एक रूपयाना खे

एक रूपयाना खे
- भरत पाटील

       दुपार व्हयेल होती.वर्गामा काही करमे नही.पीटीना तास होता सरनी समदाजण देवसारखी वाट देखी रायंतात.
"गूड अफ्टरनुन सर" समदा पोरं उभा रायनात आणि कोपरामा बसेल होतू तेनामुळे उठत नही तदलोंग पोरसले बसासाठे सरनी हातकन खुणावं.आख्खा वर्ग बसना आणि मी बहाद्दर उभाच होतू. "अय ठिकाणावर आहे का?" आसे म्हणीसन सरनी समदा वर्गवर एक नजर मारी. "खेळायला सोडतोय,थोडं प्रेमानं खेळा.भांडण करू नका.कोणाचे रडगाणे आणू नका.जो घेऊन येईल तोच आधी देवाचा प्रसाद खाईल". सरनी सुचना आईकीसन फुकटना प्रसाद लेवाले काही कोणी येणार नही हाई सरले माहिती होतं.आम्ही समदा बाहेर खेवाले उनूत.

      वर्गाना बाहेर येताच.आमन्या ठरेल गँगा तयार झायात.संजीवनी गँग - मस्त हातसमा हात जाताच पंजाना खाले अंगठा टोचा की धव्व पाडानं आणि समदा बोट वरना साईडले वाकाडात की काय्य पाडानं ठरेल राहे.नही तं वर्गामाच गँगना बॉसनी ठराई देवानं गुपचूप आज कोणले कोणले राज्य ली घोमलावानं.समदं ठरेल.एखादाच गेम सरळ होये.येनामुळे बराच आमना दोस्त संजवानी सोडी शाळामा लपाछपी खेत.तेनामाबी तसंच राये.दोस्तना दोस्त आपला दोस्त.कोणावर राज्य येऊ देवाना, हाई मस्त जेनावर राज्य राये तो एखादाले देखीसनपण नही देखेल सारखं करे आणि जेले झामलानं राये तेना पत्ता खाले वाकी वाकी थोडंसं गाणं म्हणीसन विचारी ले.आपोआप राज्यवाला गडी सापळामा सापडी जाये.काहीसना आपलं आपलं बेंच गडी म्हणीसन खिसामाधल्या चिचोक्या काडीसन एखादा झाडखाले चारआठ,आजीबाईनं घर,चोर पोलीस खेवानं.तेनामापण नेता गडी रायेच.बैठा खे वाला पयनारासनी मजा लेत.जोगतून पयनात की हाठकून मधमा पाय घालाना आणि पयनाराले पाडाना.हाच उद्योग जास्त करी येसनी करो.थोडं कोपराले देखं की बोलीबोली,लगंडीवाला गडी मस्त मजा करेत.समदं देखी रायंतू पण ध्यान काही लागे नही.तदलोंग किरननतेसना वर्ग बाहेर उना.मन एकदम खुश.उमेशना पण वर्ग बाहेर उना.उमेश आमना एक वर्ग पुढे होता.तेले क्रिकेटनं भयानं येडं होतं.या दोन्ही एकमेकसंगे काहीतरी बोलनात वाटते.जवळ जाताच समजणं संध्याकायले एक रूपयानी मॕच लेल से......!

     संध्याकायले शाळा सुटनी.घर जाताच आंगण झाडझुडं,भांडा धोवानं काम आपटी लिनं.तदलोंग किरण बॕट बॉल ली हजर झाया.आम्ही दोन्हीजण ढोर दवाखानामा गवूत.हा दवाखाना म्हणजे आमनं घरनं वानखेडे स्टेडीयम.धाकलपणन्या गणज गोष्टीसना ढोर दवाखाना पुरावा से.उमेश,अमोल समदा जमनात.मॕच ठरनी.गडी पाडना विषयच राहे नही.ठरेल गडी लेना पडेत.कच्चा पक्काना विषय राये नही पण हा तुनाकडून,हा मनाकडून,उरेल कॉमन करी टाकाना.30-40 फुटवर बॉडंरी राये.आंगणवाडी भितीले तीन रेषा आणि तेनावर तीन काड्या लायात म्हणजे आमना स्टंप तयार हुई जायेत.स्टंप आणालेपण तू आण,तू आण होयं.नही कोणी आणं तं मंग आमले नही खेनं.आसे हुई जाये.तेनामा काड्यासनबी आसे राये की तठेच शेजारे कपाशीन्या,तोरन्या,निमन बयतन जमा करेल राये.तेनामाबी आमना हेवादावा ठरेलच राये.आज येसन्या काड्या आण.कालदीन आमन्या लिनत्यात.तेनावरून पण थोडीफार झुमकी जाये.आमनी मॕचना नियम ठरनात उजवा साईडले डॉक्टरदादानं घर होतं.घरले डायरेक लागना,घरमा जाईवाटे बॉल मधमा गया,वरे गया तर आऊट राये.डावा साईडले शॉपींग सेंटर होतात तेसले डायरेक लागना तं आऊट राये.दोन्ही शॉपींग सेंटरसना मधमा दहा बारा फुट जागा होती तेनामाधून गया तं चौका आणि डायरेक गया तं आऊट.खेनाराले फक्त समोर मारनं पडे.तेपण खालतूनच.आमनी मॕच राहे 'आऊट ते आऊट' म्हणजे वरी नही तं काही नही.मन भरस्तो ख्या.पण पंधरा वीस मिनिटनावरे मॕच काही होये नही.

