पाटी

पाटी
- भरत पाटील

      "उद्या आपल्याकडे साहेब येणार आहेत.कोणीही घरी राहू नका.साहेब परीक्षा घेणार आहेत.पाटी,पेन्सिल सर्वांकडे आहे ना?" गुरूजीनी समदा वरगाना पोरसले सांग आणि अभ्यास करा म्हणीसन हाफीसमा चालना गयात.समदा पोरं आपल्या दप्तरन्या पिसोड्या झामलाले लागनात.जो तो आपली पाटी,पेन्सिल कोणी हातकण,कोणी फडकाकन,कोणी थुक लाई पुसाले लागनं जसा काई साहेब आज येणार सेत.मी मातर आपला पोरसनी मज्या देखामाच होतू.आपल्या पाटीना दोन भांगा हुई जायेल होतात.तिले कसं चिटकाडानं येनाच इचार करी रायंतू.पोरसनी तयारी हुई गयती आसे वाटाले लागनं होतं.

       योगेश आमना वरगमाधला हुशार गडी.तेनं समदं नेवनेटकं काम राहे.तेनी पाटी मस्त होती.चारी बाजूले हिरवा रंगनी पलास्टीकनी पट्टी भारी वाटे.गणजजनसले तेनी पाटीना बेकार हेवा वाटे.समदासले आसं वाटे;की तेनासारखी पाटी आपलाकडेबी पाहिजे होती.योगेशनीपण पुरी तयारी हुई गयती.शाळा सुटाना पहिले गुरूजी आजून वरगामा उनात आणि साहेब येवान्या सुचना दिन्यात.कालदीन काय काय करानं,कोणी कोणले दाखाडानं.तेसनाकडे कसं ध्यान देवानं,समदं बरोबर पाहिजे म्हणीसन वरगाले एकसाव आजून डट्टाड.काहीतरी विशेष से म्हणीसन मी पण योगेशना पाटीकडे देखाले लागनू.तेनं ध्यान मनाकडे जाताच आपला आपला पिसोडीकडे देखाले लागनू.साहेबन्या चर्चा हाफीसमा जोरजोरमा हुई रायंत्यात.हाफीसना शेजारना वरग होता तेनामुळे लगेच समदं समजी जाये.समदा वरगसले जेनातेना गुरूजीसनी सुचना देल होत्यात.शाळा सुटाना टाईमले आजून बाहेर समदासले बसाडं आणि साहेब येतीन तवंय कसं वागानं,हुशार पोरेसले उभं करीसन मस्त सुचना मुख्याध्यापकसनी दिन्यात.आम्ही खाले बठी बठी येले खडा मार,तेले खडा मार चालू होतं.तेवढामा गुरूजीसनी बुक्की पाठवर बसेल आजपण आठवस.समद्या सुचना देलवर शाळा सुटनी.

      शाळा सुटताच गल्लीन्या गँगा एक होयन्यात आणि ठरेल परमाणे एकमेकसले कुमचाडाना कारेकरम सुरू होयना.आम्ही एकमेकसले मारीसन घर पऊत.एखादा सापडना की बेकार कुमचाडाई जाये.मंग तेनी घर दांगडो आणो हाई ठरेलच राहे.कालदीन साहेब येणार सेत म्हणीसन गल्लीना गणू तेनी आजीले दुकानवर नवी पाटी लेवाले ली गयता.मी घर येताच थोरना झाडकडे पयनू.थोरन्या काड्या,निमना झाडावरला डीग लीसन घर उनू.तुटेल पाटी जोडाले लागनू.घरवाला देखतीन म्हणीसन पटकन थोरना चीक पाटीना भागले लाई पाटी पीसोडीमा ठी दिनी.उरेल डिग,थोरन्या काड्या उखल्लावर फेकी दिन्यात.साहेब येणार सेत म्हणीसन धाकली पेन्सिल,चिटकाडेल पाटी,फाटेल पुस्तकं हाईच आपली पिसोडीनी श्रीमंती होती आसे वाटे.

        दुसरा दिन उगना.शाळाना टाईमना पहिलेच आमले जावानी सवय होती.गल्लीनी गँग एकसारखीच निंघनी.कोणी माराले नही पाहिजे म्हणीसन एकमजारच राहूत.फक्त शाळामा वरगामा जावासाठे वेगळा होवूत.तठे एकला गडी सापडना की बुक्की ठरेलच राहे.साहेब येणार से का जाणार से येनासी काही लेणंदेणं नही होतं आमनी गँगले.शाळामा गुरूजीसन्या गाड्या येवाले लागताच आठवण उनी.आज साहेब येणार सेत.समदं पटांगण,वरग चकाचक झायात.दररोजसारखा परिपाठ आणि आजना परिपाठमा फरक होता.आज समदं पद्धतशीर हुई रायंत.आजून साहेब येवान्या सुचना भेटन्यात.

