बयतन
#आमनं_धाकलपन
बयतन
-भरत पाटील
दुपारना टाईम होता.शाळाले आज सुट्टी होती.शाळामा खीसन चालूच घर पोहोचेल होतूत आम्ही.जो तो जेनातेना घर जाई जेवण कराना कार्यक्रम आटपी परत दवाखानामा जमाना पिलॕननुसार घरवालासले कटाडी जमी रायंतात.जेवण करतांनाच माले दवाखानामा जमेल जिभूना आवाज उना.पटापट हेडामा घास गचालात.आसे कोठे जावानं रायनं की जेवणबी पटापट हुई जाये.एकदा पोटमा नही पडणं तं चाले पण पोरं पांगाले नको म्हणीसन पटकन ठरेल ठिकाणे हाजेरी दी दीऊ.दवाखानामा आते बराच गलका वाढना होता.
आते समदाजण जमनात. दवाखानाना लोखंडी खांबासवर बठीसन गप्पा ठोकी रायंतात.भर उंडायामुळे आमनाच आवाज होये म्हणीसन गल्लीना समदा आमना नावले बोंबा ठोकेत आणि दररोजन्या ठरेल गाया भेटेत.तेनामा बरच पिरेम राये पण.इकडे गाया खावान्यात तिकडे गोड बोली काम सांगानं हाई एकदम भारीवाटे आमले.गप्पासना फड रंगेल होता.जोरमा आवाज होये म्हणीसन शेजारना शापिंग सेंटरमा झोपेल धर्मा दादा आमनावर खेकसायना,
"होतस का रे घर लंबा,पडा ना घर थोडंस.नुसता तरास देतंस.थोडासा डोया लागनात तदलोंग तरफडनात आठे.पया आठून".
दादाले राग येना साहजिकच होता.दररोज दादानी आम्ही दुपारनी झोप मोड करूत.दादा नेमकं एकच उदाहरण थोडं होतं आठे.आशा दिवसमाधून गायासनं प्रत्येकनं आमनं पोतं भरी जाये पण तितलाच पुरतं.दादा आमले ठोकी तेना पहिले आम्ही धूम ठोकी.समदा दाणेफान हुई गयात.जेले जथा रस्ता सापडी तथा जो तो पई गया.
घर बसनू होतू.चंदूना आवाज उना,"चालस का बयतनले".दुसरा उद्योगच नही होता म्हणीसन चंदूले थांबाडी घरमा दोरी झामलाले गवू.नारयनी दोरी खांबना बेचाटामा सापडनी.आप्पानी आवडती दोरी भेटेल होती माले.चंदू म्हणे,"हाई दोरी नको लिवू.दुसरी ले." चंदूनं न आयकताच तीच दोरी लिसन मी चंदूसोबत बयतन लेवाले जावाले लागनू.घर उघडं से म्हणीसन पटकन परत आजून घर उनू आणि कुलूप लाई ठरेल जागावर चाबी ठीसन चंदूले झामलाले लागनू.मधमाच जिभू,निलू,भैया भेटनात तेसले बयतनंन सांगताच गल्लीना बाकीनाबी तयार झायात.चंदू काही दिसे नही.पण गल्ली गँग परत हिनीमिनी बयतन कराले नदीमा उतरनी.आपला घरवालासले मदत हुई आणि कामना पोरे सेत आपला आसे वाटी म्हणीसन समदा चंदूना मांगे बयतन जमा कराले लागनात.
