आमनी थरटी फस
आमनी थरटी फस्
"का रे,दुपारे चालसी का उम्याना वावरमा,थरटी फसनी पारटी कराले." निलू बोलना.
"देखसू भौ" मी घरकडे जात बोलनू.
घर यीसन मायले विचारं.पाच रूपया भेटनात कुथीकाथी.भारी वाटनं.पैसा गोखलामा ठेवात.शायमा जावानी तयारी करी.आज महिना आखेर होती,तेनामुळे शाया अडीचलेच सुटनार होती.दा वाजताच आमनी वाडानी समदी ग्यान्ग घरपा वूनी.दुपारनी पारटीनं बोलनात.जोरजोरमा बोंबली समदी गल्लीले जागं करत शायमा निंघनूत आते आम्ही.
शायमा जाताच पारटीना बेत रंगना.शाय आज नावलेच भरेल होती.मोठ्ठला पोरंसपासून धाकल्ला समदा आजनं पारटीना बेत आखी रायंतात.आम्हीपन कोठे मांगे होतूत.शायमा कोपराना निंबखाले समदा जमनूत.तठेच जिभूनी पारटीले येनारासनी यादी करी.जिभू,निलू,भोलू,कैलास,भावडू,भैय्या,उमेश अन् आमनी गल्लीनी बाकीनी समदी ग्यान्ग पारटीले येवाकरता नावं देवाले लागनी.पैसा जमा कराना ठरनात.समदासनी पाच पाच रूपया जमा करात.मी दुपारे देसू आसे सांग.
आते पारटी कसानी करानी? तेनाकरिता देवले काही खाले येवानी गरज नही होती.आमनी पारटी म्हनजे 'पाववडा' नी पारटी होती.आपला पैसा कसा वाचतीन म्हनीसन निलू बोलना,
"आपला पैसा वाचाडाना असतीन,तं समदासनी घरतून थोडं थोडं तेल जमाडा भौ."
"हा रे,कांदा,तिखट,काडीपेटी...जे जे लागस ते आपन समदा लवूत.आपले पाव तेवढा जास्त खावाले भेटतीन." उमेशनी तोंडमाधून बरोबर बान सोडा.
शायनी घंटी झायी.समदा दुपारे कोठे जमानं,कोनाकडे जमानं,काय काय आनानं ते ठरनं.समदा जेनातेना वरगमा गयात.तसं देखाले गयं तं मीच मांगला वरगमा होतू अन् आमनी समदी वाडानी ग्यान्ग एक वरगमा होती.सर येत आनि जायेत.आते डोयासमोर फक्त नरम पावना मजाना वास,पाववडा दिसी रायंता.वरगमाधल्या समद्या ग्यान्गा दुपारना बेत करी रायंतात.शाय सुटनी.पटकन घर पयनूत.
समदा वाडामा जमनात.समदासनी पैसा जमा करात.ठरेल परमाने बाकीनासनी तेल आनं नही म्हनिसन तेल आनेलवालासनीपन आपला आपला घर जायीसन बरनीमा तेल वती उनात.कांदा,तिखट,जिरं,हायेद हायी समदं दानशूर भैय्या,निलू,भोलूनी लिनं.कढाय,पेटीकाडी,सरोटा भावडूनी लिना.ताट कैलूनी लिना.तथाईन भैया दादाकडून पेपर लयना.भोलू घरना डालकामाधून हिरव्या मिरच्या लयना.चंदूनी पानीनी कयशी लिनी.समदी तयारी होयनी होती.पन आम्ही काहीच नही आननारा फक्त तेसनाकडे तोंडतानी देखूत.घर एक पिशीमा पारटीनं सामान ठेवं.कैलूले ध्यान ठेवाले ठेवं घर.बाकी समदा पाव लेवाले गावमा गवूत.
दुकानपा जाताच,"पाव सरी गयात." दुकानदार पिंटू बोलना.
लगेच शांताराम बापूकडे गवूत."अरे सकायले लवकर येवा ना,घरोघर पारटी रहास आते."
