सूर पारंब्यासना सूर
सूर पारंब्यासना सूर
ढोर दवाखानापा गलका जमेल होता.आज काहीतरी नवीन खे खेवाना येनासाठे जो तो जेना तेना दिमाग लायी रायंता.
"आज लपाछपी खेवूत". भोलू बोलना.
तेले थांबाडत निलूनी पत्तासना बदाम सात खेवानं सांग.तदलोंग मोरक्या जिभूनी शायमा वाकडा झाडवर सुरपारंब्या खेवाना सूर लावा.
"आरे,आपन दरोज काहीनाकाही आल्लक खेतसच का नको.आज आपन शायमा जावूत.तठे मजान्या सुरपारंब्या खेवूत.ते खेवायनं की राजा रानी खावूत.इंग्रजी चिचासना फडशा पाडूत". जिभूनी आपलं लांबलच्चक भाषन दी टाकं.
समदा आते शायकडे जावाले लागनात.शाळानं गेट बंद राये तेनामुळे आते शाळामा घुसनं आवघड होतं.शायमा खेवानी तवय बंदी आनेल होती.बहाद्दर पोरं भयान होतात.मंदिरना रस्ताकडून शायना कंपाउंडना भितले धक्का न लावता तिना खालून खड्ड करीसन मजार घुसेत.आयडियानी कल्पना आठेपन कामले उनती.त्या दिनमा शायमा जावाले मनाई होती.पन सूर पारंब्या खेवानं वाकडं झाड शायमाच होतं,तेनामुळे शायमा जानं भागच होत.
पोरसनी गावबाहेरला बठेल शायना फोनसले चुकांड्या दिन्यात.ह्या फोनं लगेच शायले खेनारा पोरसनी कानगी करी देत.मोठा मुश्कीलकन भितडाले पार करीसन वाकडं झाड खाले समदा जमनात.सरकारी दवाखानाकडून कैलू,उमा,नाना उनात.आवाज न करता खेवानं ठरनं.जो आराया मारी तेनी खे माधून बाहेर पडानं ठरनं.
आम्ही नऊ गडी हातमा हात घालीसन उतराले तयार होयनूत.नऊमाधून चार उतरनात.मंग पाचमाधून दोन.मंग तीन माधून एक करत करत म्हनावर राज्य ई गया.नानानी राज्य लेवानी काठीकन गोल रिंगन घालं.बाकी पोरं झाडवर चढी गयात.नानानी समदासले झाडवर चढू दिनं.मंग मस्त तंगडीमाधून दूर काठी भिरकाई.मी पयत पयत काठी लयनू.रिंगनमा काठी ठी.टकरमकर देखाले लागनू.पटकन एकले पकडाले दुसरा झाडवर चढू तदलोंग वाकडा झाडावरला कैलू काठीले धरी ले.परत राज्य देना पडे.तेसनी बेकार थकाडं होतं.लवकर आऊट होवानं नावच नही लेत त्या.जास्त टाईम एकवरच राज्य लेवानी मजा राहत नही म्हनीसन नाना मुद्दाम आऊट झाया.भयान आनंद व्हयना आते.पक्का गडीले आऊट करेल होतं.
नानाले आऊट करनं सोपं नही होतं.समदासमा पक्का गडी तोच होता आनि मोठापन.नानावर आते राज्य होता.मी तंगडीमाधून काठी भिरकावाले लागनू.जोरमा पोटरीमा बसनी.समदा हासी हासी लंबा पडी रांयतात.मी इकडे तंगडी चोयाले लागनू होतू.तशीच काठी फेकीसन थप्पू घालीसन.गम्मत देखाले लागनू.नाना पटकन काठी लेवाले गया.लगेच काठी रिंगनमा ठिसन झाडसवरला पोरसले देखाले लागना.पोर आल्लक आल्लक झाडसना गेंडावर बसेल होतात.जेनीकरीसन आपलावर राज्य येवाले नको.तदलोंग नाना वाकडा झाडना लांबेल डंगासवरून उलटं झाडवर चढीसन पोरसले टिपाले लागना.इकडे उमानी पटकन रिंगनमाधली काठी पकडी लिनी.परत नानावर राज्य उना.समदा आते उमानं खरं नही म्हनीसन भ्याईसन परत गेंडासवर जाई बसनात.
उमानी आते तंगडीसमाधून काठी लंबी गचाली.पटकन अशोकना झाडवर वरी जाई बसना.नानानी परत पटकन काठी रिंगनमा ठी दिनी.नाना दुसराले पकडत नही तदलोंग जिभूनी काठी पकडी.परत नानावर राज्य उना.आते आम्हना समदासना होसला वाढना.आते शायमा गलका होवाले सुरूवात झाई.आते झाडं गानं म्हनाले लागना होतात.आते नियम नही होतात.समदा आते नानाले घोमलाई रायंतात.आजन्या सूर पारंब्यासना सूर भयान होता.नानानी म्हनावर दया दखाडी पन पोरसनी नानानी पुरती खोड मोडी होती.नाना आते दमी गया अन् अचानक भोलू सापडी गया.परत आते आल्लक आल्लक गडीसवर राज्य येवाले लागना.मजा येई रायंती.
आते चंदूवर राज्य उना.समदा आते भयान खुशीमा होतात.कोनी झाडना गेंडावर.कोनी झाडना डंगासवर.कोनी काठीले पकडासाठे झाडना खोडपासला डंगवर बसेल व्हतात.गलका भयान होवाले लागना होता.खेवामा समदा गुंग होतात.तवढामा......
"पकडा यांना,धरा.ठोक त्याला". म्हनत हेडसर आनि शिपाई दिसनात.
समदा पोरं झाडवर जठे बठेल होतात.तठून उड्या मारत भितकडे पयाले लागनात.कोनी सरकारी दवाखानाकडे,कोनी शायना मांगे.समदा चिनभिन हुई गयात.भितपा धडकताच.आमना उमा हेडसरन्या हातन्या खाई रायंता.तोपन पटकन आमनाकडे उना.आम्ही आते समदा ढोरसना दवाखानामा परत जमनूत.समदा दमी गयतात.समदा सास ली ली दाथडा काढी रायंतात.हेडसरले कशा चुंकांड्या दिन्यात म्हनीसन एकमेकसले सांगी रायंतात.येनी कशी उडी मारी.हा कसा पडना साःगी रायंतात.पन दुसरा दिन समदासनी नानी सप्पनमा उनी.
आमन्या सूर पारंब्यासनी सूर पकडेल होता.शेवट शायना हेडमास्तरनी खे घाला.दुसरा दिन शायमा आमनी समदी सूर पारंब्यासनी गँग मार खावाले समदा शायना समोर होती.समदा शायले हा धडा होता.येना पुढे शायमा खेवान नही म्हनीसन समदाजन गपचिप मार खाई रायंतात.सूर पारंब्यासना सूर आते कानमा घुमी रायंतात.परत सूर पारंब्यासना खे त्या दिनसारखा रंगनाच नही...!
#आमनं _धाकलपन
- भरत पाटील
9665911657


Comments
Post a Comment