मलायेल फटाकडासनी दिवायी
मलायेल फटाकडासनी दिवायी
- भरत पाटील
कापूस येचाना दिनमाच दिवायी ये आमनी.वावरं समदा फुटेल रायेत.गावमा कामले मजूर भेटे नहीत म्हनीसन शेतकरी पोरंसोरसले लायीसन कापूस येचा मांगे लागी जायेत.आमनी गल्लीनी गँगपन मांगे नही होती.गल्लीना सायकोर आजीना जमावमा समदा जावूत.जेना तेना कपाशीना वख्खर,चाच लावामा बेकार मजा ये.कधी खिचडी पारटी,तर कधी चहानी पारटी वावरमा होये.त्या दिनमा कापूसबी मजानाच येचाये.दिवायीना दिनमा कापूसमाय लक्षमी लयी ये.गावमा मजानं वातावरण राये.लोकेसनी दिवायीपन मजामा जाये.
"आजना दिन वावरमा चाल,तुले लोंग्या फटाकडासना बाक्स ली देसू",माय बोलनी.
"आज दिवायी से,माले नही येनं". मी बोलनू.
"त्या जिभू,निलू ह्या पोरं आयकून सेतसं.तेसना मायीसनं त्या लगेच आयकतंस.खावाले तरफडजो तू जठे भेटी तठे", माय तमतममा बोलनी.
"बैजू सलं तू आसंच करस दर टाईमले.दिवायीनंपन घर राहू देत नही.संध्याकायले लोंग्यासना बाक्स लिना तं बरं से माले.नही तं देख तू मा.." म्हनीसन मी लगेच पाय आपटी आपटी धाकलं तोंड करी जिभूकडे गवू.
तिकडेपन मायनाच डायलाग आयकाले भेटनात.
"तो बाप्या,निलू आयकून सेतंस.तू...?
घरवालासनी बेकार फसाडं होतं आमले.येना तेना हेवा दाखाडी दिननी दिवायीपन वावरमाच गचालेत.समद्या सुट्ट्या आशाच कपाशीना बोंड येचामाच जायेत आमन्या.
गल्लीना समदा पोरं एकच ठिकाने कामले जावूत.तेनामुळे बेकार मजा ये आमनी.या दिवायीले चक्कीपा जावूत.तठे फडाकडा फोडूत.बामनसना जयादादा,राहुलदादा,मनिषदादा,पका आप्पा येसना फडाकडा फोडानी मजाबी देखूत आसे ठरनं.तेनामाच आपले संध्याकायले लक्षमी बाम,लोंग्या,डबल बार,सुसुंदरी,नागगुई,चक्कर लावाले भेटनं तं कितलं भारी हुयी आसे वाटी गयं.
गावमा चक्कीपा चार बामनसना घर होतात.त्या बहु भारी होतात.गावमा दिवायी करो तर तेसनीच करो.मंबईतून त्या फटाकडा आनेत.फटाकडासना नवीन परकार आठेच पावाले भेटेत.घरना आरधा चषमा फडाकडा रायेत.दिवायीना पाची दिन चक्कीपा बेकार फडाकडा फुटेत.गावना बराच जन तठे फटाकडा देखाले येत.आमनी तं गल्लीच होती तेनामुळे आमीपन फाममा रावूत.फडाकडा त्या फोडेत पन दुनियाभरनी मजा आमी करूत.
वावरमाधून गावबाहेर येताच गावबाहेरना चतुरभुज नारायन मंदिरना भितीसवर आनि बाकीना मंदिरवर आमी दिवा लावू लागनूत.घर येताच ठरेलपरमाने माय वान्याना दुकानवर ली गयी.लोंग्यानं बाक्स तं नही भेटनं पन एकच लट मायनी ली दिनी.नाराज झावू.तरी एक लट माधला १६-२० लोंग्या एक एक करी पाच दिन फोडामा मजा ये.आमनी सरावसनी जवळपास हायीच गत होती.घरवाला गोड बोली कामले ली जायेत पन सांगेलपेक्षा कमीच फटाकडा ली देत.
