पारजाक्ताना फुलं
#आमनं_धाकलपन
पारजक्ताना फुलं
गनपती बाप्पाना दिन होतात.समदासकडे घरना वट्टावर गनपतीना डोंगर बनाडानी काढाकाढी लागेल होती.कोना गनपती उच्चा नि कोना मस्त सजाडेल राही येनाकडेच समदं ध्यान राये.आम्ही ते या गल्लीमाईन त्या गल्लीमा जाईसन चिंग्या लावानं काम करूत.येना इतला भारी डोंगर,तेना तितका भारी से म्हनीसन.काम करनारा गडी परत जिदवर लागेत कामले.आपला घर कधी बाप्पानं बठनंच नही होतं.तेनामुळे जेनी काम सांग तेनं करीसन मोकय्य होवो हा सिरस्ता ठरेल राये.
आम्हना गल्लीमा चिंधाबाबाना घर आनी शेजारेच राजमल आण्णाकडे आसीच डोंगर बनाडानी काढाकाढी लागे.भयान मस्त बनाडेत दोन्ही घर.सकाय संध्याकाय आरती करानी मजा ये.रातले नाचानी.गल्लीना आम्ही समदा डाखू एक ठिकाने जमनूत की गल्ली कशी लाईटींगसारखी झगमगाट करे.त्या ढोरं तरी कमी आल्लावत होतीन पन आम्ही समदा आरधं गाव आराया मारी,खेईसन जागं करूत.तेनामुळे समदाच किदरीसन आमले गलाटीमा म्हनजे आमना गावनी नदीमा खेवाले हाकलेत.आम्हीपन बेकार होतूत लगेच शहानासारखं मोकय्य नदीमा खेवूत.खेता खेता भावडूनी पारजक्ताना फुल गनपतीले आवडतंस आसं सांग.मजानी माय येस म्हने.वास पन भयान भारी येस असं तेनी सांग समदासले.
पारजक्ताना फुलंसन झाड मठमा होतं.मठ म्हणजे आमनं चतुरभूज महाराजनं मंदिर.तेना समदा कारभार शंकर बाबाकडे देल होता.बाबा काही धाकल्ला पोरसले मठ मझार येऊ दे नही भौ.जेनी वयख पायख से,धल्लाना बैठकना गडीसले काही टेन्शननं काम नही होतं.सकाय संध्याकाय बाबा मंदिरले कुलूप लाई ले.धोतरले चाबी बांधी ठे.तेनामुये आमना नाईलाज होता.मंदिरना भितडाबी गनज उच्चा उच्चा होतात.समदा इचार कराले लागनात.तेवढात बोलता बोलता...
"अरे,गनपती बाप्पाले आवडस ना.मंग काय इचार करतंस.भितडा कुदीसन जावूत संध्याकायलेच.शंकर बाबाना पहिले जावूत आनि पटकन पई येवूत.आसेबी बाबाले कमी दिखस." जिभूनी समदासले भरी दिनी.
जिभूनं म्हननं समदासले आवडनं.मंग काय इचार कराना होता.लगेच मठकडे जावानी आम्ही तयारी करी.जिभू,निलू,भोलू,भैया,उमेश,कैलास,भावडू,आन्ना मी समदी गल्लीच मठकडे जावाले लागनी.शंकरबाबा गावबाहेरच वडखाले बठेल होता.बाबाले समजाले नको म्हनीसन आम्ही शायमा गवूत.तठे समदासनी पिल्यान करा.कसं जावानं मठमा.शायना भितडा कुदीसन मंदिराना मांगून जावानं नि फक्त फुलं तोडीसन येवानं आसे ठरनं.निलूनी कचकडानी पिसवी खिसामा घाली.आम्ही एक एक मठना भितपा उनूत.
मठनं भितडं उच्च होतं.तेनामुळे एक एक जन एकमेकसले खांदावर लिसन चढावाले लागनात.कोनी भितडाले खड्ड पाडीसन पायना बोटं मावतीन एवढी जागा करीसन भितडा चढनात.परत खाले उतराले उड्या मारन्या पडन्यात.एक ठिकाने भितडं पानीपाऊसमुये धसेल होतं.तेनामुये काही तठूनच बागे बागे मठमा उतरनात.पारजाक्ताना फुलसना वास भयान भारी येई रायंता.दत्त मंदिरकडे ध्यान जाताच पारजक्ताना फुलसना सडा मस्त वाटी रायंता.आम्ही दहा बारा जन मठमा चोरीदपी घुसनू होतूत.निलू,भैय्या आम्ही समदाच पारजाक्ताना फुलं जमा कराले लागनूत.काही चतुरभूज नारायन महाराजनं दरशन लेवाले गयात.काही कोपरा माधलं घंटीनं फुल म्हणजे जास्वंदीनं फुल तोडाले लागनात.काही पकडापकडी खेवाले लागनात.एक जन भितडाना वरे बठीसन शंकरबाबाले देखाले थांबेल होता.
आम्ही पटापट फुलं पिसोडीमा टाकाले लागनू होतूत.गारेगार वाटी रायंत तठे.वरला गडीनं समदं ध्यान आमनावर होतं.तेवढामा शंकरबाबानी बागेच मंदिरना लोखंडी दरवाजा उघाडा,नी चार पाच गाया आमले लांबाड्यात.समदा चिनभिन व्हयनात.भितडावरला गडी लगेच पसार झाया.आम्ही पयाले लागनूत कोनी चतुरभूज मंदिरना मांगे,कोनी पडेल भितडावरून,कोनी गनपती मंदिरवर चढी,कोनी शनि महाराजना मंदिरकडून,कोनी थेट शेजारना वावरमा पयनात.मठमा बाबाले खिजाडाले आन्ना,उमेश,भोलू पुढे होतात.तेसनामा होता जिभू.मधमा त्या गरागर पयेत.आम्ही भितडावर दात सोली रायंतूत.निलूना पिशवीमाधला फुलं मठमाच पेरायेल होतात.काही पिशीमा होतात.तेनमाच बाबान्या गाया दनादन चालू होत्यात.बाबानी लगेच हातमाधली काठी उगारी आन्नाकडे फेकी.काही लागनी नही पन दुसरांदाव जिभूना पोटरीसवर बरोबर भितडं चढतांना बसनी.जिभू जोरमा आल्लावना.शंकर बाबाले आते जिभूकडून गाया भेटन्यात.समदा पटपट भितडा कुदनात.जथा रस्ता भेटी तथा पयाले लागनात.
गावमा गनपतीनी धूम चालू होती.टेपरेकॉर्डरवर बाप्पाना गाना वाजी रायंतात.समदासले आनंद होयेल होता.आम्ही इकडे दाथडा सोली सोली लंबा घुसी जायेल होतूत.पारजक्ताना मुठभर फुलं सोबत होतात.फुलं लिसन भावडूना घर काही जाता उनं नही.शेजारेच शंकर बाबा राये.आम्ही भावडूले काही फुलं दिनात.काही निलूकडे गनपतीले फुलं ठेवाले ली गवूत.आरती करीसन जवय घर उनू तवंय परत परत शंकर बाबाले घाबरी घाबरी दारना फटमाधून देखू, पन बाबा काही घर गराना लीसन काही उना नही.बरं वाटनं होतं.
पन त्या दिवस बाप्पाले पारजक्ताना फूलं वावाडानं सुख भेटेल होतं.
- भरत विठ्ठल पाटील
9665911657
#आमनं_धाकलपन



Comments
Post a Comment