निंबू सरबत पार्टी
निंबू सरबत पार्टी
-भरत पाटील
भर दुपार व्हयल होती.कोणी टी.वी देखी रायंत,कोणी घरना कोपरामा गोट्या गोट्या खी रायंत,कोणी लपाछपी.तेवढामा जिभूना डोकामा निंबू सरबतनी पार्टी कराना विचार उना.तेनी फिरावं आपलं तोंड निलूकडे.निलूनी दिना प्रतिसाद जिभूले.दोन्हीसनी फिरावात आपला पावलं मनाकडे आणि आपला उद्योग सुरू होता.कचाकडानी थैली,ताटली येसना संगम करी काडीना दणका मारी बनाडं होतं ढुमडं.आणि वाजे कसं...? तोंड गाणं म्हणे आणि हात वाजाडेत गड्डू मड्डूम गुम...
आपलाच धुनमा होतू तदलोंग जिभू म्हणे,"चला निंबू सरबत पार्टी करानी से". धाकलपणनी पार्टी म्हणजे विचारालेच नको.पार्टीमा जितका सदस्य तेना दोन तीन पट झगडा ठरेलच रातसं.अन् बस् बाहेरना गोखलामा चप्पलासना मधमा आपलं ढुमडं दपाडी आम्ही जमनूत गल्लीना सात आठ जण.चक्कीपा जमनी निंबू गँग.समदा गलबला सुरू होताच बाजूना घरमाधून आवाज उना,"तरफडतस का रे तिकडे". समदी गँग जथा रस्ता भेटी तसा पयनात आणि भेटनात गलाटीमा.
गलाटी म्हणजे आमना आड्डा.हाई नदी म्हणजे बराच उद्योगसन आपलं फेवरेट ठिकाण.ह्याच नदीनी आनंद पण देल से आणि बेकार मार पण खावाडेल से.जेले खेवाले जागा नही भेटनी तेनी खुशाल आपला मोर्चा गलाटीकडे जाऊ द्यावा,गलाटी सकायनी संध्याकाय कशी हुई येना इंतजाम आपोआप करी दे.
जिभू,निलूसंगे समदा जमनात गलाटीमा.निंबू सरबतनं नियोजन चक्कीपाच हुई जायेल होतं.बाकीनासनी आपापला घरमाधून आपले लागी तेवढी साखर आणानं ठरेल होतं.एककडे पाणी,दुसराकडे मीठ,तिसराकडे गलास,तांब्या आणि उरेलसनी निंबू लेवाले जावानं ठरेल वावरमा.मंग बाभूयना झाड खाले ठरेल समदं डोकामा ली आर्धी गँग निंबू लेवाले वावरकडे आणि आर्धी गँग घरकडे रवाना झायी.
आम्ही वावरकडे रवाना व्हयनूत.तितूर नदीना रस्ता सुरू होताचं.अचानक भूतसन्या गोष्टी आमना डोयासमोर उभ्या रायन्यात.अरे आठे आसं व्हयल होतं,आठे आमूक टमूक व्हयल होतं.तेनामाच उनी चक्री भवरी आणि मंग काय,"बापरे,पया भौ भूत उनं वाटतं" आसं जिभू जोरमा घाबरी बोलना आणि समदाच धूम पयनात पुढे.कोणाच पायमा चप्पल नही होती.आपला पायच जगन्नाथ त्या काळमा.चप्पल लेवानी कथा वेगळीच करता येई.पुरा फफाटाना रस्ता,वरून सुर्यदेव मे ना हीट दाखाडी रायंता आणि आम्ही नंगा पाय लीसन पार्टीना धुनमा जमीनमायनी समदी उष्णता पाय खाले ली रायंतूत.जेना पाय फफाटामा पडना तेना तोंडमाधून आपोआप मायबाप ना जप व्हयं पण पार्टीना आशाखाले समदा अडचणीसवर मात करनी होती.मधमाच इकडनी तिकडनी टूम निघंनी की दातडा काढानात जोरजोरमा हाऊ न ठरेल नियम व्हता.