मायसोबत चक्कीपासून चाली रायंतू तवय भारतदादाना जयादादानी फटाकडासनी तगारी बाहेर ठी.ते देखीसन भयान वाटनं.तगारी फक्त त्या दादानी होती.आजून राहुलदादानं बाजूलेच होतं.मायले घर जावू दिनं.माय लोंग्यानी लेल लट सोबत ली गयी.मी लगेच गल्लीना समदासले बलावाले गवू.गुपचूप बलायी बलायी फटाकडा कितला सेत हायी सांग.समदा भयान झायात.निलू,जिभू,भोलू,नाना,शरद,आबा,आण्णा,भावडू,चंदू,कैलास,नाथू समदाच गल्लीना धाकला मोठा जमनात.इकडे मनिषदादानी पन आपली फटाकडासनी परात बाहेर लयी.दिवायीनी आकास कंदीलनी झलक,बिलडिंगवर ठेल पनत्या,फटाकडासनी भरेल तगारीमुळे चक्कीपा खरी दिवायी वाटे तवय.फटाकडासनी बातच न्यारी होती आठली.गुपचूप आमी खिडकीवाटे भारतदादाना घरमाधला फटाकडासना भरेल चषमा देखा.भयान झावूत आमी.लगेच लपीलपी घरमाधला ठेल फटाकडा पावाले भेटतीन का येना इचार करा.तदलोंग,
"चला पळा रे,दूर व्हा.चटका लागेल तुम्हाला.." म्हनत राहुलदादानी लक्षमी बाम फोडा.
तिकडे मनिषदादानी सुतयी बाम लावा.बेकार आवाज झाया.आते खरी दिवायी सुरू झायी होती.
आमी इकडे नाचाले लागनूत.दिवायी सुरू झायी.इकडना तिकडना फटाकडा फुटू लागनात.चक्कर,कोटी,राकेट,बाम समदाच बागे बागे लागाले लागनात.लोंग्यातं डायरेक लट ना लट फुटेत.आमी मातर फुटेल फटाकडा जमा करामाच रावूत.तिकडून जयादादानी फटाकडा फेका की लगेच आमी तेनापा जावूत.तो फुटना तं लगेच तठे नाचूत.मंग तो फटाकडा फुटना की भारी वाटे.नहीच फुटना तं लगेच तो मलायेल फटाकडा जेले सापडे तो खिसामा भरे.आसे करत करत बराच फटाकडा सापडेत.आमी आते चेटेल फटाकडापन मलावाले लागनूत.तेनामा भोलू,जिभू तेसना हातमा सुतईना फटाकडा फुटना होतात तर कोना चड्डीना खिसामा.एवढं बरं होये की त्या लगेच फेकायी जायेत.फटाका फुटना तं बेकार झनकारा बसेत.आमन्या करामतीसमुळे दादान त्या आमले हाकली देत.आमी बी बेकार होतूत.चेटेल फटाकडा मलाईसन कोनी वाडामाधून,कोनी बोयमाधून,कोनी गावबाहेरना रस्ता पकडे.येले पकडा पकडा करीसन आम्मीच समदा फटाकडा मलावूत,तेनामुळे त्या आमले तठे थांबूच देत नहीत.काही टाईमले तठे गम्मत देखाले राहू देवाले पाहिजे म्हनीसन लगेच मलायेल फटाकडा जया दादानतेसले देवूत.तेनामुळे तेसले वाटे हावू चांगला से.पन लगेच फटाकडासना पायरे लगेच थांबेल गडी तो मलायेल फटाकडा लीसन पयी जाये.ते देखीसन आम्मी समदाच मार सोबत गायासुद्धा खावूत.फटाकडासाठे समदं सहन होये तवय.आते फोडनं बंद झायं होतं.आमी लगेच घर यी सन मलायेल फटाकडा घर फोडात.काहीसले बोलनं भेटनं.काहीसले मार भेटना.आम्मी उपादच करेल होती.
सकाय होताच.चक्कीपा गवू.तठे देखस तं.पहिलेच भोलू,निलू,जिभू रातना मलायेल फटाकडा वेची रायंतात.माले बी थोडा भेटनात.तवय समजनं की रातले तं रातले सकायलेबी पटकन चक्कीपा येवानं मंजे आपलेबी फटाकडा सापडतीनं.सापडेल फटाकडा आमी घर ठेवात रातले फोडासाठे.लगेच वावरना टाईम होताच समदा परत एकच ठिकाने कापूस वेचाले गवूत.आज काय करानं ते ठरनं.