बैजू उपाद आते काही खरं नही म्हनीसन आम्ही दोन ग्यान्गा कऱ्यात. बाकी पलाटना दुकानसकडे गयात.उरेल गावमाधला दुकानसकडे पयनूत.समदा दुकानसवरला नरम पाव सरी जायेल होतात.समदा आते परत वाडामा जमनात.पारटीनी पिसवी भरेल होती.पाव नही म्हनिसन तेलपन आनं नही होतं.समदा नाराज हुयी गयात.आते जावू द्या म्हनिसन समदा घर जावानी तयारी कराले लागनात.तदलोंग जिभू बोलना,
"अरे कोल्ला कडक पावनी करूत ना पारटी.मजा तं करनीच से ना.खावाना ते पाव सेत ना."
लगेच उमेश अन् निलू गावमा जायीसन रांभूबाबाकडून तेल,त्या कोल्ला पाव आनि बेसननं पीठ लयी उनात.समदा आते खुश होतात.उमेशनं वावर शायना मांगेच होतं.तठेच जावानं ठरनं.गावबाहेरून जाताच गावबाहेरना गल्लीना मानसं आमना तोंडकडे देखेत.तेसनी येवाले नको म्हनिसन आम्ही मातामायना रस्ताकन इकडे गायन रस्ताना उमेशना वावरमा उनतूत.
पटकन कोनी पानी पेवानी कयशी भरी आनी.कोनी शिलगाडाले काड्या जमा कयात.कोनी कढाय ठेवाले तीन दगडं जमा कयात.समदा आपला आपला काम कराले लागनात.व्हयनी एकदानी तयारी.जिभू,निलूनी एक ताठमा बेसननं पीठ भिजाडं.बाकीनासनी कांदा मिरच्या काप्यात.कोनी कढायमा तेल टाकं.कोनी चुल्लामा काड्या घाले.समदा मस्त मजा करी रायंतात.टेपरेकारडर नही होता पन तोंडसले कोठे लायीट लागनार होती.समदा पटी ते गानं लांबाडेत.वावरमा आवाजले लिमिट नही होतं.समदा गाना वाजेत.कधी एकसारखा ते कधी बेसूर.पन भारी वाटे.
कोल्ला पावनी आमनी पारटी बेकार रंगेल होती.इकडे तेल गरम झायं.जिभूनी पहिला पाववडा टाका तेलमा.तो निंघताच तेले दिना निलूनी चुल्ला देवले.दुसरा निंघताच टेस्टले दिना कैलूले.तेनं देखताच भैयाबी पुढे उना टेस्ट कराले.
"थोडं मीठ कमी से." कैलू बोलना.
थोडंच मीठ घालायनं.पटपट आमना पाववडा निंघाले लागनात.त्या कोल्लाच होतात.तेनामुळे पीठ काही चिपके नही पावसले.जसा बाहेर दिसेत.तसाच तेलमा तयीसन दिसेत.पाववडा सरताच उरेल पीठन्या भज्या तयात.मिरच्या तयात.आनि बसनात समदा खावाले रांगमा.समदासनी हिनीमिनी कोल्लापाव अन् भज्या मज्याना हान्यात.पाव कोल्लाच होतात पन सांगस्यात कोनले आते म्हनिसन आम्ही समदासनी पटपट खायीसन पारटीनी मजा लिनी.
आते भांडा धोवानी पायी उनी.समदा आंग काढाले लागनात.आते कोनी कोनी काय काम करं ते निंघनं.मंग दांगडो होवाले सुरूवात झायी.कुथी काथी आम्ही भांडा धोवाले गवूत.तदलोंग इकडे भलताच तितंबा चालू होता.
"उरेल तेल मी ली जासू." भैया बोलना.
"बैजू,आठे समदासमा जास्त काम मीच करेल से.तेल ते मीच ली जासू." कैलू बोलना.
आते दोन्हीसमा दांगडो होवाले लागना.बोलता बोलता समदा उरेल तेलना मांगे लागनात.समदासना एकमेकसंगे दांगडो होवाले लागना.गाया,मारामारी होवाले लागनी.तदलोंग जिभू जोरमा बाजूले पडेल काडी लिसन बोलना.....
"ओम फट स्वाहा...."
जिभूनी हातमाधली काडी चुल्लामा टाकी आनि समदं उरेल तेल चुल्लामा कानं करी दिनं.
समदा जिभूना मंत्र आयकीसन खिदी खिदी हासनात आनि कढायमाधलं चुल्लामा पडनारं तेल देखाले लागनात...!
#आमनं_धाकलपन
- भरत पाटील
9665911657



Comments
Post a Comment