गुलाब २
गुलाब (भाग -2)
- भरत पाटील
गावबाहेरन्या टपऱ्या म्हणजे गप्पासनं हक्कानं मैदानच होतं."नान्या,दाक्या तुनं दा रूप्या को गेम मार लेव ना रे" जोरमा टपरीवरून आवाज ऊना.गुलाब जिकेल गडी होता.गुलाबसोबत चालतांना एकदम भारी वाटी रायंत.तिकडे शाळामा पोरसना पारथनासाठे गलका चालू होता.तेवढामा गुलाब बोलना,"भागो रे,शाम सर घुमालोंगो आपनकू".गुलाब भिन पयाले लागना.आम्ही पण शाळामा कवय पोहोचनूत तेच समजणं नही.
एक सुर एक तालमा चौधरी सरनी "परेड सावधान" म्हणताच समदा शाळामा शांतता हुई गयी.फक्त आते पक्षीसना चिवचिवाट आणि गावबाहेरना वावरमा जाणारा मजूर शेतकरीसना आवाज ई रायंता.राष्ट्रगीत,पारथना हुई गयी.शाळाना रूटीन ठरेल कार्यक्रम आज व्हयनात नही.काहीतरी चलबिचल जाणवनी.अचानक समदासले खाले बसानी सुचना कानवर पडनी.समदासले वाटणं आज नवीन काहीतरी भेटई आयकाले.पण समोरला सरसना माहोल काही बरोबर वाटी नही रायंता.पटपट कोणी स्टेजवर ये,कोणी वरगामा जाये.शिपाई गरागर खाल्ला वरगामा जाई चारी पाची काठ्या गोया करी लयनात.पुढे काय हुई रायनं हाई काही समजे नही.
तदलोंग आजून सुचना कानवर पडनी."खडे होंगे,खडे हो".उभं राहीसन भारी वाटणं.भारी वाटाले फक्त काही क्षण जातस नही तेवढामा
"नान्या,पुढे ये" शाम सर बोलनात.
नाना हिरोसारखा उठीसन पुढे गया.जाताच गुलाबले दे दणका सुरू झाया.समदा गावमा पैसा पैसा खेनारसना बॉस आणि लीडर म्हणीसन गुलाबनी ओळख होती.सकाय ते संध्याकाय मांगला काही दिवस गावात नही माहिती होतं पण आमनी गल्ली तं पुरी बगी डावना खे मा बेकार घायल हुई जायेल होती.पोरं एकदाव जेवाव नहीत पण बगी डाव खेवाशिवाय रावाव नही होतात.बरंच वातावरण बिगडी जायेल होतं हाई समजाले माले टाईम नही लागना.गुलाबनी धुलाई होयनी आणि गुलाबनी आते येनापुढे पैसा पैसा खेवाव नही आसं मान्य करं.तेवढामा परदेशी सर बाजूना साईडकन पुढे ईसन बोलनात,
"गावात जे जे बगीडाव पैसे पैसे खेळतात ते उभे रहा".
हा आठे कोणले आपली पाठ सुजाडनी होती.कोणतंच चिटपाखरू उभं नही राहे.तेनामा समदी शाळासमोर आणि बाजूले पोरंपोरी असतांना? गुलाबना चेहरा लालेलाल हुई जायेल होता.तो मार खावाले पक्का होता.आज तेनी थोडं रडी देल होतं.आते सरसनी गुलाबलेच सांग,"गुलाब बेटा,तूच सुरूवात कर दहावीपासून पाचवीपर्यंत कोण कोण पैसे खेळते?"
गुलाबदादा आते बॉस होता.तो निडर होता.बिनधास्तपणे तेनी दहावीपासून सुरूवात करी.पैसा खेनारासले बाजूले उभं रावानी सुचना भेटनी.गुलाबनी सुरूवात करताच गरागर पोरं निंघेत.तो प्रत्येक लाईनमा चाले तेनामांगे सर चालेत अन् बगीडाववाला गडी नुसता बाहेर निंघेत.आथा मना पोटमा गोया ई रायंता.शेवटली रांग म्हणजे पाचवीना वरग आमनाच होता.गुलाब जसाजसा पोरं काढे तसं तसं धडकी भराये.पयलेच समोर गुलाबनी होयेल धुलाईनी घाबराई टाकेल होतं.प्रत्येक वरगामाधून निम्मा पोरं बाहेर निंघेत तेनामुळे आपला नंबरबी लागी आसे वाटे.पहिलेच मी गुलाबना बेकार फॕन होतू.तेनामा आम्ही पैसा नही भेटनात तं आंबान्या कोया,पेप्सीकोलाना बुचं जमाडीसन बगीडावना खे रंगाडूत पण बगीडाव खेऊतच.
गुलाब जसा जसा आमना लाईनमा उना तसा तसा जीव पाणी पाणी हुई गयता.तिकडे त्या शिपाईसनी छडीसना गठ्ठा समोर मांडी ठेल होता.बगीडाव आणि तेनामा पैसा पैसा खेनं हाई वाईट से हाई आते समजी रायंत.इकडे बाहेर निंघेल पोरसमाधला काही बारीक जीवना गडीसनी डोयासना धारासले वाट करी दिनती.तेवढामा गुलाब मनापा थांबना आणि बोलना,"घाबरू नको,मी तुले नही काढाव". बोलीसन तो पुढे गया.जीव भांडामा पडना.परदेशी सरनी नजर मनावर गयी अन् परत गुलाबले विचारं,
"का रे,याला सोडलं का?"
"तो नाही खेळत सर".
