रंगती
झापटमाच समोरला घरना कोंबडानी बांग दिनी.रामपायराले जानारसना पावलसना झपाझप आवाज येवाले लागना.माय उठनी.गोधडी उचकाडी बागेच बोलनी,
"उठ रे बाप्या.आयतवार शे आज.पटकन खाटीककडे जाईसन रंगती लयी ये."
थंडीना कडाकामा कोठे उठाये.हा करीसन आजून मी झोपी लिनं.मायनी चुल्लामा काड्या घालानं सोडीसन परत माले उठाडं.
"अरे,पटकन,ऊठ ना.लवकर जाय.पहिला बोकड्यानीच रंगती मांगजो त्या आजीपा.नीट ध्यान ठेवजो त्या भांडावर.कमी जास्त देखी लेजो."
डोया चोयत चोयत उठनू.थंडी बेकार घोमलायी रायंती.इतला थंडीमा पलाटमा जानं जीव्वर यी रायंत.घरमा जायीसन आप्पाना डब्बा लिना.तितलामा मायनी रुपया हातमा ठेवा.पटकन जावानी खुन करी.घरमा केरोजनी रंगतीनी भाजी शिजेल नही होती.तेनामुळे पुरा जीव तिनामाच होता आम्हना.
जावाले लागनू तवंय झापटच होती.एकच खाटीक आनि रंगती लेनारं पुरं गाव.
आयतवार म्हणजे रविवारले पुरा गावमा इसाडाना वास येवालेच पाहिजे.झपाझप पावलं टाकाले लागनू.झापटमा आंग शेकनारा देखाले लागनात.घरन्या बाया मानसं आपलं आपलं आंगन झाडी रायंतात.कोनी शेनना सडा टाकी रायंतं.कोंबडा गावले उठाडी रायंतात.थंडीमुळे कुत्रासनाबी आज आवाज बसी जायेल होता.जे कुत्र देखीसन भुके ते थंडीनं गपचिप कोपरामा आडं पडेल होतं.आज तेनापासून छातडं ताठ करीसन डब्बा दाखाडीसन खाटीक बाबाकडे जायी रायंतू.
खाटीक बाबाकडे उठानी तयारी सुरू होती.गल्लीमा गोधडी पंघरीसन एक धल्ला डब्बा ली बठेल होता.तो बोलना,
"उठ रे,गुलाब दादा.आयतवारनं तं लवकर उठस जाय भौ.उकाव पटकन.वावरमा चिड्या वायाले जानं से माले."
"पोटभर खायीलेज जाय दादा.चिड्या वायता वायता कथा भुरकन उडी जासी नही तं."
गुलाब दादा हातमा सुरी लेत धल्लाले हासीसन बोलना नि वाडगामा घुसना.
वाडगामाधला बोकड्यासले हात लावा आनि निवडा.
खाटीक बाबानी लगेच निवडेल बोकड्याले आडं पाडं.आजीबी सोबत होती.पटकन मालेपन बोकड्याना पाय धराले सांगात.मी पटकन बोकड्याना पायसवर मन्हा हात ठेवात.पक्क धर.तेवढामा बोकड्याना रंगतन्या चिरकांड्या उडन्यात.आजीनी लगेच माटीन्या दोन ताटल्यासमा रंगती जमा करी.लगेच दोघी ताटल्या लिसन वाडगामाधून दुकानवर लयनी.इकडे गुलाबदादा बोकड्या तयार करी रायंता.मी गंमत देखी रायंतू.थोडा टायीम होताच.आजी बोलनी,
"चाल रे पोऱ्या,कितलानी पाहिजे रंगती?"
मी पटकन रुपया हातमा टेकत आजीले डब्बा दिना.डब्बा एक रुपयामा पुरा भरी गयता.भयान भारी वाटनं.लगेच शेजारना मानूसले पन रंगती देवायनी.आजून दोन तीन जनसले पुढला बोकड्यासाठे थांबनं होतं.मी पटकन डबा लिसन वाडगाकडे टांगेल बोकड्याले देखाले लागनू.लगेच आजीनी हाटकं.
"होय रे घर पटकन.घरना वाट देखतीन ना."
आते थोडं उजायं पडाले लागनं होतं.
घर येताच मायनी.रंगती डालकाखाले झाकी ठी.माले आंग धोवाले पानी दिनं.आज रंगतीनी भाजी बहु दिनमा खावाले भेटनार होती.मायनी पटकन कामं आवरीसन बाजरीन्या भाकरी चुल्लावर ठोक्यात.आम्ही मायले पटपट काम आवरू लागनूत.मायनी मस्त कढायमा रंगतीना भाजीले तेल तिखटनी फोडनी दिनी.भाजी करीसन माय आते वखाना तपास कराले जमावाली आजीकडे जावाले लागनी आनि बोलनी,
"भाजीकडे ध्यान ठेवजो.नही तं घाली दे कुत्रमांजरना मढामा."
आते जो तो आपला आपला काममा होतात.मी पन थोडं चुलापा थांबीसन थोडाच घरमा घुसनू.मधमा जाताच माले मायनी सांगेल कामनी याद पडी गयी.बराच टायीम होयना होता.तेवढामा कढायना पडाना आवाज होयना.मी पटकन बाहेर उनू.देखस तं काय....
भुरी मांजरनी पुरी रंगती चुलामा कानी करेल होती.ती कढाय माधल्या रंगतीनी भाजी खाले मान घाली गपागप हानी रायंती मजानी.आथा मी कानाबाना हुयी गयतू.जीवनं पुरं पानी पानी होयनं होतं.मी भुरी मांजरकडे देखू अन् ती मन्हाकडे देखे...!
- भरत पाटील
9665911657
#आमनं_धाकलपन



Comments
Post a Comment