संध्याकाय झायी.परत गावबाहेरना मंदिरसमा दिवायीना दिवा लावाले मदत करी.घरना दिवा लागनात.लेल लोंग्या एक एक फोडायनात.परत चक्कीपा फटाकडासना आवाज व्हयना.लगेच तिकडे पयनू.मी जावाना पहिलेच आमनी समदी गँग तठे हजर होती.फटाकडा फुटताच.आराया मारेत आनि नाचेत.मी पन तेसनामा सामील झावू.सकायले सापडेल फटाकडा वटावरला पनतीवर लाईसन फोडानी मजा आमी लिनी.मारोतीवर दिवायीनी लायेल आगरबत्तीनी काडी आमना कामले उनी.आते जयादादानी आनि मानसीताईनी दटाडं आमले.समदासले फटाकडा भेटतीन आसं सांग.आज एक एक जनले जे ले जो फटाकडा आवडी तो फटाकडा फोडाले दिनता दादान तेसनी.कोनी मनिषदादाकडे,कोनी पका आप्पाकडे,कोनी पिंटूदादाकडे,कोनी राहुलदादाकडे,कोनी मानसीताईकडे वाटायी गयतात.आज आमना समदासनी दिवायी झायी.भारतदादा,ताईंन तेसनी लगेच समदासले थोडा थोडा फटाकडा वाटातं.आमी खुस जावूत.लगेच घर उनूत.जेवन करी परत चक्कीपा जमनूत.आते चक्कीपा दिवायी शांत होयेल होती.समदा घरमा होतात.आमी आंधारामा फटाकडा झामलाले लागनूत.जितका सापडनात तितका फटाकडा लिसन.दवाखानामा फोडाले लागनूत.तठून डाक्टर दादा तेसनी पयाडं.लगेच आमी गावबाहेर मंदिरसपा गवूत.गल्लीना आमी समदाच होतूत.जो तो जेना तेना सापडेल फटाकडा देवस पासला चेटेल पनत्या लिसन फोडाले लागनात.नही फुटनात तं लगेच फटाकडासनी दारू एक कागदमा टाकीसन ती चेटाडेत.दारू जोरमा चेटे तेनामुळे ती लगेच डोयासमोर ये.डोयासले आंधारी ये.ती आल्लकच राये.समोर समदं उजायं उजायं मांगेतून आंधारं दिसे.गावबाहेरना देवसनी दिवायी पन हुई जाये आमनामुळे.
रातना साडे नऊ दहा होयेल होतीन.तवय समदासनाच फटाकडा फुटी जायेल होतात.आमी आगावू कथापन फटाकडा लावूत.आन्नानी राकेट आनेल होतं.आमी गावबाहेरना पिपयपा जमनूत समदा.आते सापडेल राकेट लावानं होतं.चंदूनी बाटली झामली आनी.भावडूनी धाकला माटीना गरा करा.आन्नानी माटीवर बाटलीमा राकेट लावं.राकेटना सुर आवाजमुळे बाटली आडी पडी गयी.समोरून धोतरवाला बाबा यी रायंता.कोनच तिकडे ध्यान नही होतं.समदा राकेटनी मजा देखासाठे खिदीखिदी करी रायंतात.चेटेल राकेट डायरेक बाबांना धोतरमा घुसनं.बाबा उड्या माराले लागना.बाबान्या आमी गाया खासूत तदलोंग आमी चिनभिन झावूत.बाबा इकडेतिकडे देखाले लागना.गाया देवाले लागना.समोर कोनीच नही होतं.समदा फरार होतात.हासी हासी आमी लंबा घुसी गवूत.बाटली कानी होवाना टाईम आनि बाबाना समोर येवाना टाईम एकच झाया तेनामुळे खे झाया.आमी कोनी गलाटीमाधून,कोनी पलाटमाधून जेनातेना घर उनूत.गपचिप झोपी गवूत.
सकाय होताच परत चक्कीपा आमी जमनूत.रातना किस्सा व्हयना बेकार हासनूत.परत तेच मलायेल फटाकडा वेचाना आनि फोडाना.आसे पाची दिवस चाले आमनं.
आमनी समदासनी दिवायी खावापेक्षा मलायेल फटाकडा फोडानीच जास्त राये.भर दिवायीमा एखादाच दिन घर रावाले भेटनं तं भेटनं.नही तं समदी दिवायी कपासी वेचामाच जाये.त्या पाच दिन गावबाहेरना देवसपा दिवा लावानं आनि चक्कीपा दिवायी करानी.घरना दिवायीना फरायपेक्षा चक्कीपासली दिवायीचषआनंद दे आमले.दरवरीसले दिवायी वाट देखाये फक्त चक्कीनी दिवायीसाठे.मलायेल फटाकडासाठे...!
त्या दिनच मजाना होतात..!
आमनी मलायेल फटाकडासनी दिवायी खासच होती...!
#आमनं _धाकलपन
- भरत विठ्ठल पाटील
9665911657


Comments
Post a Comment