     किरण आणि उमेशनी मॕच दुपारलेच मॕच लेल होती.गडी बी वाटाई गयतात.मी किरणकडून होतू.आते मॕचना टॉस पडना.टॉस उमेश जिकना.मॕचले सुरूवात झाई.पहिला बॉलपासून टीवीमाधला समदा क्रिकेटर आमना मैदानवर येत.फिल्डिंग करनारा आपण कोण ते वाटीसन,बाया आवरीसन फिल्डींग करेत.बॉलर जरी प्लॕस्टीकना पेप्सीना बॉल टाके तरी तो स्वतःले जवागल श्रीनाथ,कांबळे,शेन वॉर्न,पोलॉक समजे.बॕटींगवालासना विषयच नही होता.भारतना आणि ज्या बाहेर देशना क्रिकेटर होतात त्या आपोआप आमना धाकला मैदानमा येत.जर त्या आठवडामा मॕच होयेल रायनी तं विचारानंच काम नही.चालू चालू उठता बसता मनवर राज्य करणारा क्रिकेटपटू बॕट बॉल खे.

        पहिली मॕच उमेश जिकना.किरननी एक रूपया रोख उमेशले दिना.तेसनी पुरी गँग बेकार उड्या मारी रायंती.आमले बोगस वाटे.धाकलपणना दुसरा टीमनं कौतुक करानं रास हाई आमले माहितीच नही होतं.त्या जिकताच त्या आमना दुश्मन हुई गयात.आमनं ठरेल राये.जो जिकना तेनी बॕटींग पहिले.दुसरी आणि तिसरी मॕच आमी जिकनूत.आते एक रूपया किरण जिकेल होता.संध्याकाय हुई जायेल होती.मॕच होतीच नही.बाकीना आमना आणि उमेशना फिल्डर घर चालना गयात.आते आम्हीपण जावाले निघंनूत.किरण एक रूपया जिकेल होता.उमेशले तो परत लेना होता आणि मॕचशिवाय पर्याय नही होता.पहिलेच संध्याकाय हुई जायेल होती आणि तेनामा उमेशनी किरणले थांबांड,"मारो,मारो एक रूपया दे डाल.नही तं मॕच ले ले.हाऊर एक". किरणले हाई मान्य नही होतं.थोडा टाईम दोन्हीसनी थोडी बोलाबाली झाई.मॕच लेवानं ठरनं.उमेश,अमोल आणि किरण,मी आसा दोन दोन जनसनी मॕच सुरू झाई.आमी जिकेल होतूत तेनामुळे बॕटींग आमनीच होती.

          पहिला मी उतरनू संध्याकायना टाईम होता तेनामुळे पटापट खी रायंतूत आमले हारनू काय आणि जिकनूत काय फरक नही होता पण उमेशले जिकणच होतं.मी तीन चार चौका मारा असतीन पण उमेशना फास्ट बॉलसना शिकार मना पाय व्हयनात आणि मी आऊट होयनू.मी रागकन उमेशकडे देखं आणि तेले सांगीच टाकं,"आमनापण फास्ट बॉल उनात की बोलानं नही". जिव्वर आणि होती.किरण उतरना.किरणनी अमोल आणि उमेशनी चांगलीच धुलाई करी.तेरा चौका मारात आणि किरणनी फिफ्टी झाई.मैदानमा आमी चारच जण होतूत तेनामुळे आमना टीमकडून किरणंन अभिनंदन करीसन मी वाकाडंतिकडं नाचाले लागनू.उमेश समदा बॉलरसनी ॲक्टींग करी करी बॉल टाके.एक टाईम फास्टर आणि उमेश थोडा खाले वाकना आणि हात चार ठिकाणे वाकडा करा की,समजी लेवानं स्पीन बॉल पडनार से.उमेशनी म्हनासारखंच किरणले फास्ट बॉलकन उडाव आणि जिकाले ठेवात आम्ही एकोणसत्तर रन.किरणना पायपण समोरला दोन्ही बॉलरसना फास्ट बॉलना शिकार होयेल होतात.

