आन्टीना
आन्टीना
"जलदी, जाय रे. तो मजाना डाखूले घोमाली रायना.पटकन आन्टीना हालायी ये."
नाना मामा बाबाजीले बोलना.
आन्टीना वारावादनमुये हालेल होता.दुपारनी भवरी जोरमा होती.भरत मामाना घरमाधून फायटींगना आवाज यी रायना होता.तवतव आमना समदासना जीव खालेवरे करे.भोला नी जागेच कल्टी मारीसन हिरामाय जोगे खाटलावर जागा समायी लिनती.नी खूदू खुदू आमले हासी रायना होता.
बाबाजी पटकन धाबावरे आन्टीनापा गयता.आमना आटापिटा लवकर टीवी चालू होवाना होता.तिले येल मुंग्या नी पट्टा तेसना रंग दाखाडी रायंतात.गप्पासना फड समदा घरमा कचकच आवाज करी रायना होता.बाबाजीनी वरे जायीसन आन्टीनानी दांडी मोताबाबाना घरकडे करताच.
"बसंती...."
टीवी माधून आवाज झाया.
समदासना तोंडं टीवीना मुसडाकडे झायात.परत मुंग्या चालू झायात...
"ओ भो,थोडा दगडं लायी दे ना तठे."
सायकोरमाय पिव्वी जर्दा तोंडमा टाकत बोलनी.
"आरे,ती वायर हालाव."
झोपेल नाना मामा एक कानीवर होत बोलना.
धाकला बाबाजी मजाना आन्टीना आथातथा करी खाल्ला आवाजनी वाट दखी रायंता.शेजारना घरमाधून आते फायटींगना आवाज येवाले लागना होता.भोया पका मामा किदरीसन,
"ओ नानाभू,तूच जा रे.वा छोटाकू कै समजोंगो भो.रातकी म्याच बी है."
थोडा टायीममा नाना मामा उबगीसन वरे गया.आन्टीनाले धरीसन गलाटीकडे करं.दोन तीन दगडं तेना भुंडांले लावात.
"बस.. बस.."
खालतून आवाज होताच नाना मामा खाले वूना बाबाजीले लिसन.पिच्चर रंगमा येल होता.गब्बर,संबा,जय विरू,ठाकूर समदा देखीसन आम्ही खुस होतूत.घर समदं भरी जायेल होतं.उंडायना दिनमुये दुपारना झोपेल गडीपन धाबाना घरमा थंडावा लेवाले येल होतात.तवढात लायीटनी पोबारा करा.
"ओ,तिनी मायनी उपाद मारू.ल्या आते यीनं लिसन...."
सुमेर आन्ना टायी देत निंघी गया.आमले राग वूनता.
समदा आते जायेल लायीटनी वाट देखाले लागनात.समदी गली सुनी होती.आते घरसमाधून लोकं बाहेर पडाले लागनात.भीमा मामानं त्यां डीपीकडे पयनात.म्याचना टायीम हुयी रायंता.बाकीनासनी माथनीनं पानी खाले कराले सुरवात करी होती.केसरमाय खाटलावरून पानी पेनारासकडे डोया वटारी रायंती.काही उपेग होये नही.समदा कान पाडीसन आपलं काम करेत.
"तेवढा आन्टीना बदलायी टाक नानाभू.."
शंकरबाबा बोलना.
"चांगला से तो.तेनी एक दांडी हाली जास साली.तेले प्याक करस आते.निंघी जातीन दिन."
नाना मामा कपडासना मशीनवर ठेल चड्डीले हातमा लेत बोलना.
भर उंडायामा गल्लीना बराच जन नाना मामाकडेच टीवी देखाले येत.गडी चालता बोलता टीवी होता.पेपर,टीवी, मानसं संगे बोलनं तेनामुये गडी अपडेट राये.आज म्याचमा काय काय हुयी.ते दनादन गडी सांगी मोक्या होये.
आमना काफिला वाडामाच राये.जोरमा परत वावदन उन्हं .समदी गल्ली झाडायी गयी.भवरी पुढे चालनी गयी.लायीट येताच नाना मामा धाबावर जायीसन आन्टीनानी दांडी दोरीकन बांधी वूना.घर परत भराले लागनं.
पिच्चर आते सरी जायेल होता.आते बारी होती म्याचनी.भुयी गल्ली ना काही गडीबी आज आठे येल होतात.टीवी धाकला होता पन नाना मामाकडे म्याच देखानी भारी मज्जा राये.आन्टीना धोका दे मजार मजार पन पोरं आपली जागा सोडे नहीत.टीबीमाधला गडीसपेक्षा येसनं नालेज भारी वाटे.गडी आऊट होताच ,
"मी तं बोलनू होतू तुमले हाऊ खीऊ देनार नही आसं."
पुढला ओवरले गडी ठोकावताच, सांगनार गडी सवरायी सवरायी आरधा होयी जाये.म्याच रंगमा उनती.संध्याकाय होवाले लागनी.आते वारा जोरमा येवाले लागना होता.पहिलेच दोनदा नाना मामा धाबावर जायीसन येल होता.आन्टीनानी दगा नको देवाले आसं वाटी गयतं.भरेल घरकडे देखत नाना मामा बोलना,
"बरं रे, पोरसहोन.आन्टीना मी बदलायी टाकसू.तेनं काही खरं नही.तो कवय दगा दी,ते काही सांगता येत नही.पन तुम्ही येत जा बरं.मजा येस."
नाना मामा इकडे बोली रायना होता नि तिकडे टीवीमा बागे बागे मुंग्या वाढी रायन्या होत्यात.आम्ही समदा गडीले आयकी रायनू होतूत.मानूस आमनासाठे खटाटोप करे हायी समजी रायनं होतं.आते परत खरखर होवाले लागनं होतं.बाकीनासनी परत शेजारे जठे जागा भेटी तठे आपला बिस्तर टाका होता.आम्ही मातर साठावाटे धाबावर नाना मामा आन्टीना कसा बसाडस म्हनीसन देखाले गवूत तं...
भवरीमा आन्टीना कंडी जायेल होता.वायर,तुटेल आन्टीनान्या काड्या,दोरी,दगडं मामा जमा करी रायंता नि शेजारून आवाज यी रायंता...
"लंबा सिक्स...."
#आमनंधाकलपन



भलतच भारी लिखेल शे भरत भाऊ
ReplyDelete