         आम्ही आते वरगामा बसनूत.गुरूजीसनी हाजेरी लिनी.'जय हिंद' म्हणीसन पोरसनी हाजेरी दिनी.गुरूजीसनी एक दोन लिखाणं सांगं.लगेच त्या हाफीसमा गयात.समदाजण पाट्या काढीसन लिखाले लागनात.मी मातर चिटकाडेल पाटी तुटाले नको म्हणीसन काढानं नाव लिवू नही.गुरूजी येताच मी घाबरी पाटी काढाले लागनू.पाटीनं एक तुकडं हातमा उनं.मी घाबरी गवू.आते साहेब येतीन,काय करानं हा विचार कराले लागनू.गुरूजीनं आपलाकडे ध्यान नको जावाले म्हणीसन नजर लपाडाले लागनू.परत परत मांगला पोऱ्यासंगे बोलू आणि गुरूजीकडे देखू.पोरंसन लिखाई जाई रायंत.तदलोंग साहेब उनात आसे माहिती पडनं.गुरूजी तथा गयात.साहेब वरगामा येतीन म्हणीसन समदा पोरं टेनशनमा होतात.थोडा थोडा तोंडं  होयेल होतात.साहेबनी पहिला वरगपासून सुरूवात करेल होती.काही टाईममा आमना वरगामा साहेब येणारच होतात.गुरूजी परत परत ईसन आमले सुचना देत.

     साहेब एकदावाना वरगामा घुसनात.पुरा धव्व्या कपडा होतात.धव्वी कुडची,धव्वी चड्डी आणि धव्वीच गांधी टोपी होती.उच्चापुरा आणि गोरा साहेब होतात त्या.तेसनासोबत समदा शाळाना गुरूजी आपना वरगामा उनात.मनासकट समदाच पोरं घाबरी गयात.साहेबसनी घाबरू नका म्हणीसन सांग.गुरूजीसनी लगेच वरगामाधला पोरसले उठाले सांग आणि नमस्कार कराले लावा.साहेब खुश होयना.फळावर 'गाढव' शब्द लिखा.योगेश पुढेच बसेल होता तेनामुळे गडीनी गाढव शब्द लगेच वाची काढा.वरगमाधला बाकीनासनी पण वाची काढा.साहेबनं समाधान झायं.साहेबनी लगेच पाट्या काढाले लायात.तुटेल पाटीनं तुकडं काढाले कसंतरी वाटे माले म्हणीसन मी जागावरच गुपचुप बसी रायनू.गुरूजीनं मनाकडे ध्यान जाताच.गुरूजीनी डोया वटारात.मी खाले मान घाली.साहेबनी पाच शब्द तोंडी लिखाले लावात.योगेशनी पटापट शब्द लिखात आणि बाकीनासले तो कानी पाटी करीसन दाखाडाले लागना.साहेबनी योगेशनी पाटी तपासी आणि तेले शाबासकी दिनी.तो हुशार होता.साहेबनी बाकीनासन्यापण पाट्या तपास्यात.समदासमा तेनाच शब्द बरोबर येल होतात.तेनं साहेबसनी कौतुक  करं आणि समदासना समोर उभं करीसन शाबासकी दिनी.मी कोपरामा बसेल होतू.काही हालचाल करी नही रायंतू आणि खाले मान घालीसन पिसोडीसंगे खी रायंतू.तेनामुळे साहेबनं ध्यान मनाकडे गयं,"बाळा,तू नाही लिहले का?" आसे माले विचारताच माले घाबराले होयनं.माले तुटेल पाटीनं भयान टेनशन होतं.तदलोंग गुरूजीनी पुढाकार लिसन,"अहो साहेब,हा हुशार आहे,पण लक्ष देत नाही.बाप......" पटपट सांगी गुरुजी मोक्या हुई गया.साहेबले वाटनं आते येनी परीक्षा लिवूत.म्हणीसन त्या म्हणतीन तेना पहिले बाजूना हुशार योगेशनी पाटी पेन्सिल मनाकडे लांबाडी.मी बेकार खुश झाऊ.तेनी पाटी लेवासाठे समदा पोरं धडपडेत आणि तेनी पाटी मनापा होती.परीक्षा देवाले मी सज्ज होतू.गुरूजीनी मनामा पाटी देखी.गुरूजी गालमा हासना.तेसलेपण योगेशनं कौतुक वाटनं.साहेबनी आते स्पेशल माले पाच शब्द तोंडी लिखाले दिनात.तेनापैकी मना चार बरोबर उनात.साहेबनी मना जागावर ईसन माले शाबासकी दिनी.भारी वाटणं.बाजूले योगेश होता तेनापण पाठवर थोपटं.समदा वरगाले अभ्यास करान्या सुचना दिन्यात आणि दुसरा वरगामा आमले निरोप दिसन गयात.

        योगेशनी माले पाटी दिनती ते पण कोणी तेले सांगच नही होतं तवय.तेले काय वाटनं माहित नही ; पण तेना पाटीमुळेच माले साहेबनी शाबासकी भेटनी होती.तेले हासीसन परतिसाद देत मी तेनी पाटी तेले दिनी.तेनीपण पाटी लगेच दप्तरमा ठी दिनी.मी मना पिसोडीमा दुसरं पाटीनं तुकडं घाली दिनतं.परत परत तेनाकडे देखू आणि तेना दप्तरकडे नजर टाकी देवू तेनी पाटी देखासाठे.

        चिटकाडेल पाटीनी आईनटाईमले धोका देल होता.तेनं दुःख होयेच पण योगेशनी पाटी आपले लिखाले भेटनी येना आनंद बेकार होता.योगेश पुढे चांगला दोस्त व्हयना ते फक्त तेना पाटीमुळेच....अन् तेना पाटीनीच जीवनले कलाटणी दिनती आसं मनपासून आजपण वाटस....!

- भरत पाटील
9665911657

#आमनं_धाकलपन

Comments