देवदोस्त भोला
देवदोस्त भोला
- भरत पाटील
- भरत पाटील
पावसायाना दिवस होतात.झाडसनी संख्या जास्त हुई आणि गावकडलं पर्यावरण चांगलं हुई तेनामुळे गावन्या नद्यापण सात आठ महिना वाहेत म्हणे.आमनी गंगोत्री म्हणजे गलाटी नदीपण मस्त आरामशीर वाही रायंती.समदा मजामा वावरमा काम कराले जायेत आणि येत.सकाय झाई की कामाले जाणारसनी घाई सुरू हुई जाये.गावमा तवय कोठे मोबाईलना डबडा होतात.रिकामे पोरेपण पहिले घरवालासनं काम करी खेवाले जायेत.आम्ही जास्त धाकल्ला होतूत तेनामुळे घरवालासनं फक्त येनी खादं का? एवढच ध्यान राहे.एकदा का समदा वावरमा गयात म्हणजे आमना मालक आम्हीच.आजी राहे घर.बाहेरून कथाईनपण उनात तरी आजीनं ध्यान बरोबर राये."का रे उना डवरी?" आसं कानवर पडनं की समजी लेवानं आपले देवना प्रसाद भेटी म्हणजे भेटी.आजी बोलनी,"तो भोल्या उनता तुले देखाले".
भोला आपला धाकलपणना दोस्त.आसं वाटसं मी पहिले दुसरीले अससू.आमना घरना बाजूलेच तेसनीपण झोपडी होती.घरोबा होता तेनामुळे घरवालासोबत आमना धाकल्ला गडीसनीपत दोस्ती होती.भोलानी बलावं म्हणजे काहीतरी विशेष काम असी आसं वाटनं.भोलाले देखाले बाहेर पडनू.गल्लीमा बेकार गारा राहे.भोला रस्ताना शेजारना खयामा दिसना.भोला गाराना गोया करी करी फेकी रायंता.भोलालोंग जात जात पार गारा मांडीसलोंग पहोची जायेल होता.भोला मना बरोबरनाच होता पण हिम्मतवान होता.काहीच कराले घाबरे नही तो.कोणीपण वस्तू आथानी तथा कराले तेना हात गल्लीमा कोणीच धरणारं नही होतं.आपला दोस्त म्हणीसन तेना गणज गोष्टीसमा आपलापण तेवढाच भाग राहे.भोलानी घर एखादानी गयरत लई म्हणजे तेना घरवालासनी तेले तेना घर घोमलावानं आणि मना घरवालासनी माले आमना घर.धाकलपण म्हणजे अवघडच रास तसं.
भोलानी मना आवतार देखा आणि तो हासाले लागना."अय,कुठं मेलता इतकं भरायला". तेसनी घर मराठी भाषा होती बोलानी.तेनामुळे तो मराठीमा बोले.मी आपला खान्देशी बाणामा.तेले समदं समजे आपलं आणि आपले तेनं.तेनामुळे भाषा काही एकमेकसले जाणी लेवाले आडचण राहे नही.पाणी पावसायना दिवस होतात तेनामुळे भोला बोलना,
"चालतो का झेपायला?"
माले एकदम भारी वाटणं.मी लगेच बोलनू "कोठे?"
माले एकदम भारी वाटणं.मी लगेच बोलनू "कोठे?"
"अरे आपल्या गलाटीतच जाऊ,कोणाले नको सांगू.जाऊ देणार नाहीत नाहीतर."
मी मान डोलाई.भोलाले गलाटीमा झेपतांना गणजसाव देखेल होतं.म्हणजे भोलासोबत मीच राहू तेना कपडा समायाले.एक साव एक बाबा भोलाना मांगे लागना होता.भोला पाणीमा झेपत झेपत पुढे किनारले उनता आणि मी तेना कपडा लीसन गावना रस्ता धरी भोलानी सेवा कराले तेनपा गयतू तेनामुळे भोला आपले माने.
भोला आणि मी लोहार बाबाना टपरीपा गवूत.गावबाहेरना बठेल लोकेसले देखी लिनं आणि आमना मोर्चा नदीकडे वळावा.आमनाकडे कोणं ध्यान नही होतं.मी नदीना पाणीकडे देखी रायंतू.नदी मस्त बागे बागे वाही रायंती.किनारले काही नही पण थोडं मधमा निथ्थयगार पाणी वाही रायंत.तवयं दोन्ही थड्या पाणी चालू होतं वाटतं.वरे देखं तं काया काया ढग जमा होयेल होतात.संध्याकायले पाणी पडी आसे वाटे.तेवढामा भोला बोलना,"अय,काढ की कपडे". मी तेनासोबत कपडा काढात.तेनी मना हात धरा.कधी नदीना पाणीमा उतरेल नही होतू तेनामुळे जीव घाबरी रायंता.भोला विश्वास दी रायंता."हात सोडणार नाही तुझा,फक्त पाय हलवायचे,पुढे हात मारायचे आपोआप पोहता येतं." तो सहज सांगी रायंता.माले किनारावर थांबाडीसन तो मस्त नदीमा थोडा पुढे जाईसन चक्कर मारी उना.मना विश्वास वाढना.मालेपण जमी म्हणीसन.भोला मना हात पकडी पुढे पुढे ली चालना होता.
