दत्तमठी



 दत्तमठी

       थंडीना दिन.डिसेंबर महिनाना शेवट.शाळानी मधली सुट्टी होयेल होती.पोरसना गलका चालू होता.जेन्या तेन्या ग्यांगासना क्यापटन सकायले भडगावले दत्तमठीले कसं जावानं येनी चरचा करी रायंतात.शाळाना मास्तरसनी सकायले सालबादप्रमाणे शाळाले सुट्टी राई हाई काई सांगानी गरज नही होती.पुरा गावमाधल्या गल्लीसन्या ग्यांगा आपापलं पिल्यान करी रायंतात.आमीपण काही मांगे नही होतूत.

        ह्या टाईमले आमनं बॕट बॉल लेवानं ठरेल होतं.गल्लीना समदाजनसनी घरवालासले सांगी ठेल होतं.तितूर नदीकडून जावानं आणि मधमा कोनं कोनं वावर लागी?,तठून काय लेवानं?,कोनी कोनी जावान हाई समदं ढोर दवाखानामा ठराई लिनतं.संध्याकायले ठराईसन भोलू,कैलास,जिभू,निलू,चंदू,भावडू समदाजन घरोघर गयात.मी पन घर गवू.घरना माहोल थोडा नरमगरम होता तेनामुळे मायनापुढे थोडं थोडं काम कराले लागनू.माय खिचडी करी रायंती.मी थोडं मधमा मधमा कराले लागनू.माय संतापनी,

"शिलगस नही रे तथा".

माले मायले पटाडनं होतं तेनामुळे माय शिलगानं म्हणी रायनी म्हणीसन काय शिलगानं थोडी होतं.लगेच घरमा जाईसन खाटा टाकाले लागनू.आथरून टाकी टीकी समदं रेडी करी टाकं.तदलोंग माय परत बोलनी,

"चेंदाना पहिले कथा आडा पडी रायना,होयना का तुना आडा पडाना टाईम. का रे?"

माले मजा वाटी रायंती.मी पटापट काम करं.भांडा घसडाले पाणीनी बादली भरी दिनी.समदं होयनं तवय मायच बोलनी,

"सकायले तरफडनं हुई ना दत्तमठीले म्हणीसन करी रायना तो पुढे पुढे.सकायले कपासी वेचाले मरजो मनासोबत".

 मी समदा कामं करनं लगेच थांबाडं.मायले सांगीच टाकं.

"जाय तथा.परोनधिन येसू मी.सकायले गल्लीना समदा पोरं जानार सेत दत्तमठीले.मीपन जानार से".

मायनी लगेच रांधीपंदी गल्लीना कोनं कोनं जानार सेत तेना तपास करा आनि मालेपन जावाले सांग पन घर कोनी खोड लयानी नही हाईपन सांगाले भूलनी नही.रातभर कालदीन काय काय करानं येनं पिलॕन करता करताच झोप कवय लागनी हाई समजनच नही.

      दत्तमठीले जावानी समदासले घाई होयेल होती.कोनी जेवनं तर कोनी काईच नही.गलाटीमाधून तितूर नदीना रस्ताकन भडगाव शॉटकट जानं होतं.नऊ दहाना टाईम होयना हुई नदीमाधून शाळान्या ग्यांगा जावाले लागनात.कोनी सायकल,कोनी बैलगाडी,कोनी पाय पाय जावाले लागनात.आमीपन आते तयार होतूत पन भैयानी वाट देखामा टाईम हुई रायंता.भैया येताच पहिले तेले गाया टिकाड्यात समदासनी तेनानंतर आपापलं साहित्य लिसन समदाजन निघंनात गलाटीमारगे भडगाव दत्तमठीले.

        दुपार होवाले सुरूवात होयेल होती.फफाटा गरम होवाले सुरूवात होयेल होती.नागे पाय तो फफाटा मस्त वाटे पायसले.पुढे तितुरमायना पानीना स्वाद लिसन पुढे निघंनूत.मधमा रस्तान्या बोरीसना चखना होताच.जो तो जेन्या तेन्या पिसोड्या भरी रायंता.मधमाच जामनं झाड लागनं तं समदं गाव तेनावर पडनं.पोरं एकमेकसनं नाव लेत,गाया हिसाडत,बारक्या खडा मारत,टोमना मारत रस्ता पास करी रायंतात.तेनामा पकडापकडीना खे,काठ्या काठ्या,पुढे मैदानमा बॕट बॉलना एक डाव समदं ह्या दिवस हुई जाये.घरतून भाकर बांधनारसनी मधमाच जेवानी पारटी सुरू राये.वावरमाधलासले टाटा करीन पुढे जानं राये.समदं खुशी खुशी.