तेवढामा ठरेल ठिकाण उनं.समदासनी एकच झाडवरून निंबू न तोडता प्रत्येक झाडवरून एकच निंबू तोडानं ठरनं.आम्ही समदाजण निंबोनीमा घुसताच हाऊ तोडू का तो येनामाच रायनूत चार पाच निंबू होताच चला म्हणीसन जिभू बोलना.निंबोणीना बाहेर येताच समदासनी दोन दोन निंबू खिसामा ठेवात आणि तेवढामा वावरना मालकनी आराई उनी,"तुमना आंडेरसना शिलगंतस का नही तुम्ही घर". समदा घाबरनात आणि पयानी धूम ठोकी निंबोनीना कोपरावरला वावरना मालक समोर दिसताच आम्ही रस्ता जथा सापडी तसा पयाले लागनूत आणि घाबरेल गडी काय करतीन,खिसामाधला निंबू काकाकडे फेकत ढेकाया चेंदत चिनभीन पयनात. नऊ दहा निंबू समदा ढेकायासमा फेकीसन गडी थेट तितूर नदीमा गयात.काकाना धाक आणि ती आराई कानमा घर करी होती.थडी धरी धरी आणि मांगे फिरी फिरी आम्ही समदाजण काटाले पयमा जागा देत पईच रायंतूत.मांगे पांढरा कपडा जरी दिसना तरी वावरवाला काकाच होता की काय म्हणीसन पऊत.गँगना तुकडा व्हयना नदीमा.जेना पायमा काटा घुसना तेना पायना काटा येडा बाबुयना काटाकन काढानं आणि पुढे जावानं.एकमेकसना राग ये पण काय करी आमनी धाकली गँग दूर दूर राईसन एकमेकसना सपोटमा एक होती.थडी धरी धरी तितूरना पुलवर उनूत.सरळ मार्ग सोडीसन आम्ही दूरला मार्ग निवडेल होता.हायवेवर तिसरा पहारना टाईम होता.डांबर रस्ता पायले चांगलाच सेकी रायंता.रस्तावरल्या गाड्या मस्त वाटेत.निंबना झाडाखाले आमनी समदी गँग एक झाई.पाणीनी तिस लागेल होती पण सांगतीन कोणले.रस्तावरल्या गाड्या देखीदेखी गावना रस्ताले लागनूत.गावना बाहेर जमताच गावमाधून जातांना चारीजण चार गल्लीसमाधून जावानं ठरनं.नऊ दहा निंबूसनी बेकार थकाडं होतं.जीव पाणी पाणी करी रायंता पण निंबू पार्टीना नांदमा समदच नियोजन बिगडी जायेल होतं.चारीसना किस्सा कोणलेच सांगाना नही म्हणीसन ठरनं आणि गावमाधून घरघर,गल्लीगल्ली पार करतांना काकाच समोर दिसे अन् धास्ती बसी जाये.
समदाजण चक्कीपा जमनात.जेना घर पार्टी करानी होती.तिकडे आते मीठसाखर पाणी पी लिवूत आसं ठरनं.तिकडे जाताच तिकडे शांतता होती.टाईम बेकार हुई जायेल होता.तेनामुळे पार्टी न होताच संपी जायेल होती.तपास करा तं पार्टीवाला घरना वावरमा निंघी गयता.साखरवाला झोपेल होता.गलास,तांब्यावाला शाळामा खेवाले जायेल होता.आम्ही समदासनी एकमेकसना दाथडा काढीसन निरोप लिना.कारण निंबू सरबत पार्टीनी समदासले चांगलाच सपाटा दिनता कायमना.लगेच मी पटापटा घर गवू आणि ढसाढसा पाणी पीसन आपलं गोखलामाधलं ढुमडं लिसन गड्डू मड्डूम गुम वाजाले लागनू.
निंबू सरबत पार्टी बेकार जीवले लागनी होती.समदासना हिरमूड झाया होता.निंबूवाला काकाना घरकडे पुढला आठ दहा दिवस गवूतच नहीत.काका गल्लीमाधून गया,उना तं लगेच लपानं.कवय झोडपा भेटी कवय नही येना नेमच नव्हता.नऊ दहा निंबूसनी बेकार सात आठ किलोमीटरना फेरा तोपण भर उंडायामा नंगा पायसले दिनता.काकाले विचारीसन निंबू भेटतात पण त्या कमी भेटतात आणि "निंबू सरबत पार्टीले मजा येणार नही,जास्त निंबूशिवाय" हाई वाक्यवाला आमना दोस्त बेकार ध्यानमा रायना या प्रसंगमुळे.निंबू न विचारता लेवान म्हणजे चोरीच करानं ते नियतीले मान्य नव्हतं.निंबू पार्टीना किस्सा कवयपण डोयासमोर येताच.उंडाया,फफाटा,निंबू पार्टी गँग,वावरवाला काका,गलाटी,तितूर नदी,हायवे.डांबर रस्ता,गल्ल्या आणि शेवट होयल पोपट बेकार हासाडसं आणि कोठेतरी आजपण वाटसं वाईट.वाईट गोष्ट करापासून दूर लोटणारा निंबूवाला काका आजपण हृदयना एक कोपरामा जागल्यानी भूमिका निभाडंस...!
🖋️- भरत विठ्ठल पाटील
#आमनं_धाकलपण


Comments
Post a Comment