आनलाईन सिकसन
आनलाईन सिकसन
- भरत पाटील
राम आपला परिवारसोबत टीवी देखी रायंता.दिवसभर दमेलमुळे डोयामा झोप माई नही रायंती.भितडाले पाट लाईसन मस्त पिच्चर देखाना मुड आणि तेवडामा बाहेरून लखनना आवाज ऊना,"ओ राम,बातम्या देख रे,पोरसले आते आनलाईन सिकसन देनं पडी म्हणे आते". रामनी लगेच हातमा रिमोट लिसन बातम्यासनं च्यानल लावं आणि घरमाधला बट्टाजण टीवीकडे टक लाईसन देखाले लागनात.समद्या बातम्या संपी गयात.अन् जो तो जेना तेना काममा लागी गयं.पोरं मस्त खेवाले गयात आणि जोरजोरमा आरया माराले लागनात, "आते आपण आनलाईन सिकसूत,शायमा जावानच काम नही". असं म्हणीसन आनंद लुटी रायंतात.
रामनी आते भितडं सोडं होतं.तेना थकवा आनलाईन सिकसन ली गयतं.तेना डोयासमोर काय कराले पाहिजे तेच समजे नही.घरमा दोन पोर एक मोबाईल अभ्यास कसा लेवा येना प्रश्न पडना.पोरसले आते मोबाईल देना पडी,मोबाईलले रिचार्ज मारी देना पडस जाई,त्या पैसा कसा जमाडानात?,आपला मोबाईलले टेकडीवर येणारी रेंज,दिवसभर कामले जासूत तवय संध्याकायले चुला चेटी, आसी परिस्थितीमा कसा काय आपण पोरसना अभ्यास लेसूत येनी चिंता रामले सताई रायंती.तदलोंग रामना दोन्ही पोरसनी रामले जेवाले बलावं.समदाजण जेवाले बसेल होतात.दोन्ही पोरं मस्त आनलाईन सिकसन भेटी म्हणीसन दादा आते आपले दररोज मोबाईल दी असा विचार करीसन पोटभर जी रायंतात.रामना हेडामा काही घास जाईना.पहिलेच जुना मोबाईल लेल आणि तेना बाकीना पैसाबी देवाना बाकी अन् येनामा एक मोबाईल आणि जास्त भानगडी होणार होत्यात.राम विचारमा पडी गयता.
रामनी बायको सखी समदं देखी रायंती.तिनी पोरसनं जेवण आपटणं हाई देखताच तेसले आथरून टाकाले धाडं आणि सखी रामले बोलनी,"आहो,चिंता कसाले करतंस,टीवीमाधली बाईनी आनलाईन सिकसननं सांग हाई खरं से पण तुम्ही तिनं बाकीनं आयकं का?" रामनं ध्यान बायकोकडे गयं."नही तं,आनलाईन सिकसन तेवढं डोकामा रायनं आणि तेनासाठे कितल्या आडचणी आते येतीन माहिती से का तुले?
राम बोलीच रायंता," आवं मोबाईलना पहिलेच पैसा देना सेत,तेनामा रिचार्ज मारना पडी आपले,रेंज आठे येत नही,टेकडीवर येस.तेनामा छकुली आणि धाकल्या दोनीसनं आनलाईन सिकसन चाली,आपले घर राहता येणार नही,घर रासी तं काय खासी? टीवीनं ठीक से पण मोबाईलमुळे आपण तेरोज टीवीमा देखं नही का - कसा डोया खराब होतंस,त्या वायरी कानमा टाकात तं कान खराब होतंस आणि टीवीमाधला बाईनी सांग नही का,डोकामा फरक पडी जास म्हणे.सखी समदं आयकी रायंती.तिनी रामले समदं डोकामा जितकं होतं तितकं बोलू दिनं.तो बोलीच रायंता,"आवं ह्या पोरसमा मोबाईल दिना तं ह्या आतेच कसा विडीओ देखतंस,गेम खेतस,लवकर देतस नही मोबाईल,दांगडो करतंस आणि आपलाच कसा दांगडो होस मंग...!
आसे बोलताच सखी जोरजोरमा हासनी.रामले नवल वाटणं आणि तोपण हासना.दोन्हीजण मस्त मनसोक्त हासनात आणि सखी बागेच रामले बोलनी,"दोन तीन महिनामा कोरोनानी आवसद तयार वयनी की लगेच शाळा सुरू होणार सेत म्हणे,हाई आयकं ना तुमी.तदलोंग गुरूजीले सांगाई जाई,जेवढा अभ्यास धाडस्यात तेवढा काही होणार नही,आमन्या आशा समस्या सेतस डायरेक तेसले सांगा आणि काय हो,आपणपण तं शाळामा गयतूतच ना,काही दिवस शाळाना अभ्यास बुडना तं काय फरक पडना,घरना,वावरना अभ्यास तं हुई पोरसना.तेसना पुस्तकं देखेल सेत मनी.गनज गोष्टी तं घरन्या,गावन्या आणि वावरन्याच सेतंस.त्याच तेसले या तीन महिना सिकाडूत आपण दोन्ही मी.सकाय सकायले व्यायाम करानं सिकाडूत तेसले.टीवीमाबी लागस.देखी देखी सिकतीन त्या.रांधसूबी आणि तेसनावर ध्यानबी ठेवसू.पोरसले घर एकटं सोडता नही येणार,संध्याकायले जमी तसा दोन्हीजण अभ्यास लेत जावूत.पहिले मोबाईलना रायेल पैसा दी टाकूत नंतर आपला पोरसनं आनलाईन सिकसननं देखूत,चला,झोपा तुम्ही आते थकेल सेतस.पोरसनी आथरून टाकं असीन.मी येस या भांडा आवरी". आसे म्हणीसन सखी काम आवराले लागनी.
राम लगेच बाहेर उना दोन्ही पोरसना बाजूले झोपना.दोन्हीसना चेहरावरून मायना हात फिरावा आणि आकासकडे तोंड करी चांन्या,चंद्र देखाले लागना.सखीना आधारना बोलमुळे तेनं पोरसनं आनलाईन सिकसननं टेनशन चालनं गयतं.तो मस्त शांत झोपी गया जसं काही घडेलच नही होतं.सखी बाहेर येताच राम आणि पोरसकडे झाकेल चिंताकन देखतच रायनी.
- भरत पाटील
#आमनं_धाकलपण

Comments
Post a Comment