मडं

 मडं

"बरं रे,तो भुयीगल्लीना धल्ला मरना आज.चालशात का तेना पैसा गोया कराले."

भोल्या गपागपा ताटलीमाधला काला हानत बोलना.

       आम्ही गल्लीना समदा तेनासोबत होतूत,पन आज निम्मा गडी कमी हुयी गयात.कोनी मांगे भूत लागी म्हनीसन,तर कोनी रातले मरेल मुडदं सपनमा येयी नी छातीवर बठी म्हनीसन धुम ठोकी खेवाले पयनात तर कोनी घरना रिकामा कामं करात म्हनीसन घोमालतीन बाजुले झायात.सोबत राहेल बंडूलेपन घाबरायी ली गयात.दरोज आयकनारा गडी धुम ठोकी पयी गयतात.आज भोला एकटा टायगर होता.भोलानी कोनीच परवा करी नही.कोपरामा ताटली ठेवत माथनीनं थंड होयेल पानी ढोसलत भोला माले बोलना,

"तुलेबी येन हूयी ते ये.आपली काही बयजब्री नही कोनले.एकटा पैसा जमा करसू.दुकानवर जासू.लेमन गोया खासू.तू उना ते वाटा पाडूत आपन."

       मी पेचमा पडी गवू.तेना सपाटामा मी सापडी गवू.माले आते पैसा आनी दुकानवरल्या लेमन गोया दिसेत. उपाद हुयी गयती.तेले सोडं म्हनजे गल्लीना बाकिना गडी कवयबी कुथाडतीन या विचारकनच टरकायी गवू.मी तेले बोलनू,

"त्या धल्लानं भूत तं येनार नहीं ना.घाबरस भो मी."

"आरे,धल्लाले देवनी तं सोडाले पाहिजे तदलोंग.तेले देव समदं भराले लायी.आपन लगेच यी लागूत.चाल पटकन."

तो दरवाजाले कडी लावत बोलना.

       आम्ही दोन्ही भुयीगल्लीमा गवूत.लोके तिरडी सजाडी रायंतात. मजाना लाल कपडा,फुलं, एक,दोन,पाच,दहा ना नोटा लायीसन पटापट काम उरकायी रायंतात.मडानी तयारी चालू होती.बायासना जोरजोरमा रडाना आवाज ये.समद्या बाया बाहेर पिरेतपा बठेल होत्यात.मांगनं डफडं वाजाले सुरुवात झायी.पिरेतले आंग धोवासाठे गरम पानी डेगडीमाधून टाकायनं.आते समदा लोकं जागावरून उठनात धल्लानं आंग धोवायनं.नवं कोरं धोतर नेसाडायनं.समदी तयारी होताच धल्लानं मडं उचलायनं.बाया साडीना पदर हालावले लागन्यात.खांदा देनारा दनादन चालाले लागनात.'राम बोलो ....भय राम' म्हननारा गडी आम्ही झामलाले लागनूत.

          तो गडी मुरमरासमा कालायेल पैसा मडावर फेकिसन देल काम करी रायंता.आम्ही त्या लोकेसले पुढे जावू दीन.मंग पटपट पाच पैसा,दहा पैसा,वीस पैसा ज्या सापडतीन त्या जमा कराले लागनूत.मडं पुढे नी आम्ही मांगे होतूत.रस्तामा फफुटामा पडेल मुरमुरा नी तेनामा लपेल पैसा आते झामलना पडी रायना होतात. तितलामा पाठोडामा दनका बसना.मी खालेच माटी खावाले लागनू.भरदार मिशीवाला गडी मन्हा हातातला जमा करेल पैसा लेवाले लागना.तावतावमा बोलाले लागना, 

"आंडेरनास होन,ह्या समदा पैसा गोया करानं काम आम्हनं से.तुम्ही शिलगा तिकडे.आन समदा..." 

        तो गडी हातले पी टाकत पैसा खिसामा टाकी रायंता.मी घाबरी गवू.भोलानी समधं आवसान देखं नि तठून धूम ठोकी.वरला खिसामा हात टाकत तो पलाटना रस्ताकडे पयना. मी त्या गडीले गाया टिकाडत मडाना पुढे पयाले लागनू.समदा खिसा रिकामा होयेल होता.बेकार रडाले येयी रायंत पन आयकाले कोनी नही होतं.

       भोला गायब होयना होता.आते वाटाना विषयच नही होता.तेना खिसाना चिल्लरना खनखन आवाज कानमा घुमी रायना नी तेना तोंडमाधली लेमन गुयी डोयासमोर येयी रायंती.तिकडे मडं मसनवटीमा पोहची गयतं.मारनारा गडीबी आते दिखी नही रायंता.मी पटकन मडाले इसावासाठे ठेल जागा गाठी.तठे पडेल पुडी फोडी तेनामा दा पैसा सापडनात.मी बेकार खुस झावू.परत तो रांगडा गडी यी लागी म्हनीसन घाबरी घाबरी पयाले लागनू.तिकडे मडानी जगना निरोप लिनता नि मी इकडे तेना निरोप.खिसातला दा पैसा समायत मी आते दुकानकडे धूम ठोकी ...!


गिरीजादूत 

9665911657 

#आमनंधाकलपन

Comments

Popular Posts