मी तेले बोलनू,"तू झेप आता,तुझं तुझं.मी इथं झेपतो." तेनी दट्टी दिनी,"जास्त पुढे नको येऊ बरं.वाहून जाशील." मी मान हालाई.
किनारावर मस्त खाले वरे होयेल नंतर मजा येवाले लागनी होती.भोला मस्त मनावर पाणी उडाये आणि नदीमा मस्त झेपाना आनंद ली रायंता.नदीमा ठिकठिकाणे शेवाळं होतं.नदीमा माधला मासा डोयासमोर जायेत.भोला आणि माले आते थोडा टाईम हुई जायेल होता.आते मना आत्मविश्वास वाढी रायंता.मी परत परत गावबाहेरना लोकसले देखी लिवू म्हणजे कोणी देखाले नको.मी भोलाले न सांगताच नदीमा पुढे पुढे जावाले लागनू.मजा येवाले लागनी होती.आपलं झेपनं म्हणजे फक्त खालेवरे होवानं आणि हात पाणीले माराना.पाणी इकडेतिकडे उडे आणि मजा ये.दोन्ही हातसमा पाणी ली ॐ नमः शिवाय म्हणानं मस्त वाटे.भोलाले आराई मारी."भोला मजा ई रायनी". तेवढामा अचानक शेवायवरून मना पाय सटकना आणि मी पाणीना धारमा गंचागड्या खावाले लागनू.मी घाबरी गवू.जोरजोरमा रडाले लागनू.वाहता पाणीमा होतू तेनामुळे पाणी सोबत वाही रायंतू.नाकतोंडमा पाणी जाई रायंतं.खालेवरे,उलटासुलटा हुई रायंतू.
गावबाहेरना लोकेसनं तदलोंग मनाकडे ध्यान गयतं.त्यापण "वाचाडा,वाचाडा" म्हणी रायंतात.तेवढामा भोलानी मना हात पकडा आणि नदीना किनारकडे ओढाले लागना.नाकतोंडमा पाणी जायेल होतं तेनामुळे बोलतापण ये नही.दम भराई जायेल होता.भोलानी माले किनारवर आणताच.भोलाले कोणीतरी कानफटामा मारं आणि "मरी जाताना तो,घर नही लंब होता येस का येसले?" म्हणीसन संताप करी रायंता.तेवढामा भोलानी म्हनं पोट दाबं आणि पाणी बाहेर काढाले लागना.तेन देखीसन बाकीपण तसं कराले लागनात आणि पाणी बाहेर पडनं आणि थोडं बरं वाटाले लागनं.लोकेसनं बोलनं खात खात गावबाहेरून भोलानीच माले घर आणं होतं.
बुडी रायंतू म्हणीसन घर पहिलेच निरोप भेटी जायेल होता.घर येलवर पहिले मार भेटना मंग जीव लावायना माले."मंग,बरं भोल्या होता तेनाबरोबर दुसरा राथा थं भेटतापण नही आपले हा"."गलाटी गिरणाले भेटस,गिरणा तापीले भेटस आणि तापी समुद्राले भेटस,कथा देखतात येले"."तेनी सोबत सोडी तं बरं से तू". आसं एक ना अनेक वाक्य कानवर ई रायंतात.भोलानं कौतुक हुई रायंत.घाबरेल होतू तेनामुळे भोलासंगे तवय बोलायनं नही.भोला मनासाठे देवदोस्त होता.तेनीच पाणीमा उतरावं आणि मी तेना विश्वास तोडीसन पुढेपुढे गवू बुडाले.त्या दिवस भोला नही राथा तं.....?
भोलानी आपले वाचाडं होतं.धाकलपणना भोला आते मोठा होयेल से.झेपानं नाव उनं, की पहिले डोयासमोर भोलाच उभा रास.भोलानं त्या नंतर गावमाधून दुसरा गावले गयात. कामनिमित्त गावमा भोलान त्या उनात आणि भेटना म्हणजे पहिले तोच विषय राये आमना.तेनं पहिलं वाक्य - "मरता मरता वाचाले होता बे तू". तो उना आसे जरी माहिती पडनं तरी मी तेले पहिले भेटाले जाऊ पयता पयता.तेनं नुसतं दिसनं तरी देव भेटाना भास होये.आते भोलाले गणज दिवसना भेटेल नही पण भेटानी आस लागेल से.भोला नुसता दोस्तच नही तर तो जीव वाचाडणारा 'देवदोस्त' से आपला.प्रत्येकना जीवनमा आसा देवदोस्त भोला राससं ना...?
- भरत पाटील
9665911657
9665911657
#आमनं_धाकलपन


Comments
Post a Comment