या संध्याकायले आननं,रेटससाठे सकाय सकायले पका आप्पाना खयामा शेन लेवाले जावानं ठरेल होतं. पका आप्पाना म्हयीसनी मुसडामा मारेल लाथनी लगेच याद यी गयी.त्या म्हयीसनी लाथ मारी म्हनिसन मी परत हाथेकनच तिना पाठोडामा माराले गयतू तं म्हनाच हाथ समदा टराटरा सुजी गयता.
आते येक येक धडा होवाले लागना होता.चुल्लाले दनादन काड्या लावानं नि पुस्तक वाचानं सुरूच होतं.तिकडे माय,आप्पा,बाई येसना आंगं धोवायी गयात.आते आपलाच नंबर होता.तेनामा 'झेल्या' हातमा पडना.झेल्यान्या करामती वाचता वाचता मीच मनामा झेल्या झामलाले लागनू नि झेल्याना 'मास्तर'...!
झापटनं नि आपलं नातं बेकार घट्ट होतं.आजनी झापटपन तसीच होती.चुल्ला नि चिडी जसा आपला दोस्त होतात तसाच राजमल आन्नाना घरजोगला गरामपंचायतना खांबपन आपला दोस्तच.जवय माय चुल्लापा राये तवय त्याच खंबावरला लायीटवर आपला अभ्यास होये.सुशामायना भितडाना खल्ली खाट टाकी की पुस्तक फक्त खांबना उजायामा ये नि मी पुरा आंधारामा.झापटमा पडसाले जानारासले नको समजाले म्हनीसन झावरमाच पुस्तक वाचाये.कधी कधी तं नुसता पावलंसना आवाजकन पुस्तक उजायं आंधारं खे.तेनामा सकायमाच नयले पानी वुनं की तगाऱ्या,माथनी भरानं ठरेल राये. तेनामाच गल्लीमा सडा टाकनं तं वुनच.
धाकलपनमा पुस्तक वाचानं लागेल येडं आजपन जसंना तसं से.ते झापटमुयेच.वीस पंचवीस वरीसनंतर परत आज 'झापट' सोबत वुनी.मायनी चुल्लावर ठेल डेगडीसोबत 'माणदेशी माणसं ' वाचता वाचता कधी झापटसंगे अनुभवेल माणसं सोबत वुनात तेच समजनं नही.धाकलपन नं जग हायी आसंच अचानक अनुभवाले येस फक्त ते जगी लेवाले पाहिजे.आजना झापटनी झोपाटामा बसता बसता चुल्लानासोबत 'माणदेशी माणसं' अनुभवाले दिनात हायी खासं शे..!
#आमनं_धाकलपन
@गिरीजादूत
भरत पाटील
9665911657



भन्नाट आहे पण , मराठीत लिहा की राव,
ReplyDeleteमस्त लिहिलंय भाऊ...अजून एक शिरपेचात मानाचा तुरा...
ReplyDelete