काकडी
काकडी
- भरत पाटील
"ह्या मंगळवारले भिका भिमा तमासा से" गल्लीमाधला राजू बोलना.दर मंगळवारले गावनी जत्रा रहास.समदाजन सरावन महिनानी वाट देखतंस.जो तो जेना तेना आवडीन्या गोष्टी कराले देखस.धाकल्ला उड्या मारान्यात,खेनावलाकडून फुगा लेवानात,खेना लेवाले कसा पिलॕन करतस.सांगालेच नको.मोठ्ठलासनं समदं ध्यान संध्याकायना डफडं वाजाकडे रहास.ते वाजाले लागनं म्हणजे खरी जतरा भराले सुरूवात झायी असे वाटे.तमासावालसनं गाडं चावडीपासून निघंनं की पुढे पोरसनी डफडाबरोबर नाचत कुदत गावबाहेर येवो आणि मोठ्ठालासनी एकमेकसले सोबत करी करी गम्मत देखाले येवो.समदं सरवासनं ठरेल राये.
मन काही लागेच नही.मंगळवारनी मी पण समदाजसारखी वाट देखू.मांगला मंगळवारले निलूनी काकडी लिनती आणि आरधी आरधी खावाले दिनती.आसे वाटे आपणपण काकडी लिसन तेनासोबत खावो.मायकडे आठाना मांगात पण माय काही देवान नाव ले नही.काय करो तेच समजे नही.सरावन सोमवारले सकालेच शाळा भरे म्हणीसन शाळाले दांडी मारीसन कामले येसू पण आठाना देना पडतीन आस्स कबूल कराले लागनू पण माय म्हणे,
"खावाले कोठे जास? समदाजन सोमवारले कामले येतसच".
मी रडाले लागनू.हात पाय आपटाले लागनू.मायनी काही दाद दिनी नही.सोमवारले सकायतून गुपचूप कामले गवू.
सरावन सोमवार होता म्हणीसन दुपारलेच लवकर सुट्टी भेटे.वरण बट्टीना बेत करीसन खेवाले गवू.गल्लीना समदाजन जतरामा काय काय लेवानं,करानं एकमेकसले सांगी रायंतात.मना डोकामा वडना झाडना बाजूले बसणार काकडीवालाच डोयासमोर ये आणि मसाला लायेल काकडी दिसताच तोंडले पाणी सुटे.दोस्तना निरोप लिसन पटकन घर पोहोचनू.माय आप्पा जेवण करी रायंतात.
"मा,सकाय कामले उनू तं आठाना दिसी का माले." मी बोलनू.
"चेंदाले कोठे जास रे तू बाख्खर.परोनदिसनं लाई दिनं तेनी.पैसासना खे नही कराना मनापा." माय संतापमा बोलनी.
"मी कधी मांगस का तुनापा?.आठाना तं देना सेत तुले.मना रोज पंधरा रूपया ई.तेनामा आठानाच दे जो.रातनी जिलेबी नको दे जो माले वाटल्यास". मी घाबरी घाबरी बोली रायंतू.
"चाल सकायले कामले.कामतून उनूत की देसू आठाना.आते शिलग खेवाले." माय घास लेत बोलनी.
मी पटकन घरबाहेर पडनू.पयत पयत दवाखानामा जाईसन येस येस कराले लागनू.आनंद होयेल होता.काकडी जसी काही खावालेच भेटनी आसे वाटे.संध्याकाय होताच घर गवू.परत मायले बागेच विचारी लिनतं.
"मा,खरच देशी ना".
मंगळवार जतराना दिवस उगना.पोरं शाळामा जावाले लागनात.मी मायसोबत निंदाले जावानी तयारी करू लागनू.निंदाले चाचस भेटे आणि मायच निम्मे आरधं मोडी ले.आम्ही वावरनी वाट चालाले लागनूत.इकडे शाळामा प्रार्थना सुरू झाई होती.गावबाहेर खेनावाला,जिलेबीना दुकानवाला दुकानं लाई रायंतात.काही जागा समाई रायंतात.तदलोंग तमासानी गाडी पण ई लागनी.आम्ही वावरकडे झोपमाधून उठेल त्या तमासावालासले देखतंच पटपट जावाले लागनूत.
वावरमा फक्त संध्याकायनी वाट देखी रायंतू.दुपार झाई.संध्याकायले पटकन सोडानं म्हणीसन वावरवालानं काम आम्ही पुरं करी दिनतं.मालकनी पण जतरा से म्हणीसन आमले पाच वाजताच सोडं.वावरमाधून पयत पयतच घर पोहोचनू.हात पाय धुई रायंतू तदलोंग डफडाना आवाज बागेपासून सुरू होयेल मोठा मोठा होतच डोयासमोरून पोरसना गलकामा गावबाहेर गया हाजेरीकरिता.मस्त सजाडेल बैलगाडी आणि तेनामा तमासावाला काहीतरी म्हणत म्हणत जाई रायंतात.
