गुलाब १

#आमनं_धाकलपन


गुलाब (भाग - १)

- भरत पाटील


      रातले थोडा पाणी पडी जायेल होता.तेनामुळे बाहेरनं वातावरण थोडं थंडगार होयेल होतं.भादरपदना महिनामुळे लगेच  कडक ऊन पडी जाये.गल्लीमा एखादा फटका मारा तरी पित्तरसना वाटाले येल मुंगनी दायना वडासना तयाना मस्त घमघमाट सुटेल राये.तेनामा सिजननुसार गल्लीना खे सुद्धा बदली जायेत.


       आज सकाय सकायलेच ढोरसना दवाखानासमोर भोलूनी आणि कैलासनी च्यारानी मांड ठेसन बगी डाव सुरू करी दिनता.शॉपिंग सेंटरना मधमाच डाव मांडेल होता.तेनामुळे जोरमा बोलनात की तेना आवाज लगेच आमना घरना मजार ई जाये.आजपण तेसना गलकाना आणि डावमा थोडं जरी इकडेतिकडे झाये तरी एकमेकसले गाया देवाना आवाज कानसलोंग ये.मी पटापट आवरं आणि तेसनी गम्मत देखाले गवू.तेसना डाव रंगेल होता.भोलूना हातमा दोना फरशीना हातमा मावतीन आसा मस्त आकार देल गोलगिटींग डावख्या होतात.तथा कैलासपाबी तेनातेना डाव होतात.खेतांना कोणीच कोणले आपला आवडता डावख्या दे नहीत.भोलूनी हातमाधला पैसा बगीना समोर फेकात आणि कैलासनी कोणता पैसाले मारानं हाई सांग.भोलूनी लगेच तेना डावख्या तोंडपा ली गया तेले थोडं थुक लावं आणि डावख्याले हातकन मस्त कपायले लावं आणि बोलना,"बोल जनार्दनबाबा की..." आणि बरोबर जेले माराना होतात तेनावर चोट लाई फेका.बरोबर कैलासनी सांगेल पैसासलेच तो लागना आणि भोलू समदा पैसा जिकना.तो उड्या माराले लागना.कैलासनं पैसा हारेलमुळे थोडंस तोंड हुई गयतं.मीपण भोलूसंगे नाचाले लागनू होतू.पैसा भोलूनी कमाडा होतात पण आनंद मालेपण झाया होता.


     तेवडामा वाडामाधून गुलाब,नाथूसकट समदी गँग शॉपिंग सेंटरपा जमनी.धाकल्लासना बगी डाव एककडे आणि मोठ्ठलासना डाव दुसराकडे सुरू झायात.सकाय सकायले दरोज आम्ही दवाखानाना समोरच गलका करूत आणि डाक्टरदादान तेसले  तरास देऊत पण त्या पण पोरसनं खेणं से म्हणीसन थोडसं रागवेत आणि लगेच दरवाजा बंद करीसन 'ख्या बाबासवन ख्या' म्हणीसन गल्लीना पोरेसना नांद टाकी देत.पोरंपण इतका भन्नाट होतात की दवाखानाना समोर खिसन मोठाईन आवाज करीसन तरास देत तरी डाक्टर दादाकडेच पाणी ढोसलाले जायेत.डाक्टरीनताईना दोन तीन गाया खाऊत पण पाणी ताईकडेच पेवाले जाऊत.ताई आमले समदासले बेकार जीव लाये.एखादासाव नही पाणी भेटणं तरी ताईन तेसना सरकारी नयले दिवसभर बारकं बारकं पाणी चालू राये.आम्ही गुपचूप आवाज न करता जाऊत आणि नई तोंडले लाईसन पाणी ओढूत आणि तहान भागाडूत पण घर जावानं नाव नही लिहूत.बराचदा नई तोंडमा राये आणि वरतून पाठवर मस्त धबाकडापण खाऊत.तेनामापण आमले बेकार मजा ये.


