पंडाय



 'आमन् धाकलपन'

पंडाय

       देव चांगलाच भरी येल व्हता.संध्याकायना भांडा घसडाना नि आंगन झाडानं काम हुयी जायेल होतं.कालदिनच धाबावर खारीनं गाडं चढायेल होतं.गल्लीना समदासनी खारी एक कप चहावर पसारी देल होती.आते देवना पानी कितलाबी पडना तरी काही भेव नही होता.लोकसना दनादन कामं हुयी जायेल होतात.मझार मझारमा पडनारा पानीनी लोकसना हातले काम देल होतं.शेतीबाडीना कामसाठे आते खरी आसं होती पानीनी.

        गल्लीमाधला पुंजा तगारीमा भरी उखल्लावर टाकाले जानं होतं.दरवाजानी कडी लायीसन ओसरीमाधलं गंडकडं हाकली गानं म्हनतच जावाले निंघनू.तगारीना बुंधडालेच भोक पडेलमुये आरधा पुंजाच मन्हा डोकावरून पायलोंग गंगी आंघोय करी रायंता.कसाबसा पुंजा उखल्लावर फेका नि देव गरजना जोरमा...

क..ड....डड...!

        बेकार घाबरी गवू मी.दनदन पानी पडाले लागना.जाडल्ला शितडा आंगवर पडाले लागनात.पानी इतला जोरमा पडाले लागना ते पयत पयत घरी जात नही तदलोंग वल्लाचिंब हुयी गवू.देव बेकार पडी रायंता.घरनी कडी उघडी तं घरमा सानाकन पानी पडी रायंतं.मी घाबरी गवू.सानं झाकानी याद पडी जायेल होती.मी पटकन घरना बाजूले ठेल दगडसवरून धाबावर चढनू.सानं पत्तर ठी झाकी काढं.धाबाना वंडीसवरून बागे बागे खाले उतराले लागनू.वल्ला दगडवरून पाय सटकना तसा दगडसमद खाले घसडायनू.कोनीच देखं नही म्हनीसन घरमा पयनू.घरमाधलं पानी पटकन झाडं.घोडसल्लीवरलं गोनटं काडीसन पुसाले लागनू.पानी बेकार हुयी रायंता.

       इंजा चमकाले लागन्या होत्यात.वावरना लोकं गावमा घुसी रायंतात.बैलसन्या घंट्या घनघन वाजी रायंत्यात.ढगसना आवाज तं घरमाच भ्यावाडी रांयता.वावरन्या बाया घर येवाले लागन्या होत्यात.मायना आवाज वूना.माय समदी वल्ली हुयी जायेल होती.मायनी आरायी ठोकी,

"बाप्या,बाहेर चेटना.हाऊ पंडाय देख..!"

         मी हातमाधलं गोनटं सानाखाले टाकीसन बाहेर पयनू.देखस तं पंडाय फुटी जायेल होता.समदी खारी खाले यी रांयती आसे वाटे.मायनी पटकन वल्ला कपडासनच वाडामधल्या थोड्या तुरकाठ्या,उसनी पाचट काढी.म्हाले धाबावर चढानं सांग.मी परत दगडसकडे जावाले लागनू.धाबानी खारी पंडायमाधून आंगनमा पडी रायंती.गल्लीमाधली वल्ली खारीवर पाय जाताच परत सपकायनू.मायनी परत गाया लांबाड्यात.देवना पानी काही कमी होवानं नाव ले नही.तेनमा पंडायमाधून कालदीन टाकेल खारी पडी रायंती.मी धडपड करीसन उठनू.पटकन धाबावर चढनू.धाबावर जाताच टाकेल खारी देखी.ती मस्त बठी जायेल दिसे.

       वंडी वंडीकन जात मी पंडायपा गवू.पंडायना खालूनच पानी जायी रायंतं.मी तठे बसनू.वरून पानी दनादन लागे.कायाज्याम ढग भ्यावाडेत माले.धाबाधाबासवर लोक दिसेत.गल्लीसमा पानी माये नही.डोकावरलं पानी तोंडपा उनं की मस्त पेवायी जाये.ते भारी वाटे.समदं आंग आते पानी पानी हुयी गयं.परत पानीना जोर वाढना.जोरमा इंज कडकायनी...

"समाय रे बाप्या.शिलग पटकन खाले." म्हनीसन माय घाबरनी.

   मायनी पटकन तोरकाठ्या,उसनी पाचट फेकी.मी पटकन वर लेताच कामले लागनू.मी पटपट आते पंडायनी जागा कोरी.भर पानीमा हायी करनं पडी रांयतं.तोरकाठ्या,उसनी पाचट ठेलवर मायपासून मन्ही कचकडाना कागद लिना.तो पाचटखाले ठेवा.पत्तरना पंडाय तेनावर ठेवा.पुढला टोकना पंडायना पतरा दोरीकन बांधा.पानी दनादन आंगले लागी रायंता.कामपन पटपट हुयी रायंतं.संगयेल पानी एक बाजूकन खाले पडी रायंतं.आते पंडाय मस्त बठेल होता.ते काम होयनं होतं.पंडायना समोरनी माती आजूबाजूले लावताच पंडायमाधून खारीनं चहासारखं पानी खाले जावाले लागनं.पटकन मी पंडायले सवरावं.धाबाकडे देखं धाबावरनं पानी पटकन पंडायकडे यीसन गल्लीमा जायी रायंत.भर पानीमा हायी समदं होयनं.खाले येताच मायनी कौतुक करं.गल्लीमाधली धाबानी खारी बाजूले लायेल होती.घरमा हुयेल चिखुल मायनी आवरा होता.वसरीमाधली पंडायनी घान मी झाडी.पानी आजूनपन बेकार चालू होता.मायनी आते चुल्हावर चहा ठी दिना.देवना पानी आते कमी होयेल होता.आम्ही समदा भांवंडं आते कोरी चहानं पानी गटागटा पी रायंतूत.इकडे पंडायनी बी थोडा इसावा लेल होता.


@गिरीजादूत 

- भरत पाटील

9665911657


#आमनं_धाकलपन

Comments

Popular Posts