डोखल्या

डोखल्या
     - भरत पाटील

      "का रे मासा खावानात का?"  आण्णा लपाछपी खेताना बोलना.सूर्याना लपाना टाईम होयल होता.मासा नदीमा पकडाना आणि त्या घर ली जावाना म्हणजे आयती पाट लाल करनं होतं.जितूवर राज्य होता.तो समदासले झामली रायंता.आमना इकडे लपतालपता पिलॕन चालू होता.समदासनी सापडी जावानं ठरनं आणि एक नंबरवालानी कालदीन राज्य देवानं ठरनं.समदा सापडी गवूत.

       आते समदा बालवाडीना पायरीसवर आणि ढोर दवाखानाना लोखंडवर बसनात.तेवडामा आण्णानी मासा  खावाना विषय काढा.नदी फक्त हाकना आंतरवर होती डॉक्टरदादाना घरना मांगे.मासा नदीना डाबुल्लामा झामलाना.तेनानंतर त्या कोठे भुंजाना ते समदं ठरनं,पण दहा बारा जणसमाधून फक्त आम्ही तीन चार जण आण्णासोबत मासा खावाना पार्टीमा थांबनूत.बाकीनासनी मना बाप मारी,मनी माय घोमलाई,बाबा!आजी,काकानं कारण देत आमनापासून कलटी मारी.काहीसले नही खावानात म्हणीसन धूम ठोकी.

       आते आम्ही समदाजण मासा पकडासाठे नदीकडे गवूत.साहित्य कसानंकाय.फक्त मासा खावाना म्हणीसन आण्णाना मांगे आम्ही गवूत.नदीमा समदं गावनंच पाणी होतं.गड्डर आणि थोडंफार मांगाला पाणीनं पाणी जमेल होतं.वरनावर चांगलं दिसे पण मधमा बेकार गारा आणि समदं हिरवंगार पाणी होतं.मासा खावाना म्हणीसन समदं कसं चांगलं चांगलंच दिसे.हिरवंगार शेवाळं,काटेरी झाडं एकेक काढी,बाजूले करीसन आण्णा नदीना डाबुल्लामा उतरना.आण्णा पटापट पाय खालेवर करताच डाबुल्लं पुरं काळंशार दिसाले लागणं.गारामा हात घालताच आण्णा बोलना,"अरे,पयना रे.मोठा होता."खरं खोटं आण्णालेच माहिती होतं.आण्णाना प्रयत्न देखीदेखी आते मालेपण वाटाले लागणं आपणपण मासा पकडाले जावो.मी पण त्या डाबुल्लामा उतरनू.मांगे जिभूबी उतरना.बाहेर एकजण थांबना.आण्णाले हातमा माही असा मासा सापडना आणि आण्णा जोरमा बोलना,"डोखल्या सापडना.पिशवी आण पटकन." समदाजण डायरेक मासा धराले येल होतात तेनामुळे पिशवीना तपास नही होता.बाहेरना गडी पटकन उखल्लाकडे पयना आणि तथाईन पिशवी लई उना.तदलोंग आण्णा डोखल्या मासाले दोन्ही पंजासमा पक्का पकडीसन होता.आम्ही फक्त डाबुल्लामा उभ राही आण्णानी गम्मत देखी रांयतूत.आण्णानी पटकन पिशवीमा डोखल्या टाका आणि आण्णा पिशवीमाधला उड्या मारणारा डोखल्याकडे देखी बोलना,"हाऊ मीच खासू." 

       आमना चेहरा पडी गया.आमले आजून डोखल्या काय दुसरा मासाबी सापडेल नही होता.जिभू आणि मी पटकन आपलेबी डोखल्या सापडाले पाहिजे म्हणीसन गारामा हात गचालात.कोपरा कोपरा धरी झामलाले लागनू.जिभूले बी सापडना आणि आण्णाना विषयच नही होता.आण्णाना चार डोखल्या हुई गयतात.आर्धा तास होयना असीन पण माले काही डोखल्या सापडे नही.हातमा ये पण पकडाये नही.तेवढामा डाक्टरीन ताईना आवाज उना,"का रे पळता का रे तेथून काही पण खेळ करता ते?,तुमच्या घरीच सांगते नावं तुमची". ताईना बोलनं ऐकताच आम्ही कसामसा पाणीना बाहेर पडतून.पिशवी लीसन समदासनी तठून धूम ठोकी आणि हायवर उनूत.