      थोडं थोडं अंधारं हुई जायेल होतं.या मैदानवर इतका रन करणं सोपं नही होतं.तेनामा किरणनी फिफ्टी होयेल होती.मधमा मधमा डिवचाना प्रकार घडेत.अमोल उतरना.दोन्हीसनं ठरी जायेल होतं आडाई आडाई खेवानं.अमोल एक दोन चौका मारीसन आडाई आडाई खे.साहजिकच आमनापण तोल गया.आमनाकडेपण समदा जगमाधला बॉलर आमनाकडून उनात.तेसनाकडे द्रविडपासून रणत्तुंगा,रिकी पॉटींग खेत आणि तेनामाच किरणना शॉन पॉलकनी अमोलना द्रविडना पायमाधून बॉलकाढीसन् दंडा उडावा.बेकार आनंद झाया आमले.मस्त उड्या मारी मारी टाया देऊत आम्ही एकमेकसले.उमेशनी टीम आते हारी जाई आसे वाटे पण नियतीले मान्य नही होतं वाटतं.उमेश मैदानमा उतरना.पहिला बॉलपासून बॉल पडना की समोर बॕट धरी बसी जावानं हाच शिरस्ता पकडा उमेशनी.किरण झाया की मी ओवर टाकू.मी झावू की किरण हाई चालूच होतं.उमेशनी बेकार जिव्वर येल होती.तेले हारेल एक रूपया परत लेना होता आणि आमले परत तेले जोडना होता.

        अंधारं पडी गयतं.रस्तावरला गाडाबैलपण गोठामा शांत हुई जायेल होतात.रस्ताना माणसं घर जायेल होतात.ग्रामपंचायतना खांबवरला लाईट सुरू होयना होतात पण उमेश काही आऊट होवानं नाव ले नही.जशास तसे उत्तर देवानं आमनं ठरनं.आंधारामा बॉल दिसनार नही म्हणीसन किरणनी आणि मी पिलॕन बनाडा.फास्ट बॉल टाकता टाकता एखादा बागे बॉल टाकी देवाना म्हणजे तो आडाई आडाई खेतांना बरोबर स्टंपले बॉल लागी आसं ठरनं आणि मी अॉफसाईडले तेना थोडा जोगे जावानं म्हणजे तो चौका माराना प्रयत्न करी.आम्ही ठरेलप्रमाणे कराले लागनूत उमेशनी दोन चार चौका मारातपण.मी जोगे होतू म्हणीसन जोरमा म्हालेपण बॕटकन सपकन बॉल मारा.अंधारामा तो बेकार मजा ली रायंता आमनी."मॕच थांबाडस मी,पण मना एक रूपया किरणले देवाले लाव". उमेश बोलना.किरण म्हणे,"घर जा रे तू". 

      मॕच मस्त रंगमा उनी.अंधाराना आम्हीपण फास्ट बॉल टाकीसन आमना बदला काढा पण लगेच आमले गायासना बदलामा ते वापस भेटे.आसे करता करता बॉल दिसेच नही.ना फिल्डींग करनाराले ना खेनाराला.तेनामाच किरणनी बागे बॉल टाकीसन उमेशले आउट करं पण भितले लागी बॉल आखेल रेसपा उना.आखेल रेसले बॉल  ओलांडायना तं नो बॉल राये.तो बॉल थोडा रेसना मांगेच होता.उमेशनी तेले धक्का दिनता ते आमना ध्यानमा उनं आम्ही विरोध करताच.उमेशनी आणि किरणनी मारामारी सुरू झायी.तेनामा मी आणि अमोलपण एकमेकसन भिडनूत.बेकार गाया आणि जेले जे सापडी ते मारान.लाथा बुक्कीसनं काम होताच.उमेशनी किरणला बॉल मारा आणि किरणनी पण उमेशले बॕट मारी.उमेशले जोरमा बॕट लागनी.तो रडाले लागना.गाया देवाले लागना.आमले दोन्हीसले समजानं ते समजनूत आणि तठून बॕट बॉल ली घरकडे पयनूत.आम्ही हासी हासी पयी रायंतूत.आमना खे थांबी गयता.आम्ही एक रूपया जिकेल होतूत.उमेश एक रूपया हारी गयता.आम्ही जिकाना आनंदपण साजरा करा नही.अंधारामा घरकडे पयनूत.किरन आमना घरकडून शॉटकट तेना घरकडे पयना.इकडे उमेश रडना आणि परत एक रूपया परत भेटासाठे दुसरा दिवस दोन रूपयानी मॕच लेवूत आसं किरणले सांगाले लागना.

       आमनी खोड मुडी जायेल होती.एक रूपयाना खे नी बरंच सिकाडं होतं.उमेशना एक रूपयाना खे जीवनमा संयम,खिलाडूवृत्ती,पैसानं महत्त्व,दोस्ती,येल जिव्वर असा बराच विषयसले साद घाली गयता.जीवनमा 'खे' न महत्त्व अबाधित से.जीवनमा आपला या दोस्तनामुळेच जीवनभर साथ देतीन आसा प्रसंग घडतंस खरं शे ना....! आज पण एक रूपयाना खे नं आमना मनमा स्थान अबाधित से...?

- भरत पाटील,9665911657
#आमनं_धाकलपण

Comments

Popular Posts