मी पटापट तयारी करी आणि मायनी वाट देखाले लागनू.माय काही येवानं नाव ले नही.जतराना गरदीमा कामतून घर येणारा काही दिसेत नही.चिंता वाढनी.गावबाहेर जाणारा चुनगा न चुनगा वाढाले लागनात.गल्ल्यान गल्ल्या गावबाहेर जमाले लागन्यात.भिका भिमा तमासा म्हणीसन शेजारना गावना लोकेपण गावबाहेर दिसी रायंतात.माय येत नही म्हणीसन परत परत घर येऊ आणि परत परत रस्तावर जाऊ.मी पयतच उनतू पण बाया बागे बागे येत असतीन हाऊ विचार करी रायंतू तदलोंग माय उनी.माय येताच मनी कुरूकुरू सुरू झाई.मायनी लगेच साखरना डबामा हात घालीसन सुट्टा पैसा काढात.तेनामा आठाना नही होतात.रूपया होता.मायनी हातमा रूपया दिना आणि बोलनी,
"आठानाच मोडजो आणि आठाना वापस आणजो".
मी मान हालाईसन पटकन जतरामा रूपया ली पयनू.तमासानी हाजरी सुरू हुई जायेल होती.लोकेसना जोरजोरमा हासना आवाज ई रायंता.पोरं मजाना खेना,फुगा लीसन घर जाई रायंतात.मी पटापट दुकानसमांगून दुकानं ओलांडी काकडीवाला झामली रायंतू.काकडीवालानी जागा बदली गयती.तेले मोटर स्टॕन्डना बाजूले जागा भेटनी होती.
तेना गाडीपा जाताच.सोलेल काकड्या,मसाला लायेल काकड्या,मसालानं डबं,काकडुसनं पोतं देखी रायंतू.तो पटापट एकेकले काकड्या दिसन गल्लामा पैसा टाकी रायंता.काकड्या खानारासले देखी देखी माले कवय भेटी आस्स हुई गयतं.मना नंबर उना.माले एक मसाला लायेल काकडी भेटनी.एक हातमा आठाना आणि दुसरा हातमा काकडी लिसन मी निलूले जतरामा देखाले लागनू.आठाना खिसामा घालात आणि काकडी लिसन भटकाले लागनू.तदलोंग.....
लोक पयाले लागनात.काय झाये ते समजाना पहिलेच माले एक माणूसनी जोरमा धक्का दिना मी काकडीसमेत रस्तावर पडनू.काकडी मातीनी भरी गयती.लोक तिनावर पाय ठीसन पई रायंतात.मी पटकन उठनू आणि रडाले लागनू.घाबरघाई रस्ताना बाजूले होताच.बाजूना माणूस बोलना..
"तमासाना आवाजमुळे ती म्हैस बिचकी गयी.लोकं घाबरी गयात.बरं झायं कोणी चेंदायनं नही".
मी रडी रडी मना काकडीकडे देखी रायंतू.तिनं आते पाणी पाणी हुई जायेल होतं.मी घरकडे रडका चेहरा करीसन जावाले लागनू.तिकडून निलू येतांना दिसना पण मना हातमा काकडी नही होती.खिसामा उरेल आठाना होता.निलूनी माले बलावं पण जतरानी मनी मजा उडी गयती.मी पटकन घरकडे जावाले लागनू.
घर येताच मायकडे आठाना दिनात.मायनी आठानानं काय करं ते विचारं.मायले समदं खरं खरं सांगी दिनं.रडाले लागनू.मायनी डोकावरून हात फिरावा आणि बोलनी,
"ले या आठाना.खाई ये काकडी".
मी पटकन जतरामा गवू.काकडीवालापा गरदी आते वाढेल होती.तमासामा रंगत येल होती.जतरा आते वाढेल होती.काकडी भेटताच मी आते निलूनी वाट देखीच नही.गपागप काकडी खावाले लागनू.मस्त सोलेल हिरवी पांढरी काकडी मसाला लाई भारी वाटे.परत परत मसाला लाई लाई खावाना आनंद लिना.तमासामा आते आहिरानी गाणा लागेल होतात.शिट्ट्या जोरजोरमा वाजी रायंत्यात.आते मना काकडीना चार भागपैकी तीन भाग खावाई गयतात.तदलोंग निलू काकडीवालापा उना निलू दिसताच उरेल तेले दिनी. निलूनी आजून एक काकडी लिनी.माले आरधी दिनी.मी मस्त मनसोक्त खाई रायंतू निलूसोबत तमासाना गाणा आयकत, काकडीटावालानं बोलनं आयकतं....
"चला,थोड्याच रायन्यात.मसालेदार काकड्या.".
- भरत पाटील
9665911657
#आमनं_धाकलपण


Comments
Post a Comment