ढोरक्या
ढोरक्या
पारोयाना रथले जावानी आप्पानी तयारी चालू होती.दरवरीसले आप्पानं जानं फिक्स राये.दुनियाले काही होई जावो तिकडे पन आप्पानी वरीसमाधून एकदा देवनं दरशनले आनी बहिनकडे जावालेच पाहिजे.हाई काया दगडवरली रेघ होती.आप्पानी आपला समदा कपडा रातलेच पिसोडीमा घालात.आप्पा एकदम मजामा होता.
"विमलताई..! ओ विमलताई..! कालदीन विठ्ठल आन्ना पारोयाले जाई पन ढोरसना मांगे कोनी मानूसच भेटना नही बरं.समदासले काम सेतस.मन्ह बी जमनार नही से.आन्नाले मांगेतून जावाले लावस का.." जिभू खाटवर बसता बसता बोलना.
"वरीसमाधून एकदाच जाई मी..." आप्पानी संतापमा वाढेल ताट सुशामायना भिताडाले फेकी मारा नि तनतन करत झोपाले मयामा निंघी गया.जिभू,माय नि आम्ही आप्पाना संताप देखी काहीच बोलनू नहीत.
आप्पाले भयान राग येल होता.आप्पाले राग उना की त्या घरना चुलानी,नही तं सुशामायना भितडानी गंगे आंघोय त्या दिवस फिक्स राये.संतापमा चहा,भाजी,भाकरी फिक्स फेकायेत म्हनजे फेकायेत मंग दिवसभर पोटले काहीच नही रायन्ह तरी चाले.आसा आमना आप्पाना संताप होता.आप्पा खरच नाराज होता.वरीसमाधून एकदाच पारोयाना रथ नि तेना निमित्त बहिनकडे दोन तीन दिवस जावाले भेटे.तेवढंच आप्पा मनसोक्त जगी ले.नही तं आपला ढोरं भला नि आपलं काम भलं.
जिभू निंघी जायेलवर मायनी मन्हाकडे मोरचा काढा.मायनी माले ढोरं चाराले जाय आसं सांग.याय खाडा पडाले नको म्हनीसन माय माले सांगाले लागनी,
"देख,डोकावर करजं से.तुना आप्पाना रोज खाडा पडनात तं पैसा कापायी जातीन.तू तुना आप्पाना वाटनं ढोरं चाराले गया तं याय कापावनार नही."
ढोरं चारानं नाव काढताच मन्ह डोकं फिरी गयं.मया शायना रस्तालेच होता.वरगमाधला पोरं पोरी काय म्हनतीन,गल्लीना,गावना लोक ....मी या विचारमाच होतू.तदलोंग मायनी डेअरीवर जिभूले मी जासू आसं सांगी दिनं.माले समजताच मी तनफन कराले लागनू.मायनी समजाडं.नही समजनू म्हनीसन वाढेल ताटवरून हाकली दिनं.थोडा टाईममा परत माले समजाडं.ताट वाढा नि मी तयार झावू.
मी पहिलांदाच ढोरं वायाले जानार होतू.ढोरंसपेक्षा शायमाधला पोरसनीच जास्त चिनता होती माले.त्या काय म्हनतीन..
झापटामाच मायनी माले उठाडं.मयामा आप्पाकडे जावानं सांग.आप्पाले निरोप देवाले नि ढोरसनी शेनपुजा करी येवाले सांग.मी मयाना रस्ताले लागनू.कुत्तला भुकी रायंतात.थंडी वाजी रायंती.कोंबडा लोकसले उठाडी रायंतात.परसाले जानारा म्हताराना मांगे मी जावाले लागनू.मयाना रस्ताले लागताच पटपट पाय टाकले लागनू.जीव घाबरी रायंता.समोरला झाड भूतसारखा वाटी रायंतात पन धडधड पयाले लागनू.एक कुत्तल्लं जोरमा डि.एस.आप्पाना गेटपा मांगे सुटनं.ते जितका जोरमा भुकनं तेनापेक्षा जास्त जोरमा मी हाडडडडडड ....बोलनू नि रडाले लागनू.कुत्तल्लं पयी गयतं.आप्पा मन्हा समोर उभा होता.आप्पाले निरोप दिना.आप्पा भयान खुश झाया.
"ढोरंसन कोन देखी..!" आप्पा ढोरसकडे देखी बोलना.