चंदू मस्तपैकी सुकायेल नागिनन्या काड्या तोडीसन दोरीवर ठी रायंता.विच्चूकाटाना काही डोकामा विचार नही होता.समदा जेनंतेनं बयतन गोया करी रायंतात.कोणी नदीमाधला सुकायेल झाडसन्या काड्या,कोणी बाबुयवर चढणं,कोणी निमवर,कोणी लोकेसनी लायेल वडांगन्या काड्या झामली आपलं आपलं बयतन मोठं करी रायंत.थोडं थोडं बयतनं जमनं.समदासनी आठे काही नही म्हणीसन आपला मोरचा नदीमाधूनच गावना धरणकडे वळाया.जो तो आपलं धाकलंस बयतनंन ओझं डोकावर लीसन पुढे पुढे जाई रायंता.कोणले चोभंय होती तर कोणले नही.आपण आपला चंदूदादासोबत पुढे पुढे जाई रायंतूत बिगर चोंभयना.चंदू बेकार कष्टाळू पोरगा होता.घरना समदा कामं तो करे.आजपण केसर आजीनी सांगं होतं,"चंदू,थोडा बयतन ले के आ बेटा." चंदूनी आजीना आदेश माना आणि मन लाई बयतन जमाडी रायंता.आमी समदा फक्त टाईमपास करूत.मना तं बयतन जमाडाले कमी पण चंदूनी गम्मत देखाले बराच टाईम जाये.तेनाशी गप्पा माराले मजा ये.तिकडे जिभू आणी उमेश सापडेल काड्यासवर नदीमाच तलवार तलवार खेवाले लागना होतात.निलू झाडवर चढीसन कोल्या काड्या भैयापा दी रायंता.
समदासनं बयतन आते बरच होयनं होतं.नदीमा ठिकठिकाणे पाणीना ढाबा होत्यात तेनामुळे बेकार वास ये.आमनं बयतनं आते मोठं होयनं होतं.समदा आते घर जावानी गोष्ट करी रायंतात.आमी बराच दुर ई लागेल होतूत.आते फक्त बयतन बांधानं आणि घर येवानं एवढंच काम होतं.तेवढामा फुस फुस आवाज व्हयना चंदू पटकन,"मा,मा" करत पयाले लागना.तो घाबरीसन पयाले लागना म्हणीसन आम्ही पण पयाले लागनूत.निलूनी झाडवरतून उडी मारी.भैया तेना पहिले पुढे पयेल होता.समदाजण नदीना किनारले थांबनात.हाबकी हाबकी चंदूले काय झायं विचारं.चंदूनी लगेच सांग,"दहा आकडी नाग से तठे.फणा करीसन मनामांगे इ रायंता.बरं झायं बाप पई उनूत आपण".समदा घाबरी गयात.समदासना तरी बयतनंमा बेकार जीव होता.बयतनकडे जावाना कोणाच जीव होये नही.कोणी जावाले लागनं की दहा आकडी नागनं गुणगान आयकेल समदं कानवर पडे.घरतून निंघीसन बराच टाईम हुई जायेल होता.जीव पाणीबिगर लाय लाय करी रायंता.
चंदूनी आते पुढाकार लिना.थोडा थोडा पुढे पुढे जात बयतन ठेल ठिकाणे थांबना.इकडे तिकडे देखं आणि पालासमाधून आवाज उना.तठे पक्षी होतात.चंदूसकट आम्ही बेकार घाबरी गयतूत.समदासनी नाग आते काही नही म्हणीसन जमेल बयतन डोकावर लिनं आणि घरना रस्ता नदीमाधूनच पार करा.
बयतनमुळे समदासले घरवालासनी शाबासकी भेटनी होती.अन् नागनी गोट घर सांगी तं,"कसाले तरफडना होता मंग बयतनले" आसा शबदसना समाचारपण सोबतले भेटना होतात.तिकडे चंदूना आजीले चंदूनी आणेल बयतनंन कौतुक वाटेल होतं.आजीनी चंदूले दुपारेच त्या बयतनंन्या काडीसवर चहा उकाई दिनती.बयतनवर चंदूना चुला चेटे म्हणीसन घडेल गोट आजीले सांगेच नही.तेले माहिती होतं.आज सांग तं आजी जाऊ देणार नही आणि आपले बयतन नही भेटणं तं चुला चेटाव नही.आशी तेले भिती वाटे.
बयतन निमित्त होतं आमले एक करानं.ते एक काम होतं पण तेनामाधून घरवालासनी कौतुक कराले पाहिजे हा आमना हेका पण चंदूसाठे बयतन दररोजनी चुलानी चेटानी आशा होती.बयतन आजपण चंदूनी चिकाटी,तेनी इतका धाकलपणनमा मोठा विचार करानी समज,आजीनं लगेच आयकनं,दोस्तीनी साक्ष देस...!
- भरत विठ्ठल पाटील
9665911657
#आमनं_धाकलपन
Comments
Post a Comment