लहर

 #आमनं_धाकलपन


                लहर


       दुपारना टायीम होता.गल्लीना समदा गडी लपाछपीना खे सरताच नानासोबत गावमा जावाले निंघनात.आज भलतच घडनार होतं.गावमा जातांना खिदी खिदी करनं आमनासाठे नवं नही होतं.गल्लीना लोकसना टाक्या वाजडनं काय नि हागाना डब्बा इकडना तिकडे करानं काय समदं सहजच घडे तवय.समदा ग्यान्गवालाच चांगलं वाईटना इचार करनारा नही होतात.कोन कवय कोना फटका खायी,फुकटन्या गाया खायी तेना नेम नही होता.नाना समदासना पुढे होता.जिभू,निलू,उमा,भोलू,कैलू समदाच एकमांगे एक चालनू होतूत वानगल्लीकडे.


        विजय आबानी बिल्डींग देखाले तवय भयान भारी वाटे.पुढला घरपा कोनीतरी खोड करी.तठला शेजारना घरना बाबा बाहेर निंघताच समदा चिनभिन व्हयनात.आते आम्ही भितडाना आडे लपेल तीन चार जन रायनूत.नानानी बाबाना घरमा जावाना सुगावा लिना.नि लगेच जावाना इशारा करा.पुढे लगेच दुकान व्हतं.नानानी लतपरमाने खिसामाधून पैसा काढीसन लहरनी पुडी लिनी.समदासले इचारं,


"खाश्यात का रे थोडी थोडी...?"


     समदासले हायी नवीन होतं.नानानी लगेच समदासले एक एक पोंगा ली दिनात.आम्ही भयान खुस झावूत.तसा नाना आम्हले भयान जीव लावे.आम्ही एकमेकसले दाखाडी दाखाडी पोंगा खादात.उमेशनी दुकानदार बाबालेच पोंगा दाखाडात.खावाले लागना नि फुकटनं बोलनं खायीसन आमनापा तो दाथडा काढतच वूना. 


       आम्ही समदाजन वानगल्लीमा होतूत.तठे एक पडेल घरपा आम्ही थांबनूत.नानानी लहर फोडी नि थोडी तोंडमा टाकी."वा" म्हनीसन हिरो स्टाईलमा समदासले परत खाई देखा रे बोलना.


"बेकार मेंदू चालस आपला.फ्रेश हुई जातस आपन." नाना दनादन मोठं भाषन देवाले लागना.आम्ही समदाजन आते तेनामा फसनूत नि...


जिभू,निलूसकट मी पन लहरना दोन दाना तोंडमा टाकात.तोंडमा बेकार कसंतरी झायं.पन हिरोगत दोन बोटेसना मधमाधून थूकाले लागनूत.काहीसनी ते जसना तसं फेकी दिनं.नुसतं थू थू झायं.समदासन डोकं गरगर फिराले लागनं.माले ते वानगल्लीना धाबाना घरच दोन मजली दिखाले लागना होतात.तिकडे जिभूनी पोटमाधलं समदं बाहेर काढं होतं.उमेशना पन त्याच हाल होतात.इकडे नाना आमना हाल देखीसन पोट धरी धरी हासी रायंता.


"आते,खाश्यात का रे..... वन्..." तो आते गायी दिसन आम्हले समजाडी रायंता.तेना चक्कर काही समजना नही तवय.पन आते समजस.


       हाई गम्मत समदा गल्लीमा माहित झायी.समदा लहर खानारा कानोडा झायात.समदी लहर आते घरपावत गयी.समदासले दे बत्ती घर भेटनी.जेना घर लहर गयी.तेनी लहेर पाठोडावर निंघनी.दनादन तवय काड्या तुटन्यात.रातनं जेवन नही भेटनं काहीसले.तेरोजना दिन नि रात समदी डोयासमोरून आजपन हालत नही.


        पुढला दिन.हाक मारी की जाय दुकानवर.हाई नवीन नही होतं आम्हले.वान्याबाबाना दुकानवरून लहर लिनी नि राजूमामाना हातमा टेकी.मामानी मस्त तिले फोडी.हातमा लिनी.थोडी झटकीसन गपकन तोंडमा टाकी.लहरना वास मन्हा नाकमा घुसना.थोडंस चक्कर येलसारखं झायं.तो हासना नि दोन बोट तोंडमा ली गया नी गपकन पिचकारी ठोकी तेना कामले गया.लहरनी गम्मत समदाकडे चालूच होती.कोनी लहरना आशिक तर कोनी आज ना आशिक होतात.लाल 'लहर' नि निय्यी 'आज' भलताच तवय भाव खायेत.पचापच कानाकोपरामा लहरना,आजना आशिक थुकेत.तो गुटखाच न्यारा होता.पन आम्हना पाठोडा काही कमी सुजना नही होतात त्या दिन...!


#आमनं_धाकलपन


- भरत पाटील

9665911657

Comments

Post a Comment

Popular Posts