"मी..!" मी बोलनू.आप्पाले नवल वाटनं.आप्पा काहीच बोलना नही.नि शेनपुंजा कराले लागना.
आप्पाले देखता देखता मी बी ढोरसना शेनना पो डालकीमा टाकाले लागनू.आप्पाले मदत होयनी.खट्टा ली सन झाडाले लागनू.म्हशी,बैलं,गायी,वासरू,पाल्लू समदं होतं मयामा.समदा ढोरसना मालक आप्पा नि आप्पाना मालक आन्ना..नि आते मी दोन दिवस ढोरसना मालक व्हनार होतू.शेनपूंजा आवरायनी आप्पासोबत घर उनू.
आप्पानं आवरावताच मायनी आप्पाले भाडाले पैसा दिनात.त्या परत येत कारन आप्पा लवटार ते पारोयं पाय पायच जाये.दोन पैसा वाचडणारा तो जिवडा होता.आप्पा आपली पिसोडी उचलीसन रस्ताले लागना.आप्पा भयान खुश होता.आप्पा जाताच माय रांधाले लागनी.माले धुडकामा भाकर बांधी दिनी नि दहा वाजताच मयामा ढोरं चाराले पयाडं.
मयामा जाताच जिभूनी ढोरं कोठे चारानात ते समजाडं.१५-२० ढोरं असतीन समदा.मी जिभूसोबत सोडाले लागनू.समदासना दावा सोडात.ज्या मारेत तेसले गयामाधून पुढला पायले दोरं बांधात.जिभूनी एक यीवनी काठी हातमा दिनी.कोनतं ढोर मारस,कोनतं गरीब से समदं समजाडं.कोना वावरमा जावू देवानं नही हाईबी सांग.मी ढोरसले आते गावकडे हाकलाले लागनू.गलाटीमा चारता चारता धरनना आजूबाजूलेच चारना होतात ढोरं.तेबी शायना समोरच.ढोरंसले काठी मारी मारी,हुड हुड करतच पुढे काढात.गावकडून येनारा गाडाबैलं,बकऱ्या,ढोरं देखीसन घाबरी जावू.आते कसं हुयी पन ढोरं हुशार होतात.त्या वाट काढीसन पुढे जायेत.शायनी भित लागताच मी एक म्हैसना आडे आडे चालाले लागनू.पोरसले दिसाव नही म्हनीसन पन पोरसनी देखंच माले.गल्लीना पोरससोबत शायना पोरबी खिजाडाले लागनात..
"ढोरक्या..ओ ढोरक्या...म्हशी देख रे..वाय तिसले.." त्या बेकार हासी रायंतात.
माले लाज वाटी रायंती.मी खोटं खोटं हासू आनत मी येनार नही आते दोन दिवस आसे सांगी टाकं.ढोरं आते महादेवना मंदिरपासून गावनी हायवर पानी पेवाले घुसनात.पानी पेताच तेसले मी गलाटीमा हाकलं.समदा ढोरं गलाटीमा चराले लागना होतात.ढोरसनं पोट भराले पाहिजे म्हनीसन मी धाकल्ला वासरू,पाल्लूसले बयजबरी हिरवा गवतकडे गचालू पन त्या काही जाये नहीत.मोठ्या म्हशीसनी एक ठिकाने चराले पाहिजे म्हनीसन काठी मारी मारी पयाडू पन तेसले पटे तेच करेत त्या.मारा मारामा नि हातघाई करामा एक म्हसडीनी मन्हा पायवर तिना पाय ठेवाताच बेकार आल्लवनू मी.वरली कातडी सोलायी गयती.आरधा जीव शायमा नि आरधा जीव ढोरसमा लागे.मजा करानी म्हनीसन म्हैसना आंगवर बठाले करू पन दोन तीनदा धडपडेलवर बसनच बंद करी दिनतं.
चारता चारता आते दुपार व्हयनी.दोन नी एसटी जाताच मी खयवाडमा जेवाले बसनू.गल्लीना परसावाला इकडेच येत.त्याच काय आम्हीबी इकडेच येवूत.नल्लामा काही घास जाये नही.आनेल भाकर बांधी टाकी.पुढे ढोरसले हाकलीसन शेजारना कपासीना वावरमा वडांग बाजूले करीसन जेवाले परत बसनू.ढोरं नदीमा चरी रायंतात.मी इकडे चरी रायंतू.भूक जोरमा लागेल होती.तिखट,कांदा नि बाजरीनी भाकर मस्त लागी रायंती.ढोरं हिरवं गवत खायेत नि मी इकडे हिरवी बाजरीनी भाकर.भारी वाटी रायंतं,थोडा टाईममा घर जावानं होतं.याय भरी जानार होता.तेवढात...