     आते समदा पैसा पैसाना बगी डाव रंगेल होता.धाकल्लासना गलका आल्लक आणि मोठ्ठालासना गलका आल्लक होता.कोणी आठे हाराये कोणी जिके.एकच ठिकाणे सात आठ डाव रंगेत.जेना तेना डावख्या रायेत.एकमेकसले पण देत.चोटींगवाला,बिगर चोटींगवाला डावख्यासनी चलती राये खे मा.चारानी,आठानी,रूपया,दोन रूपया मांड सुरू होये.तेनामा चुकीना पैसासवर डावख्या पडना की लगेच डाव इतकाच पैसा भरना पडेत.डाव सहजपणे मोठा हुई जाये.शाळाना दिवस रायेत पण बगी डावना पायरे गणजजनसनी शाळा हाई बगीडावमाच चाले.शाळा बुडनी तरी चाली पण बगी डावना खे पुराच करेत खेनारा.पुरा शाळामा बराच पोरं गल्ली गल्लीमा बगी डाव खेत.आजपण दरोज सारखाच खे रंगेल होता.


       मोठ्ठला पोरेसमाधला गुलाबनं माले बेकार आकर्षण होतं.तेनं पत्ता खेणं,सुरपारंबी,टीपणटाया,भवरा,काठ्याकाठ्या,बॕटबॉल खेणं,झेपणं,मारामारी करणं समदंच माले आवडे.म्हणीसन मी तेना आंगे मांगेच फिरू.गुलाबना डाव उना की मी पुढेच थांबू.गुलाबना डावख्यानी चोट लागो का नही लागो तरी मी पटकन तेना डावख्या हातमा लीसन आयता तेनापा दिऊ.तेना पुढे पुढे करू.गुलाब म्हणजे नाना जिकना तर माले आनंद होये.तेना डावख्या लिसन लगेच बाजूला ठरायेल दगडले मारू पण दगड कथाच राई जाये चोट लावाना.डावख्या भलताकडेच पडी जाये.एखादा दिवस दहा पैसा,वीस पैसा भेटेत पण त्यापण मी हाराई जाऊ.नंतर धाकलं तोंड करीसन दाथडा काढी काढी हारेल पैसासनं दुःख दाखाडूच नही.पहिलेच पैसा भेटेत नहीत आणि त्यापण आठे हाराई जाऊ.बराच टाईम गम्मत देखामाच जाये आपला.


        इकडे गुलाबन् तेसना डाव आते रंगेल होता.आठानी मांड आते दंड भरी भरीसन दहा रूपया हुई गयती.हातमा चिल्लर माये नही.पण खे बेकार रंगेल होता.शाळाना टाईम हुई गयता.पोरं शाळामा जावाले लागी गयतात.मास्तरं शेजारून जायेत पण खे काही बंद होये नही.कोणी मास्तर उना की लगेच समदा शॉपिंग सेंटरना मांगे,कोणी अंगणवाडीना मांगे,कोणी नदीमा पई जायेत.मास्तर पुढे गयात की परत चोरसारखा एक एक जमेत आणि परत खे सुरू होये.खे मोठा हुई जायेल होता.वाटा पाडानं गुलाबले मान्य नही होतं.आज शाळा बुडनी तरी चाली पण गेम पुरा करानाच होता तेसले. इकडे धाकल्लासनापण खे आते थांबी गयता.दोन्ही बाजूले गल्लीनी गँग गम्मत देखी रायंती.डाव मोठा हुई जायेल होता.शाळाना टाईमपण होयेल होता.


