धोंड्या

 


धोंड्या

       जुलायी महिना आरधा हुयी जायेल होता.देव काही पानी पाडानं नाव ले नही.लोकेसन्या पांभरी पेराले तयार होत्यात.बी बियानं पोतडीसमा भरीसन समदा लोकं देवनी वाट देखी रायंतात.ह्या वरीसले दुष्काय पडी आसे लोकं म्हनाले लागना होतात.ढोरसले चारा पानीना वांदा होवाले लागना होता.मंडयीसना झगडा आते पानीवरुनच होयेत.शिवारं पानी बिगर उजडेल दिसेत.भर पावसायामा बिगर देवना पानीनं गावले करमे नही.मजूरना हातले काम नही होतं.नयले पानी येवानं नाव नही ले तेनामुये लोक हायनी व्हेरवर दोर बादल्या लीसन गरदी करेत.कोनी सरकारी दवाखानाना हापसा,कोनी दत्तू आप्पा,भागोत आन्नाना मयासलोंग हांडा कयशी,डब्बा लिसन जायेत.लोखंडी टाक्यासवाला ते गाडामा टाक्या ठी ठी आपापला वावरसमाधून पानी लयी ठेत.सायकल,मोटरसायकलवाला गरागर डब्बा वाजी नंबरं लावाले पयेत.जो तो जथा पानी भेटी तथा जाये.सकाय,दुपार,संध्याकाय फक्त पानी आनासाठेच लोकं दिसेत.आम्हीबी कोठे मांगे होतूत भो..

       जिभू,निलूनी आमन्ही गँग बी आज तित्तूर नदीकडे पानी लेवाले निंघनी.कोनापा हांडा,कोनापा कयशी,कोनापा डब्बा.मीपन शान मारी घर कयशी ठीसन हांडा लीना.समदा घरपासला ढोरसना दवाखानापा जमीसन तित्तूर नदीकडे जावाले निंघनात.पवसायामा बेकार उन लागे.गलाटीना फफाटा पायले बेकार गरम लागे.झाडसनी सावली वुनी तं बरं वाटे.पायले बरं वाटी म्हनीसन आम्ही लोकसना वावरसमाधून ढेकाया चेंदत जावाले लागनूत.पानी पडेल नही होता तेनामुये वावरना ढेकायबी फुटेल नही होतात.आम्ही तितूरनदीना थडीले गवूत.तठला दगडसवर थोडं खिनूत नि शेजारे लायेल की ना वावरमाधून आमना भांडा भरीसन घर येवाले निंघनूत.एक मांगे एक आमन्ही गँग चालाले लागनी.डोकावरला हांडा बिगर चोमयना जड लागे.समदा धाकल्ला गडी शानासारखा वागी रायंतात.रातले नदीमा बेकार भूतं नाचतसं आसे आमन्ह बोलनं होयेल होतं.समदासना मांगे मीच होतू.जोरमा वारा वूना भो.झाडं हालाले लागनात.मी घाबरी गवू.

"बापरे...वुनं रे भौ..पया..!" मी जोरमा आल्लायनू.

          मी पयाले लागनू.बाकीबी घाबरी गयात.जो तो जथेपथे हुयी गयात.पयाना पायरे लेलं पानी सांडायी गयं.मांगे काहीच नही होतं हायी समजेलवर मी समदासना गायासना धनी झावू.

        गावमा आमन्ही सवारी येताच.आम्ही परत गावनी हायवरून पानी भरी घर गवूत.गल्लीमा बठेल आप्पानी,

"पोरसहोन धोंड्या,धोंड्या पानी मांगा भौ..तरच पानी पडी बरं..काहीजन महादेवले भुलाडा.तेले पानीमा झाका तर तो पानी पाडी.." 

      आम्ही समदा हा म्हनत घर गवूत.भांडा घर ठेवात.परत गल्लीमा  उनूत नीमना डकसा तोडी तोडी कंबरले बांधाले लागनूत.आंगना कपडा काढी टाकात.हातमा काठी लिसन तयार झायी आमन्ही गँग.वाजाडाले कोनी ताट लिना,कोनी डब्बा.आम्ही गानं म्हनाले लागनूत...