"येसनी मायनी....., या ढोरक्या सेतना सुधरावूतच नही,सतरा दा सांगेल से.तिकडे सिलगाडात जा रे ढोरं.आयकतचस नही ह्या." वावरना मालकन्या दनादन गाया आयकाले उन्यात.मी कसाबसा भाकर सोडी पयनू नदीमा.पायमा काटा घुसना होता.बाकी ढोरं शांततामा चरी रायंतात.पन एक म्हैस शेजारना वावरना बांधवरलं गवत खाई रायंती.मी पटकन तिले तठून नदीमा काठी पाठोडामा टाकीसन ढकलं.आते बरं वाटनं होतं.तेवढात.डोकाले कोनीतरी मारं होतं,अचानक मारेलमुये घाबरी गवू.रडाले लागनू.त्या मानूसन्या यिनवन्या कराले लागनू.तेनी गाया नि मारनं काही सोडं नही.
"ढोरक्यासले कधी आक्कलच येनार नही.तुनापेक्षा तुना बाप तरी बरा बिचारा.तो तरी कोना बांधवर ढोरं चारत नही." तो मानूस बेकार बोली रायंता नि...
"ढोरक्या साला कधी सुधराव नहीत.ढोरक्याना पोरं ढोरक्याचं बनतीन.कधी आक्कल येवो तं बरं येसले..?" तो संतापमा बांधवर काठी लिसन बोली रायंता.
मी पटकन ढोरसले पुढे हाकलाले लागनू.ढोरं आते गावकडे येवाले लागनात.आरधी भाकर वावरमाच होती पडेल.पानी काही पेवायेल नही होतं.तिस लागेल होती.ढोरसले हायवर पानी पाजाले आनं.हायनी मोटर सुरु होती.पटकन पईपले तोंड लावं.पानी ढोसलाले लागनू.समोर ढोरं पानी पी रायंतात नि मी इकडे पानी पी रायंतू.तेसलेबी मस्त वाटी रायंतं नि मालेबी...!
पहिला दिवस भरी जायेल होता.ढोरं परत शायकडून मयाना रस्ताले लागनात.तेसले आते हाकलानी,हुडडड करानी गरजच नही होती.शायमा खेनारा पोरं परत खिजाडाले लागना होतात.मी आते दोन्ही खांदासवर काठी ठेवत नि काठीवर हात ठेवत ढोरसना मांगे रुबाबमा पोरसले टाटा करत चाली रायंतू.पन पोरी येताच सरमायी म्हैसमांगे लपत लपतच मयामा ढोरं घालात.ढोरं बांधीसन घर उनू.माय खुश होती.आप्पाना याय खाडा पडेल नही होता.पन तो वावरवाला डोकमाच बसेल होता.मायले समदं सांग.माय खाटवर डोकाले हात लावत बोलनी,
"देख कोनी ढोरक्या म्हननं म्हनीसन काय तू ढोरक्या बनना का? तू ढोर चाराले गया म्हनीसन तुले त्या ढोरक्या बोलनात.तू चांगला अभ्यास कर.मोठा व्हय नि नोकरीले लाग.नही तं सेतसंच आपल्या आन्नान्या म्हशी.देख कर विचार..ढोरक्या बनानं की नही.."
मायले आयकता आयकताच कवय झोप लागनी तेच समजनं नही.दुसरा दिवस झापटामाच मयामा गवू.शेनपुंजा आवरीसन दुपारे तितुर नदीकडे ढोरं चारी लयनू.कालदीसपेक्षा आज सोप्पं होतं.ढोर वयखीना होतात नि ढोरसले मी.गल्लीना पोरं आते शायना भितडावर चढीसन,
"ढोरक्या चालना भौ आज बी ढोरं चाराले.." म्हनीसन खिजाडाले लागनात.मन्हापन आज शेवटना दिन होता.आप्पा आज संध्याकायले येनार होता नि आपली सुटका होनार होती.पोरसकडे हासतच मी ढोरसले हुडडड कराले लागनू.
- भरत विठ्ठल पाटील
9665911657
#आमनंधाकलपन
#ढोरक्या



खूपच छान दादा
ReplyDelete