आयवा
#आमनं_धाकलपन
आयवा
चक्कीना कोपरामा आम्ही समदा भैया नी वाडामाधून निघांनी वाट देखी रायंतूत.पावलसना आवाज वना,की वाटे आते भैया उनाच पन दुसरं तिसरंच निंघे.बट्टासना जेवनं आवरायनात की समदा आयवानी वाट देखेत.पलाट माधला गडी दुपारेच दर्जाना भितवर आजना 'शो' कोनता ते देखी जायेत.फेमस होतं आम्हना गल्लीनं आयवा थेटर...!
भावडू आते पुढे झाया.वाडामा घुसना.आम्ही आथा वाट देखाले लागनूत भावडू निरोप आनी आसे वाटनं,पन भावडूना काही तपास नही होता.चक्कीनी जागा आते गरम होवाले लागनी होती.भावडू गोल फिरी परत आम्हनापा उभा होता.
"आयवा आते ई रायना.थांबा.थोडा व्हीसीआर खोडाय हुई जायेल होता." भावडू बोलना.
"ओ...देखा रे.." मी बोलनू.
भैया दोन्ही हातसमा आयवा टी वी ली चालना होता.तेनासोबतना मोहरा पिशीमा व्हिसीआर आनि आयवा थेटरना मालक सुनिल दादा मजाना हात हालावत दोन्हीसले काहीतरी सांगी सांगी चाली रायंता.आम्ही बेकार खुस झावूत.आयावा थेटरमा पिच्चर देखानी मजा न्यारीच ऱ्हाये.आम्ही आते तेसना मांगे मांगे जावाले लागनूत.दर्जामा आंधांरच होतं.कोनी शेरीवरून,कोनी रस्तावरून घान चेंदीचांदी चालनू होतूत.आज मजाना पिच्चर से आसे पोस्टर देखनारा सांगेत.
समदा एक मांगे एक आयवा थेटरमा घुसनात.भैया,मोहरा वायरी जोडा जाडाले लागनात.आथा आम्ही थेटर देखाले लागनूत.तिन्ही मेर गोनटासन्या भिती आनि एक बाजूले घरनी दगडनी भित होती.उतारले देखनारे बठेत आनि एक टेबलवर आयवा मस्त बठे.तेना सोबत बाजूले व्हिसीआर.आते समदं जोडायनं.मोहरानी लगेच समदासले बाहेर काढं.लगेच मधमा पिच्चर देखासाठे लगेच दोन दोन रूपया लेवाले लागना.आम्हनामाधला काही गडी दोन रुपया दिसन थेटरमा घुसनात.आम्ही बाजूलेच जाईसन उभा रायनूत.आते गावना मोहल्लाना ठोल्या,धाकला,मोठा गडी दोन दोन रूपया दिसन थेटरमा घुसाले लागनात.
आम्हले वाटे आपले फुगटमा जावाले भेटी.गल्लीना सेत तेनामुळे. पन तसं काही व्हयनं नही.सुनिलदादाले उमा नी पानी आनि दिनं तेनामुळे तेलेपन थेटरमा जावाले भेटनं.आम्हीबी आते सुनालदादाना तांब्या रिकामा होवानी वाट देखाले लागनूत.पिच्चर सुरू झाया पन तांब्या काही रिकामा झाया नही.तो दादाबी गल्लीना कोनले कोनले फुगटमा पिच्चर दाखाडी.
"अय,पया आते आठून." भैयानी पयाडं आते आमले.
इकडे पिच्चर सुरू झाया.बागे बागे आख्खं आयवा थेटर भरी गयं.आयवा टीवीना आवाज आते गोनटासमाधून बाहेर येवाले लागना होता.सुनिलदादा मोहरानी देल दोन दोन रूपया मोजी रायंता तदलोंग मोहराबी थेटरमाधला डोका मोजीसन बाहेर उनता.तिकडे पब्लिक पिच्चरना आनंद लुटी रायंतात.आम्ही आते आंधांरं चेंदत चक्कीपा उनूत.
आयवा थेटरना पिच्चरनी आम्हले आते लत लागी जायेल होती.समदासनी ठरावं आज पिच्चर देखानाच.आम्ही पिलॕन करा.समदा गावबाहेरतून गलाटी नदीमा जमनूत.कोनं कसं जाई तेना पिलॕन करा.तिकडे नदीमा जोरजोरमा फायटींगना आवाज हुई रायंता.मधमाच पिच्चर देखनारा बोंबली रायंतात.
"आयवा..आयवा..!"
"तुमनं आमनं थेटर...आयवा थेटर.. आयवा थेटर..."
इकडे आम्ही आयवा थेटरमा घुसानं कसं ते देखी रायंतूत.पिलॕननुसार काही कैलूना गोठामा वडांग कुदी घुसनात.काही बापूजीना गोठामाधून.एक ठिकाने जमनात.आंधांरं होतं पन आयवानी भूक होती.तठे आंधांरंबी उजाये दाखाडे.तदलोंग धा मिनिटना बिरेक झाया.समदा लोके बाहेर निंघाले लागनात.आम्ही जमीनवर झोपी लिनं.गोठामाधला ढोरसना मुतखनना,शेनना वास नाकमा घुसी रायंता.गाडाखाले आम्ही घुसनूत.बिरेकमा काही गडी नदीमा ईसन एक नंबरनं बी काम मिटाडाले उनात.त्या जाताच तिकडे परत शो सुरू झाया.परत आयवा थेटरना आवाज कानमा घुमाले लागना.आम्ही थेटरना बाहेर कोनीच नही म्हनीसन पुढे झावूत.गोनटानी भितपा जावाले आते वडांग कुदनी होती.आम्ही थोडी जागा करी.गोनटापा जाताच खिसामाधलं बिलेड काढं नि थोडं होल पाडं.तीन चार होलसमाधून आम्ही पिच्चर दखाले लागनूत.मधमा समदा पिच्चर देखी देखी दाथडा काढी रायंतात.आमलेबी पिच्चरना शॉट देखीसन हासू आवरायनं नही.आम्हीबी जोरमा हासाले लागनूत.मधला गोनटापा बसेल घाबरनात.आम्ही तठून वडांगे वडांगे गलाटीमाधून धूम ठोकी.थेटरना लाईटं लागनात मधला बाहेर उनात.मांगे गोनटासपा देखाले लागनात.कोनीच नही होतं.नदीमा बॕटरी चमकाडी कोनीच दिसनं नही.आम्ही नदीमाधल्या गाडचाकोरीमा रातनं झोपी लिनतं.परत आयवाना लाईटं बंद होताच घरोघर धुम ठोकी.
सकाय होताच.रातना किस्सा रंगांडी रंगांडी आयवावाला भैया सांगी रायंता.आम्हीबी तेनापा होतूत.जोरजोरमा "आयवा,आयवा" आम्ही बोलूत.ते ले बी मजानं वाटे अन् आमले बी मजानं वाटे.तठून गाडबैलवाला भावडू जोरमा हातमाधली काठी वर करी बोलना,
"आयवा"
आम्ही बी जोरमा,"आयवा.आयवा" बोलाले लागनूत.
तव्हय समदा गावमा आयवानं फॕड होतं.सहजच कोनीबी कोनलेबी हेतू राहो की नको राहो,
"आयवा" म्हनीसन आनंद लुटेत.
#आमनं_धाकलपन
- भरत पाटील
9665911657


Comments
Post a Comment