चोट
चोट
उंडायाना दिन व्हतात.घरना समदा लोके दुपारनाभरे वसरीमा खाटवर गप्पा ठोकी रांयतात.गल्लीना पोरं सदाआप्पाना मांगला दारले गलका करीसन गोट्या गोट्या खी रायंतात.तेनामुये घरकाही चित लागे नही.घरमा जायीसन गोखलामाधल्या फुटेल तुटेल,टीच पडेल गोट्या मन्ही खिसामा घाल्यात.आवडता हांट्याले पिसोडीखाले दपाडी बाहेर उनू.दारमा झोपेल मायले खेवाले चालनू म्हनीसन पयाले लागनू.चड्डीना खिसामाधल्या गोट्या पडाले लागन्यात.तसाच तरफडा करत त्या वेचाले लागनू.आते खिसामा हात घालीसन गोट्यासले पकडीसन पोरंसकडे पयनू.
गल्लीना सचिन,संजू,बंटी,चंदू पत्तासना डावमा गोट्या लायीसन तीन पत्ती दनादन खी रायंतात.बाकी गडी मांगे बठीसन खे ना आनंद ली रायंतात.जेना तेना पंटर आंगेमांगे बठेल होतात.मन्हा काही जीव होये नही खेवाले.पत्तासमा काही आपला जम बसे नही.त्या चालामाच मन्ह्या गोट्या सरी जायेत.पत्ता नि आपला छत्तीसना आकडा राये.चंदू,सचिनना हात चालामा कोनीच नही धरे.एक टायीमले तं चंदूनी दायलावरच वीस पंचवीस गोटीसना गेम मारी लिनता.समोरला तव्हय हाफ हुयीसन पस्तावना होता.तव्हडात संजू मन्हाकडे देखत बोलना,
"बठ रे आठे.येले जागा द्या रे.हाऊ हारालेच येस आपलामा."
समदा जोरमा हासनात.डाव संजू जिकेल होता.खिसामा हात घालीसन जीव नही म्हने पन खेवाना डावमा नंबर लागना तेनामुये बसनच पडनं.नही तं दुसराले जागा भेटी जाती.
एक एक डाव रंगे पन पत्तं काही फके नही सालं.एक एक डाव करत खिसान्या गोट्या पत्तासमा हारायी गवू.पत्तासना डाव काही माले खपे नही.पोरसले गाया दीसन घर वूनू.गोखलामाधला हांट्या तेवढा रायेल होता.गोलगिटींग नागसारखं गोल धव्य तेनामा भारी वाटे.तो खिसामा घाला.
गोट्या समद्या हारी जायेल होतू.तेनामुये काही करमे नही.पत्तासना भयान पस्तावा ये.ढूस ढूस या गोटीसना खे मा जिकेल गोट्या माले परत जिकीसन लेन्या होत्यात.संध्याकायले गल्लीमा गोटीसना खे सुरू झाया.मी पटकन हांट्या हातमा लिसन तठे पयनू.खे जोरमा सुरू होता.मांडाले बी गोटी नही होती.चंदून्या रावन्या पावन्या करी दोन गोट्या उसन्या लिन्यात.परत कराना भाषावर.
ढूस ढूस खे चालू होता.दोन नी मांड चालू होती.गोट्या मांडीसन उतराले सुरूवात झायी.बघीपा जागा भेटताच हांट्याले थूक लावं.डावमाधल्या गोटीवर निशाना धरा नि दनकन एक गोटी डावमाधून काढी.मंग कराले लागनू एक एकले ढूस.गोटीसमा चोट होती.तेनामुये पटपट जिकाले सुरूवात झायी.दुपारना गडी आते हाराले लागना होतात.तेसना चेहरा उतराले सुरूवात झायी होती.गल्लीना समदा पोरं जमाले सुरूवात होयनी.जो तो खे नि हारी जाये.मस्त खे रंगे तव्हय.डावना खे पटापट हुयी जाये.हारजीत चालू होती पन आपला खिसा परत भरी रायंता.ढूस,रिंगनसारखा गोटीसना खे दोन,तीन,पाच,दहा मांड टाकीसन खेवायी रायंता.खिसामा गोट्या आते माये नहीत.चड्डीमा त्या जड हुयी रायंत्यात.गुडघा जमीनले टेकीसन,गोट्यासना खिसा पायमा घालीसन खेवायी रायंत.खिसा जड होयेलमुये चड्डी परत परत खाले सरके.तिले काडीकन करधोडामा आटकाडी.जिकेल गोट्या ह्या डाव होताच घर ठेवाले गवू.रिकामा खोबराना तेलना डब्बामा त्या जिकेल गोट्या टाक्यात.परत डावमा सामील झावू.डब्बा धाकला भैयापा दिसन खेवाले लागनू.दुपार मन्ही नही होती पन संध्याकाय आपलीच होती.येल पोरं आते पटापट हारी रायंतात.बाकी जिकी रायंतात पन आपल्या दोन उसनवार गोट्या दिसन पन्नास साठ गोट्यासना डब्बा दनादन भरायी रायंता.
पोरं हारताच आम्ही कानढोपरी खेवाले लागनूत.तो होताच मी नि भैया घर उनूत.जिकेल गोट्या मोजाले लागनूत.मोजेल गोट्या परत डब्बामा टाकीसन जोरमा हालावाले लागनू.भारी वाटी रायंत.आपला हांट्या परत जिकेल गोटीसना वर ठेवा.तेनी पप्पी लिनी.आते दररोज पत्ता सोडीसन 'ढूस' माच आपला जीव गुते.तेनामा जिकेल गोट्यासकन डब्बा भराले लागना होता.चोटमुये जिकेल गोट्या रांभूबाबाले दिन्यात.तेना पैसा भेटाले लागनात.धाकलपने गंजस साव सदाबाबा,वानीबाबा,रांभूबाबा येसले गोट्या विकू.त्या पैसासकन कधी पेन,कधी वही,कधी फटाकडा,कधी भवरा लेल आठवस.ते कधी आसाच त्या खावायी जायेत.
गोटीसमा 'चोट' ले भयान महत्त्व शे.या चोटमुयेच माले पोरं बहुतेकदा खेवू दे नहीत.रावन्या पावन्या करीसन खेवाले सुरूवात झायी ते समोरलाले हारा शिवाय परयाय राये नही.कोया,पेप्सीना झाकनं,भवरा,गज खुपसनी येनामा 'चोट' होती.तेनामुये पोरंसना खारना धनी माले होनंच पडे.ते काही राहो पन 'चोट' हायी बेकार खेवाना आनंद दे आपले.तीच 'चोट' आयुष्यना रस्तामा कामात वूनी.ध्येय ठरायीसन 'चोट' लावाना प्रयत्न करत गवू.यश भेटत गयं.म्हनीसनच जीवनमा 'चोट' पाहिजेच आपलासंगे.
#आमन्हं_धाकलपन
#चोट
@गिरीजादूत
9665911657



जीभू खरंच आमंन धाकल पण आठवण
ReplyDeleteपण मन जरा उलट व्हत
मनी चोट एवढी खास नव्हती
पण पत्तास मां मी भि नव्वा - दहील्यावर डाव मारी देऊ..
एकदम भारी वाटना आजना लेख
.पुढला वेळेस तेवढं
चंदू कढतीन लेयेल उसन्या दोन गोट्या परत कराले लावा 😜
त्या न कढतीन लेयेल गोट्यासवर ज
हाऊ जिभु न आख्खा तेल न डबा गोट्या स ना भरी गया 👌🏻👌🏻👌🏻😜😜😜😜