कुयीक
कुयीक
दुपारनं आंग समदं गरम वाटी रायंत.कधी संध्याकाय हुई नि माय वावरमाधून घर ई आसे वाटी ऱ्हायतं.थंडीनं वारगं आंगले लागताच हुडहुडी भराई ये.आंगनमाधली नारयना दोरीनी आमनी धाकली खाट वटावर टाकी.घरमा जाईसन गोधडी लयनू नि पडनू तसाच खाटवर.पडताच तावमुळे कव्हय झोपनू तेच समजनं नही.
"देख वं विमल,हाऊ पोऱ्या काय तावमा फनफनी ऱ्हायना.कुयीक लागनी हुई तेले कोनी." सुमनमाय आंगले हात लावत बोलनी.
मायनी आंगले हात लावा.घरमा गई.दिवाबत्ती करी.
"हावं माय,ताव तं गनज से येले."
माय लगेच पदर खोसत डाक्टरीन ताईना घरकडे गई.आथा मी ताव मा घाबरी रायंतू.
डोयासमोर पानीना लाटाच लाटा येत.तेनामाधून कोनीतरी बाई ये नि मन्हा हात पकडी ओढे.नि म्हने,"चाल रे,चाल..."
मी घाबरीसन....
"व मा,व मा..! हाई ली चालनी माले.वाचाड माले..! म्हनीसन खाटवरून पयाले करू.
तेवढामा मायनी मन्ह पखोल्लं पकडीसन खाटवर बसाडं.माय घर येल होती.
"कोन्ही नही रे भाऊ.मीच से देख." माय माले समजाडाले लागनी.तावमा मी बडबडी ऱ्हायतू.
थोडं झोपनं की लगेच ती बाई डोयासमोर ये नि मोठ्या लाटासंगे मन्हा हात ओढे... मी घाबरी घाबरी उठू..कुत्तला न्यारा भूकेत.रातना किडा कोकायेत.डोया मोठा मोठा होयेत.माय आते घाबरी गयती.
माय मन्हा डोकावर हात ठिसन बोलनी,डाक्टरीन ताई म्हने,
"विमल,ह्या दहा रूपया ले.त्याले डॉक्टरकडे ली जाय."
पन परत ताईले त्या पैसा वापस करनाच पडतीन ना.म्हनीसन काही लिना नहीत भौ..!"
माय आते खाटवरून उठनी.घरमा गयी.घरमा खाले गोधडी टाकी.माले घरमा झोपाडं नि चुल्हावर ठेल दिवामा घासलेट टाकाले लागनी.बराच टाईम हुई जायेल होता.आज दिवा भरेलच नही होता.तेनामुळे मायनी बुदलीमाधून थोडं दिवामा घासलेट ओतं.दिवा भडकाले लागताच मायनी चुल्हामाधलं राखोंडं तेनावर टाकं.लगेच तेनं भडकनं बंद झायं.
मायनी परत ताव देखा.ताव काही उतरेल नही होता.मायना चेहरा उतरी गयता.लगेच माय लगबग कराले लागनी.
मायनी कसांडी काढी,परात लिनी.गोखलामाधून कागदं काढात.बाहेरून चप्पल लयनी.कोपरामाधली झान्नी लिनी.गल्लास,तांब्यामा पानी भरं.थोडं थोडं मीठ,तिखट ताटलीमा लिनं नि माले उठाडं.
"बाप्या,बस रे भौ आठे."
मी बसनू.मायनी आते मन्हा आंगवरून हात फिरावा.समोर परात ठेल होती.तेनामा पानी होतं.मायनी आते लेल एक एक वस्तू सात सात दार मन्हा आंगवरीसन उतारी.कसांडीमा कागदसले चेटाडं. तिले परातमा उलटं मारं.आते तिनावर झान्नी,चप्पल,तांब्या,गल्लास ठेवत ठेवत मस्त एक वर एक रची ठी दिनं.लगेच परातमाधलं पानी थोडं थोडं कमी होवाले लागनं,माय बोलनी...
"देख वं माय,कोनता रांडम्यानी कुयीक हुई गयती मन्हा भाऊले."
मायना बोलमुळे अन् त्या शेकमुळे आते हालकं हालकं वाटी ऱ्हायतं.मायनी परात कोपरामा सरकाई दिनी.लगेच तठेच माले थापडाले लागनी.झोप कव्हय लागनी तेच समजनं नही.
सकाय होताच.माले बरं वाटी ऱ्हायतं.माय सुमनमायले कुयीकनी परात दाखाडी ऱ्हायंती.मायनी लगेच माले परातमाधलं पानी उखल्लावर फेकानं सांग.मी पयत पयत ते पानी फेकी दिनतं.आते मन्ही कुयीक उतरी गयती.मायपन खुश होती नि मी पन...!
#आमनं_धाकलपन
- भरत पाटील
9665911657


Comments
Post a Comment