गुलाबनी माले वाचाडं होतं.तिकडे गल्लीना समदाजण मार खावासाठे तयार होतात.तेनामा येले सोडी दिनं म्हणीसन कुजबुजले सुरूवात झाई.काही उपयोग झाया नही.गुलाबनी गल्लीना गडीसकडून गाईसना मार खाई लिनता पण माले वाचाडं होतं.थोडं थोडं हालकं वाटी रायंत.आते बाकीनासले आपापला वरगामा जावान्या सुचना भेटन्यात.पोरं पटापट जावाले लागनात.
शाळाना वरना तालवर जाईसन आम्ही मार खानारसनी गमंत देखाले लागनूत.मार खानारा आते बगीडाव नही खेवाव म्हणीसन सांगी रायंतात.समदा सर लोकं पोरसले ठिकाणवर आनासाठे समजाडी रायंतात.मार खायेल गडी एक एक वरगामा बठेत.
समदी शाळा आज सामसुम वाटी रायंती.प्रत्येक वरगामा आज रडूबाई बेकार खुश होती.बगीडावना खे नी समदं वातावरण बदलाई टाकेल होतं.गुलाब आज खरोखर बॉस वाटे पण तोपण कसाना ते 'बगीडावना'. तेनी माले सोडी देल होतं.पोरं विचारेत माले,"तू कसा काय सुटना". मी खेस नही म्हणीसन टाईम मारी लिवू.
वरगं भरना.बगीडावना किस्सा प्रत्येक बेंचवर रंगी रायंता.कोणी कसा मार खादा आणि कोणं कसं करे येनामाच हासाना क्लब तयार हुई गयतात.तेवढामा आमना क्लास टीचर वाणी सर उनात.शांतता झायी.सरसनी पण बगीडावना एक हाथ खेनारसनवरून फिराई लिना.मी दुसरांदा वाचनू.सरसनी बगीडाव कसा वाईट से.तुमना अभ्यास कसा बुडसं,तुमनं काय चुकस,तुमना माय बाप कसा कष्ट करतस असा समदं आमले संस्कारना बहुमोल डोस पाजात. त्या आजपण ध्यानमा सेतस.
तेवढामा सहावीमाधला उमेश म्हणजे आमना गल्लीमित्रनी एंट्री झाई."सर,भरतला बोलवलं आमच्या सरांनी". जीव पाणी पाणी हुई गया.कोपरामाधला आमना पाचवीना समदा वरगं मनाकडे देखाले लागना.मार खायेल पोरं बेकार खुश हुई गयतात.आते हाऊपण कुमचाडाई म्हणीसन.मी पटकन सरसनी अनुमती लीसन उमेशना मांगे मांगे गवू.सहावीना वरगामा महाजन सर आमना पुरा गल्लीनी झाडाझडती ली रायंतात.मी आत यु सर म्हाणीसन मधमा जाताच जोरमा कानफट्टीमा एकच बसनी.महाजन सर बोलनात,"मी तुला का मारलं असेल तुला समजलंच असेल.आता यापुढे बंद म्हणजे बंदच". मी पोरसकडे देखं गल्लीना गँगले आनंद होयेल होता.खाले आणि वरगामा सुटी जायेल होतू.पण तिसरा राउंडले उमेशनी बाहेर काढं होतं.आपलासोबत मार खादा म्हणीसन घोमलायेल आमनी पुरी गँग खुश हुई गयती.मी पटकन आमना वरगामा उनू.काहीच व्हयनं नही म्हणीसन लपाडाले लागनू.कानफट्टीमा आजूनपण आवाज चालीच रायंता.पोरं विचारेत काय झाय पण मी पण काहीच नही सांगू.गुलाबनी वाचाडं होतं आणि उमेशनी मैदानमा आणं होतं.
आते समदी शाळा बदली गयती.बगीडाव आते कोपरामाच होयेत.सरसना धाक पडी गयता समदासले.गुलाब पहिले पण राजा होता आणि आजपण तसाच होता.फक्त तो धाकल्लासले कोणलेच खेऊ दे नही.आते मी पण गुलाबना डावख्या देवाले जाऊ नही पण तेनामा खे नी मजा दूरदूरतून लेवूच.पैसा खे नं वाईट होतं.उमेशनी नाव सांग ये नं तवय वाईट वाटे पण बरं झायं महाजन सरनी एक गाल लालेलाल करणारी चापट एक वाईट खे पासून वाचाडी गई.गुलाबना प्रत्येक खे ना मी आशिक होतू.ते नं सुर पारंब्या,भवरा,गोट्या,पत्ता खे नं समदं नंबर एक होतंं.पुढे गुलाबनी मस्त लाईन पकडी पण वाईट सवयीसना पायरे गुलाबनी या जगना निरोप कायमना लीना.गुलाबनी शेवटली बातमी आयकताच गुलाबसाठे दोन अश्रू आपोआप पडना होतात.
'गुलाब' आज नही पण गुलाबना तो सहवास आजही तेवढाच याद येस.गुलाबनी एक्झीट नको होती पण आयुष्यनी रेषा तठलोंग असीन तेनी.आज 10-12 वरीसनंतरही गुलाब जीवनना कोपरामा एक आशादायी चित्र तयार करसं.वाईट खेसुद्धा तो मनपासून खे अन धाकल्ला पोरसले बेकार जीव लाये.गुलाब गुलाब होता.तेनं प्रत्येक वाईट चांगला खे मा झोकी देनं हाईच आजपण मनमा घर करसं.गुलाबना तोच सुगंध आजपण नवीन काहीतरी करासाठे झोकी दे म्हणीसन सांगस....!
#आमनं_धाकलपन
- भरत पाटील,9665911657
Comments
Post a Comment