         गावना बाहेरना हायवर येताच समदासनी तेनामाधला पाणीकन आपला हातपाय आणि कपडासवरला गारा धुई टाका.मना डोयासमोर डोखल्याच ई रायंता.माले पहिलेच एकपण डोखल्या सापडना नही होता आणि जेले सापडी तेलेच खावाले भेटी नियम अप्रत्यक्ष आण्णा बोलना होता.तेनामुळे धाकलं तोंड होयल होतं.हातमाधला सुटेल डोखल्या परत परत हातमाच से का काय ते वाटे.

      संध्याकायना टाईम आणि आंधारं पडाले सुरूवात होयेल होती.आण्णानी माले काड्या गोया कराले लावं,बाकीना जागा झामलाना पिलॕन कराले लागनात.महादेव मंदीरना थोडा मांगे जागा होती.तठेच भुंजानं ठरनं होतं.काड्या ली जाताच ठिकाण समजनं.थोडं मनमा घाबराले होयनं.जोगेच शंकरजीनं मंदीर,समोर भैरवनाथ,मारूती मंदीर पण डोखल्या डोयासमोर होता.आण्णानी मस्त तगारीमा डोखल्या टाकात.जिभूनी हायमाधून पाणी आणं.आण्णानी मस्त त्या धुई टाकात.आण्णाले सापडेल चार आणि जिभूले सापडेल एक आसा पाचच डोखल्या होतात.माले सापडेल नही होता तेनामुळे माले भेटस का नही हाई समदं आण्णावर होतं.आण्णानी जाड्या पाच काड्या आणाले लाव्यात.मी भेटी म्हणीसन पटपट काम करू अन् आण्णाना तोंडकडे टकमक देखू.आण्णानी मस्त बारीक काड्यासनी आकती करी आणि जाड्या काडीसमा एक डोखल्या फसाडी,मीठ टाकी मस्त भुंजाले सुरूवात करी.तो मस्त भुंजताच.आण्णानी मीठनी पुडी आणि थोडं तिखट टाकी मस्त एक बाजूकन तेले वरपा आणि बोलना,"भयान भुंजायना रे,बेकार भारी लागी रायना.आजून थोडासा सापडाले पाहिजे होतात".आम्ही आण्णाना तोंडकडे नुसतं तोंडमाधलं पाणी मधमानमधमा पीसन केविलवाना नजरकन देखी रायंतूत.आण्णाना पहिला राऊंड हुई गयता.

     काड्या कमी पडतीन म्हणीसन आण्णानी परत काड्या आणाले सांग्यात.आंधारं पडी जायेल होतं.घरना वाट देखी रायना असतीन आणि आपला मासा पकडाना निरोप घर आपला दोस्तसनी पटकन दिना असीन येनी खात्री होतीच.इकडे डोखल्या खावानी लालूच जास्त होती.पटकन काड्या आणताच आण्णानी चारी डोखल्या सारखा भुंजात आणि आम्ही चारी चार बाजूसले आकतीना बाजूलेच बसनूत.समदा डोखल्या भुंजायना असतीन असं आण्णाले समजताच आण्णा एक एक बाहेर काढाले लागना.तेले थोडं मीठ,थोडं तिखट लाई लाई एकेकले देत गया.मना नंबर येताच आण्णानी स्वतःले डोखल्या ली लिना.आते मना जीव थोडाथोडा व्हयना.एकच बाकी होता.आण्णा बोलना,"आरे तुलेबी भेटीना,तुनीपण काम करेल से".चेहरा खुलना.आण्णानी माले कागदमा डोखल्या दिना आणि मी पण बाकीनासना सोबत डोखल्याना सव्वाद मीठ,तिखट टाकी लेवाले लागनू.भयान भारी वाटी रायंत.डोखल्याना स्वाद तोंडमाच होता.तोपर्यंत आवाज उना,"काय से रे?" कोणा आवाज होता माहित नही पण समदा घाबरी तठून थेट घर गयात.

       जास्त टाईम हुई जायेल होता.तेनामा घर जाताच समदासनी डोखल्यामुळे कमी जास्त मार खादा.दुसरा दिवस मस्त डोखल्यान्या गोष्टी ढोर दवाखानामा लोखंडना दांडांवर व्हयन्यात आणि कोणी कसा मार खादा येनावर हासामा बराच टाईम निंघी गया पण नही सापडेल डोखल्या डोकामाच रायना कायमना.


- भरत पाटील

#आमनं_धाकलपन

Comments

Popular Posts