हुयी
#आमनं_धाकलपन
हुयी
गल्लीमाधून पोतडा,पोतड्या खांदावर,तगाऱ्या डोकावर लिसन घरोघर गावमाधला गाव मांगनारा हासी हुसी गवऱ्या जमा करत घरोघर हुयीना आनंद वाटी रायंतात.जेले जमी तसं काड्या,लाकडं जो तो दी रायंता.आम्ही बी दगडंसवर थापेल रेटं,गवऱ्या पटकन तेसना पोतडीमा टाकीसन,
"भाऊ,संध्याकायले कितला वाजता शिलगी हुयी."
"आंधारं पडनं की..." तो पटकन रेटं पिसोडीमा लेत बोलना.पुढला घर गया.
संध्याकायनी गावनी हुयी पिप्पयखाले होये.पिप्पय गल्ली गावना मधमाच ये.राम मंदीर नि बामन दादाबी तठेच राये.तेनामुळे पुजा गिजाना तानच नही राये.हुयीकरता जो तो आपला घरमाधून काहीना काहीतरी देच.तेनामुळे गावनी हुयी भयान मोठी होये.गावना धाकल्लासपासून धल्लासलोंग समदा पिप्पयखाले संध्याकायले पिप्पयखाले जमेत.
संध्याकाय होताच मायनी पापडी,कुल्लई पापड ना निवत बनाडी दिना.मी तांब्या भरी आना.जरमलना डब्बामाधून मायनी सकायले दुकानवरून आनेल नारय काढं.आप्पालेसोबत करत आम्ही पिप्पयपा गवूत.
पिप्पयपा पोरसना गलका होयेल होता.चुनगानी चुनगा आपापल्या गँगासपा गप्पाड्या ठोकी रायंतात.समदासपा जेना तेना निवत होता.गल्लीना मझार नि मंदीरना समोर एक भल मोठं लाकूड ठेल होतं.एरंडन्या मोठ्या फांद्या,ऊस लायेल होतात.लाकडसना आजूबाजूले समद्या गावन्या गवऱ्या रचेल दिखी रायंत्यात.सुतयीमा गोल नारयनी माडपन होती.बेकार मोठी हुयी होयेल होती.तेनामा मी,मी देल रेटं देखी रायंतू.त्या काही दिसना नहीत माले.गल्लीमा जिकडे तिकडे बोलनारसना,पोरसना खेवाना,दांगडो कराना,आराया मारानाच आवाज हुयी रायंता.बाया मानसं आते गरदी कराले लागना होतात.बायासनी धाबा समायी लिनतात.कोनी गढीवर देखाले चढनात,कोनी श्रीमंत आन्नाना धाबावर,गल्लीमा,वट्टासवर,समदी गल्ली गरदीनी फूल हुयी गयती.राम मंदीरना वट्टा पन भरी गया.तो चौकच गलका करी उठना होता आते.
हुयी मायनं दरसन लिवाले धाकल्ला पोरसले कड्यावर लेल माया डोकावर पदर वढी,वढी देखी रायंत्यात.आते गावना मानना पुढारी वाजत गाजत निवत लिसन पिप्पय खाले वूनात.धव्वंबरप धोतर,पायजमा,टोपीमा आंधारमा चमकायी उठेत समदा.वाजाडनारसले आते जोर चढना होता.हलगी नुसता कुमचाडी रायंतात.पोरं नाचना आनंद ली रायंतात.
आते बामन दादा वूना.मानना पुढारी पुढे झायात.पुजा झायी.समदा गावनासमोर हुयी मायले 'माय,गावनी इडा पिडा लि जाय,गावले सुखमा नांदू दे.'म्हनीसन हात जोडीसन समदा नमस्कार घालतस नि शिलगाडतस हुयीले...हुयी शिलगताच समदाजन बोमा माराले लागनात.वाजाडनारा जोरमा वाजाले लागनात.आम्ही हुयीना आजूबाजूले नाचाले लागनूत.जोरजोरमा आराया माराले लागनूत.मस्त्या,मारामारी आपसूकच व्हवाले लागन्यात.गरदीमा आप्पाना आते तपास नही होता.गढी,वट्टा,गल्लीमाधला समदासनी हुयी मायसमोर मान खाले घालीसन आशीरवाद लिना.
आते हुयीनी रंगत वाढाले लागनी होती.निवत देनारा एक एक पुढे होवाले लागनात.आपला निवत हुयीमा टाकीसन.आनेल नारय,खोबरान्या वाट्या टाकाले लागनात.गावना ठोल्या गडीसना हातमा मोठ मोठ्या काठ्या होत्यात.त्या गरम गरम वाट्या,नारय,पापड्या लोकेसले काढी देत नि त्या बी मस्त ताव मारेत.गरम गरम नारय खावाले भारी वाटे.
आते ते हादच झायी.थट्टा मस्करीनी हुयी आते भली रंगमा वूनी.गल्लीना लाकडं नि लाकडी खाटाबी आते हुयीमा जावाले लागन्यात.गल्ली गल्लीना लाकडं,बयतन ना बयतन तिनामा पडाले लागनं.तू मन्ह आनं म्हनीसन तो पन तेना घर जावाले लागे.इकडे काही जन हुयीमा टाकेल नारय ली पयेत.तेसना मांगे नारयवाला गडी पये.खेसरना बायासनी भरेल पानीन्या बादल्या धाबासवरून लोकेसना आंगसवर ओत्या होत्यात.वाजडनारा बेकार ढुमडं घोमलायी रायंतात.हुयी माय आते धाबासनावरे जावाले लागनी होती.हुयीनी शेक पिप्पले बठी रायंती.टायीम झाया होता.पिप्पयपा येल समदा आनंद लुटी रायंतात.
गावना वाईट विचारसनी आज हुयी हुयी जायेल होती.समदा आते हुयीना परसाद एकमेकसले देत देत घर जायी रायंतात.आते रातनं चावडीना फडावर गावना पुढारीसनी खेचरनी वाचानी वढ लागनी होती.दुसरा दिन सकायमाच चावडीवर वाचाले गवू.दोन्ही फडा वाचीसन खिदीखिदी हासाले लागनू.आते वाचनारसनी गरदी होवाले लागनी होती.त्या फडाच तसा लिखेल रायेत पन जेनावर लिखेल से तो पन हासी हासी लोटपोट हुयीसन गावनी खेसर,हुयी मोठा मनकन मान्य करी ले.
समदा गावनी हुयी आजपन पिप्पय खालेच होस.पिप्पय नि राम मंदीर तिना साक्षीदार सेतस.आज तेवढी काही गरदी होस नही.पन गावनी आजपन तेवढीच हुयी जपीसन ठेल से हायी खरच भारी से...!
- भरत पाटील
9665911657



Comments
Post a Comment