"धोंड्या,धोंड्या पानी दे,

साय माय शिकू दे"

तदलोंग आप्पानी सांग..

"साय माय पिकू दे" बोला..

         गल्लीना हरएक घरपा जायेल वर लोकं खुशी खुशी तांब्याभर का असेना आमन्हा डोकावर पानी टाकाले लागनात.इतका दुष्कायमा कोनी कोनी भरेल कयशी हांडा ओताले लागनात.आम्ही देवले यीनवन्या करी रायंतूत.थंड पानी आंगवर पडनं की भारी वाटे.पोरं आपापला पोतडीसमा गहू,बाजरी जे धान्य दिनं ते जमा करी रायंतात.आम्ही एकेक गल्ली फिरनू होतूत.परत गल्लीमा येलं वर आभायकडं देखं तं.देवनी कायी मनवर लेल नही होतं.

"बरं भौ,आते गावना महादेवले साकडं घाला तुम्ही.हांडा,कयशीकन भरीच टाका.देखा कसा पानी पडस नही ते.आम्ही तेच करूत.पानी हमखास पडे..." आप्पा बोली गया.

      आमले पोरसले कोठे दम धीर होता.लगेच समदा गावबाहेर पयनात.महादेवना मंदिरमा जाताच सफाई करी टाकी.पानी जावाना ठिकानले बोया दी टाका.पहिलेच थकेल होतूत.आते परत हायी काम होतं.

      आम्ही महादेव बुडावाले सुरूवात करी.जो तो पानी टाकाले लागना.आते गावमाधूनपन लोकं येवाले लागनात.कोनी घरतून पानी आनेल होतं,कोनी वावरमाधून आनी रायंत.महादेव बुडावानी बातमी पसरी जायेल होती.समदा डोया तानी देखी रायंतात आभायकडे.नाइलाज होता लोकसना.भोया महादेवना गजर करत लोकं दनादन पानी ओतेत.आमले बेकार मजा यी रायंती.तित्तूर नदी,धोंड्या नि आते भोया महादेव समदं एख्खठेच येल होतं.

     आते महादेव बुडाले लागना होता.बाया मानसं आपापला भांडा लिसन परत मंदिरसमोर उभा राहिसन,

"हर हर महादेव,बम बम,भोले,शंकर महादेव की..जय" असा गजर कराले लागनात.बामनदादानी आरती करी होती.कोनी बेलसना पाला व्हायेल होतात.आते समदा घरोघर निंघनात.

         संध्याकाय होयनी होती.वातावरनमा बदल झाया.देव गरजाले सुरूवात झायी.गावमा आनंद झाया.काया काया ढग जमाले लागना होतात.आम्ही दुपारलेच धोंड्या बनेल होतूत.महादेव पानीमा होता.आते आस लागेल होती.थोडासा शिडकावा पानीना पडना होता.परत आम्ही गल्लीमा नाचाले गयतूत पन जास्त काही पानी होयना नही.दुसरा दिन परत रायेल लोकं महादेवले पानी टाकी वुनात.आज बेकार गरम हुयी रायंत.दुपारलेच भयान पानी पडना.महादेवनी तिसरा डोया उघडेल होता.पानीनी आबादानी झायी.लोकं खुशी खुशी कामले जावाले लागनात.आम्हीबी महादेवले लायेल बोया काढी टाका.समदं पानी काढीसन आरती म्हनीसन,नारय फोडीसन.पिंडवर डोकं ठीसन पानीमाच घर उनूत.

"का रे धोंड्यासवोन तुमनं देवनं आयकं बरं..!" राजमल आन्नानी बैलगाडावरूनच आमनं कौतुक करं.

@गिरीजादूत 

9665911657

#आमनं_धाकलपन

Comments

Popular Posts