    काही दप्तरं लीसन,बाजूले वडना झाडखाले ठीसन गम्मत देखी रायंतात.खेनारा एक एक जण ये आणि बगीना पुढे पैसा फेकाना प्रयत्न करे.बगीना थोडा मांगेच रेष राये अन् तिना पुढे बगी.पैसा बगीमा पडनात की त्या खेनाराना होयेत.रेषना मांगे पैसा पडनात की तेले काढना पडेत नही तं डावा भरना पडे.पैसा फेकात की कोणीतरी एक पैसा सांगेत आणि तेलेच खेनाराले मारना पडे.नही लागना तं दुसरा खे.डावख्या दुसरालेच लागना तर दंड भरना पडे ठरेल आणि आसाच तो खे मोठा हुई जाये.गेमच बेकार होता तो.दहा रूपयाना गेम त्या काळमा मोठा होता.येसना दंड भरी भरी गेम मोठा हुई जायेल होता.सकायना पैसा पैसा खेवाना गेम अकरा वाजी चालना होतात तरी सुरूच होता.पुरा गावमा आमनी गल्ली पैसा पैसा खेवाना बाबतमा म्हणजे बगी डावमा फेमस होती आणि ते आमले पण भारी वाटे.गेम मोठा हुई जायेल होता.समदासना खिसामाधली चिल्लर खाली हुई जायेल होती.कोणलेच खे जिकता ये नही.

      गुलाब खेवाले उना की माले वाटेच की येनीच जिको.तसं मी म्हनं काम करी लिवू.गुलाबना हातमा डावाख्या देवानं.गुलाबनी पैसा फेकात रेषना पुढे दोन बगीमा पडनात बाकी दूर दूर गयात.काही जवळ जवळ पडनात.बगीमाधला पैसा गुलाबना होतात.बगीमा पैसा पडनात की त्या पैसा खेनारालेच भेटेत.समोरलासनी ज्या पैसा जवळजवळ होतात तेसनापैकी एक सांगात.गुलाब नेहमीप्रमाणे थोडा खाले वाकना.डावख्याले तोंडपा ली गया.तेले जिभ लाई आणि हात खाले वरे करा.काहीतरी पुटपुटना आणि डावख्याले सांगेल पैसाकडे मनगट वाकाडी हातना बोटेसमाधून गोल गोल करी फेका.आम्ही समदा गुलाबना डावख्याकडे देखी रायंतूत.पुरी गल्ली तठे जमेल होती.या गेमले टाईम हुई जायेल होता.मोठा होता.आसे वाटे कोण जिकी.माले वाटे गुलाबच जिकी.गुलाबना डावख्या सांगेल पैसावर पडना आणि गेम गुलाब जिकी गया तिकडे शाळानी घंटा वाजनी आणि इकडे गुलाबनी.गुलाब समदा पैसा पटापट जमा करी रायंता.बाकी पोरं शाळाकडे आराया मारत मारत पई रायंतात.गुलाबवर बोली रायंतात.बाकी दप्तर लेवाले घरकडे पयनात.बाकी गुलाबनं कौतुक करी रायंतात तठे.मी पण थोडं गुलाबना आनंदमा सामील होतू.नाची कुदी लिनतं.समदाजण गुलाबनं कौतुक करी रायंतात.


        हारेलवाला धाकलं तोंड करी घर चालना गयतात.तठून शाळामा जावानी तयारी होती.मी पण घरतून दप्तर लीनं आणि शाळाकडे धूम ठोकी.तेवढामा गुलाबनी आराई दिनी माले आणि मना हातमा च्यारानी ठीसन गोया खाई लिजो म्हणीसन बोलना.गुलाब सोबतच मी शाळाकडे जावाले लागनू.मोठं मोठं वाटी रायंतं.गुलाबनी तो डाव जिकेल,तेनं रस्ताधरी होणारं कौतुक आयकीसन माले आनंद हुई रायंता.गुलाबना सुगंध समदाकडे पसरेल होता.पैसा पैसा खेनं वाईट रहास हाई तवय कोठे समजे माले पण तेन्या विशेष गोष्टी प्रेरित करी रायंत्यात.

#आमनं_धाकलपन

- भरत पाटील

9665911657

Comments

Popular Posts