     थकेल भागेल गडीसले मांगे टाकीसन आमी भडगावना मांगली घोडबल्लीले लागताच एक घर पानी पेवाना हापका मारा.पोटभर पानी पेताच.पुढे भडगाव सेहर भारी वाटाले लागनं होतं.झोपडीपासून मोठ मोठ्या बिल्डिंगा मनमा घर करी रायंतात.रस्ताना एक बाजूले तरफडनं पडस म्हणजे चालनं पडस हाई गाडीमा घुसावर समजनं होतं माले.गाडीवालानी कानमा देल आनी आपला ग्यांगवालसनी हासेल हाई गणित पक्कं ध्यानमा रायेल होतं.चूक मनीच होती आनि शिकनूपन मीच होतू.तवयपासूनच डावं उजवं बरच उमजाले लागनं होत.पुढे गावाना बराचजन दिसाले लागनात.क्यापटन भाऊना मांगे मांगे आमी जावाले लागनूत.बजारपट्टीना दुकानं भारी वाटेत.गरदी वाढाले लागेल होती.जथातथा दत्तमठीना माहौल होता.दत्त मंदिरना गल्लीमा जाताच भोंगाना आवाज सुरू हुई गया.गाना कानवर पडनात.गल्लीमा पानी मारेल होतं.तेना मस्त वास ई रायना होता.आते खरी जतरा डोयासनं पारनं फेडी रायंती.जतरामाधला गलका आनी आमना पोरसना "दत्तगुरू महाराज की जय" गजर गल्लीमा घुमाले लागना.मंदिरपा येताच आमी मस्त बाहेर पाय धोयात.धूप,भजन,घंटामा समदं वातावरन नादमय होयेल होतं.गनज गरदी होती.समदा इकडेतिकडे हुई गयात.

        गावना मोठमोठा लोक तठे येल होतात.तेसना भारी भारी डरेस आपलेबी भेटो आसे वाटे.मंदिरमा एकदम गारेगार वाटी रायंत.दत्तगुरू महाराजनं दरशन लिसन आते जेवाना पंगतकडे आमी गवूत.पोटभर गपागप खाई लिनं.मंदिरमा लपाछपी,पकडापकडी,विसअमृत जे खेता येई ते खेनूत.मार बी खादात तठे.मंग बाहेर पडाले लागनूत.तदलोंग दुपारना चार वाजी जायेल होतात.परत जेवाना दांगडो आमी मोडी लिना.कोनी मांगून कोनी पुढून समदा फैली गवूत आणि दोनदा जेवन हानी घालं.तरी एक माणूसना ध्यानमा उनं तेनी दिनीच एक हालका हातनी डोकामा,"घर खावलाले नही भेटस का?" म्हणीसन तो पुढे चालना गया.आसा परसंग नवीन नही होतात आपलासाठे तेनामुळे हासी घालं समदं.परत आपलं ध्यान वरणभातकडे होतं.

      हाऊस गिऊस होयनी.आते समदा एक ठिकाणे जमनात कसं जावानं ते ठरनं.आमी समदा निंघनूत.निलू,जिभू,मी थोडा मांगेच रायनूत तिकडून येतांना पायसमा चप्पल नही होती.म्हणीसन आमी देवना परसाद म्हणीसन चप्पल चोरानं ठरावं.आमी एक एक करी चप्पलासना गरामाधून प्यारागानना नव्या जुन्या जोड उचलात.आते पयनुत मंदिरपासून घरकडे.एकमेकसले चपला दाखाडीसन आमी चपला पायमा घाल्यात.बाकीनासपा जाताच आमी चपला चोऱ्यात हाई का रूचनं नही.आमी गाया खाद्यात पन आपलासोबत जेसले येनं होतं तेसनीपन लगेच मंदिरकडे दुडकी धरीसन चपलासना जोड पिशवीमा आनात आनी मस्त चालाले लागनात.

     आज मस्त खावा पेवानी मजा होती.बिगरपैसासनी पुरी दत्तमठीनी जतरा हुई जाये.तिकडून ग्यांगा घरकडे परताले लागन्यात.आते थकी जायेल होतूत.बैलगाडावालासनं मस्त होतं.सायकल,फटफटीसवाला टाटा करीसन विस्तववर तेल टाकेत.आमी पुढे बॕट,बॉलना एक डाव मांडा.तो खिसन पुढे कचाकड्यासन्या पिशव्या बोर,जामन्या भरी लिन्यात.तितूर नदीमा मासा पकडानी,डाबुल्लामा बुचकानी पन हाऊस फेडी लिनी.संध्याकाय हुई गई.आते आमी गनज मजा करेल होती.पायसमा चपला भारी वाटी रायंत्यात.जनममा पहिलीच चप्पल भेटनी होती.ती पन चोरीनी होती.ते काही असो पन तवय चोरेल ठिकानपासून घरलोंग एकदम भारी वाटी रायंत.घर जाताच माय भाऊ आप्पाले भेटनू.

      माय चुल्हापा होती.काय काय करं ते सांग.दत्तमठीमाधून चोरी आनेल चप्पल दपाडाले लागनू.मायले समजनं येनी काहीतरी आनेल से.येनापा फुटेल कवडी नही होती तं हा काय दपाडी रायना म्हणीसन माय गुपचूप मना मांगेच उभी रायनी.मी गोखलामा डब्बानामांगे नवी प्यारागान लपाडी रायंतू.लगेच पाठवर पहिला धपका बसना.मी पुढे ठेल घोडसलीवर गवू.

"कुतरा,चोऱ्या कराले गयता का तू? कोनपन खेटरं घर लई उना,कोनं मन कसं रहास कसं नही,मरी चालना का तू.कोना तयतयाट नही लेवो.व्हय फेकी ये गलाटीमा".

       मी हाईगाईना काय मार खायेल होता.लगेच नव्या कोऱ्या चपला गलाटी नदीमा झाडमा लपाडी दिन्यात.तथा जिभू निलूपन दनका खायेल होतात.रातले काही झोप लागनी नही.सकायले पटकन झाडा बसानं नाव करी लपाडेल चपला देख्यात तठेच होत्यात.पायमा घालीसन थोडं नदीमा फिरी उनू परत तठेच लपाडी दिन्यात.ठरेलपरमाने आज मायसोबत कपासी वेचालू गवूत.समदासनी दत्तमठीले काय काय करं,समदं समदं सांग.पोरसले चोऱ्या नही करो हाईपन समदासनी सांग.दत्तमठी पुरी मनमा होती.वावरमा दत्तमठीन्या गप्पा मारता मारताच संध्याकाय हुई गयी.जिभू निलूले मनी आड्डावर चप्पल लपाडेल से आसं सांग  होतं.आमी वावरमाधून डायरेक जठे चप्पल लपाडेल होती तठे गवूत.मी चप्पल झामलाले लागनू.झाडन्या फांद्याफांद्या देख्यात,खालेवरे,मांगेपुढे देखं पन आठूनपन आते चपला माराई जायेल होत्यात.जिभू निलूले आनंद झाया.आते आपलासोबत येलेबी चपला नहीत.तेसनी रातलेच नदीमा फेकी देल होत्यात चपला.मी लपीलपी वापराव होतू.पन आपला नशीबमाच नही होतं.तसाच घरकडे तोंडी वासी निंघनू.

     वरीसमाधून एकदा येणारी दत्तमठी पहिलीच होती.तेनामा येल अनुभव जीवनले मारग देखाडी गयात.चूका भयान होत्यात पन त्या सुधरावाले समदाजन होतात.हाई भारी होतं.दत्तमठी आजपन दरवरीसले याद मा रहास धाकलपनन्या काही चांगल्या वाईट गोष्टीसमुळे.

बहारदार दत्तमठीन्या समदासले हृदयपासून शुभेच्छा

#आमनं_धाकलपनं

@गिरीजादूत 

- भरत विठ्ठल पाटील

9665911657

Comments

  1. खूप छान...मस्त लिहिलंय....
    कसे मजानज लिव्हस भो तू...

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts